निकालाआधीच यांचा विजय निश्चित ! असा धक्कादायक निकाल लागणार ?

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, आज आम्ही तुम्हाला निवडणूकांच्या विषयी स्पेशल माहिती सांगणार आहोत आणि ते जाणून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल, मित्रांनो कालच विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडले, सर्व पक्षांनी प्रचारा दरम्यान जोरदार शक्ती प्रदर्शनही केली. काही मतदारसंघात जनतेचा कल हा आघाडी सरकारच्या बाजूने दिसतो, तर काही मतदार संघात युतीचाही बोडबाला आहे. बऱ्याच मतदार संघात असे आढळून आले की भाजप सरकारच्या काही योजनांचा फायदा युतीला होऊ शकतो. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसभा शरद पवार यांच्याआक्रमक प्रचाराने आणि त्यांच्या या वयात काम करण्याच्या जिद्दीने राष्ट्रवादीच्या गोटात खुप मोठा उत्साह निर्माण झाला आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत बऱ्याच मतदार संघात काट्याची टक्कर आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण आता अशीच होणारी काही काट्याची टक्कर आणि त्यामध्ये जनता कोणाला कौल देते ते पाहणार आहोत.

१) पहिल्यांदा पाहुयात संगमनेर या मतदार संघात काय स्थिती आहे ती, या मतदार संघातुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष “बाळासाहेब थोरात” हे काँग्रेस कडून रिंगणात आहेत, तर शिवसेनेकडून नवले हे उमेदवार दिलेले आहेत. या मतदार संघातुन बाळासाहेब थोरात यांचा अनेकदा विजय झाला आहे, त्यामुळे त्यांचा हा बाले किल्ला आहे. नवले यांना बी निवडणूक फारशी सोपी जाणार नाही त्यामुळे बाळासाहेब थोरात यांचा हा विजय निश्चित मानला जात आहे.  २) त्यानंतर इस्लापमुर मतदार संघात काय परिस्थिती आहे ते आपण पाहुयात, या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष “जयंत पाटील” हे लढत आहेत, तर गौरव नायकवडी हे शिवसेनेचे उमेदवार आहेत. यामध्ये निश्चितच “जयंत पाटील” यांचा विजय होणार अशी चर्चा आहे.

३) आता अमरावती अचलपुर हा मतदार संघ, या मतदार संघातुन विद्वेमान आमदार “बच्चू कडू” हे उभे आहेत, त्यांच्या विरोधात काँग्रेसचे आणि भाजपचे उमेदवार रिंगणात आहेत. पण या मतदार संघात बच्चू कडू यांचे खूप प्रभूत्व आहे. जनतेच्या अनेक समस्या त्यांनी सोडवल्या आहेत असे जनतेचे मत आहे, त्यामुळे त्यांच्या विरोधात कोणीही असले तरी विजय हा “बच्चू कडू” यांचाच होणार असे बोलले जात आहे. ४) मुंब्रा कळवा या मतदार संघातुन राष्ट्रवादीचे नेते “जितेंद्र आव्हाड” हे निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. त्यांच्या समोर आव्हान असेल ते म्हणजे शिवसेनेच्या उमेदवार अभिनेत्री “दिपाली सय्यद भोसले” यांचे तशी ही लढत एकतर्फी होणार नसून चुरशीची होईल असा अंदाज आहे. पण राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांचे पारडे थोडे जड आहे असे वाटतं.

५) त्यानंतर सिल्लोड मतदार संघाचे चित्र या मतदार संघातुन आघाडीचे बंडखोर नेते अब्दुल सत्तार हे शिवसेनेकडून रिंगणात उतरले आहेत, या मतदार संघात अब्दुल सत्तार यांची हवा असल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्यांचा विजय हा जवळपास निश्चित मानला जात आहे.  ६) बल्लारपूर हा मतदार संघ भाजपचे मंत्री “सुधीर मुनगंटीवार” यांचा बाले किल्ला आहे, या मतदार संघातुन त्यांच्या विरोधात काँग्रेसचे विश्वास झाडे हे निवडणूक लढवत आहेत. पण ही निवडणूक त्यांच्यासाठी जड असणार असल्याचे चित्र दिसून येत आहे त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांचे विजय हा निश्चित मानला जात आहे.

७) तासगाव कवटेमहंकाळ या मतदार संघातुन राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तसेच माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या पत्नी “सुमनताई पाटील” या राष्ट्रवादी कडून तर अजित घोरपडे हे शिवसेने कडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या मतदार संघात आर. आर. पाटील यांचा प्रभाव असल्याने आणि सुमन पाटील यांचे कामही चांगले असल्याने त्यांचा विजय होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. ८) लातूर ग्रामीण मतदार संघातुन महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे धाकले चिरंजीव “धीरज देशमुख” यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. उमेदवारी मिळाल्यानंतर धीरज यांनी भाऊ रितेश देशमुख यांच्या सोबत प्रचाराचा धुरळा उधवला होता, धीरज यांच्या विरोधात शिवसेने कडून सचिन देशमुख हे निवडणूक लढवत आहे. पण विलासराव देशमुख यांचे वर्चस्व असणाऱ्या या मतदार संघातुन धीरज देशमुख हेच विजयी होतील हे जवळपास निश्चित आहे.

९) त्यानंतर येऊयात बीड मतदार संघाकडे या मतदार संघात काका-पुतणे अशी लढत होणार आहे, राष्ट्रवादीचे बंडखोर नेते आणि माजी मंत्री “जयदत्त क्षीरसागर” हे शिवसेने कडून निवडणुकीच्या रण धुमळीत उतरले आहेत. तर त्यांचे पुतणे हे राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत, काका-पुतण्याची ही लढत तशी रंगतदार होणार असून तरी देखील भाजपच्या काही योजनांचा फायदा हा जयदत्त क्षीरसागर यांना होणार असल्याचे चित्र दिसत आहे. तरी देखील ही लढत चुरशीची असेल यात शंका नाही. १०) वरळी मतदार संघातुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव “आदित्य ठाकरे” उभे राहिले असून त्यांच्या विरोधात बिगबॉस स्पर्धक “अभिजित बिचुकले” हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे पहिल्या विधानसभेत आदित्य ठाकरे यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

११) शेवटचा मतदार संघ आता आपण पाहणार आहोत तो म्हणजे भोकरदन मतदार संघ या मतदार संघातून भाजपचे मंत्री रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव “संतोष दानवे” हे भाजप कडून निवडणूक लढवीत आहेत, तर राष्ट्रवादीचे उमेदवार “चंद्रकांत दानवे” हे त्यांच्या विरोधात लढणार आहेत. या मतदार संघात जनतेचा काही प्रमाणात नाराजीचा सूड हा रावसाहेब दानवे आणि भाजप सरकार यांच्या बाबतीत पाहायला मिळत आहे त्यामुळे या लढतीती कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

मित्रांनो तुमचे याबद्दल काय मत आहे ते सांगा व तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.