एका हट्टा मुळे या मराठी अभिनेत्री चे करियर संपले…

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आज आम्ही तुम्हाला “मैने प्यार किया” या हिंदी चित्रपटामधील अभिनेत्री “भाग्यश्री” यांच्या विषयी थोडी माहिती सांगणार आहोत, त्यांच्या एका हट्टा मुळे त्यांचे अभिनेत्रीचे करियर संपले, तर चला मित्रांनो तो कोणता हट्ट होता ते आपण जाणून घेऊ. सलमानखान यांचा चित्रपट “मैने प्यार किया” हा तुमच्या सर्वांच्याच लक्षात असेल, या चित्रपटातूनच अभिनेत्री भाग्यश्रीने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटानंतर तिला येवढी प्रसिध्दी मिळाली की तिने त्याबद्दल स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल. परंतु तिच्या एका हट्टामुळे तिने स्वतःचे बॉलीवूड करीयरच संपुष्टात आले तिने असा कोणता हट्ट धरला होता ते जाऊन घेऊया….!!

1989 साली ही दिसणारी भाग्यश्री मैने प्यार किया या चित्रपटामुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली या चित्रपटाच्या यशानंतर तिला आपल्या चित्रपटात घेण्यासाठी तिच्या घराबाहेर निर्मात्यांची मोठी लाईनच लागली. सर्वांनाच ती आपल्या चित्रपटामध्ये हवी होती. मैने प्यार किया या चित्रपटातून तिला फिल्म फेअर चा सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला. भाग्यश्री ही मूळची सांगलीच्या पटवर्धन घराण्यातील मुलगी असून तिचा जन्म मुंबई मध्ये झाला. मुंबई मध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना ही मुलगी वयाच्या अठराव्या वर्षी हिमालय यांच्या प्रेमात पडली, भाग्यश्री ही शुद्ध पब्राह्मण तर हिमालय हे मारवाडी जैन असल्यामुळे तिच्या आई-वडिलांना हे लग्न मान्य न्हवते. त्यामुळे त्या दोघांना 2 वर्षे एकमेकांशी कोणताही संपर्क ठेवायचा नाही असे सांगण्यात आले. पण त्याचा परिणाम त्यांच्या प्रेमावर बिलकुल झाला नाही.

याच दरम्यान तिने मैने प्यार किया या चित्रपटामध्ये काम केल्यामुळे तिला इतकी प्रसिद्धी मिळाली की त्यानंतर तिने आई वडिलांच्या विरोधाला न घाबरता घराबाहेर पडून हिमालयासोबत लग्न केले. या लग्नाला तिचे आईवडील न्हवते परंतु लग्नानंतर जेव्हा त्यांना समजले की भाग्यश्रीला मुलगा झाला आहे त्यानंतर ते तिला भेटायला आले आणि त्यांच्यातील सर्व दुरावाच मिटला….!! लग्नानंतर मात्र भाग्यश्री ने एक हट्ट धरला होता की यापुढे ती तिचा पती हिमालय यांच्या सोबतच चित्रपटात काम करेल अन्यथा करणार नाही. तिच्या ह्या हट्टापुढे झुकून तीन निर्मात्यांनीही तिला त्यांच्या चित्रोटामध्ये काम करण्याची संधी सुद्धा दिली, पण तिचे ते तीनही चित्रपट फ्लॉप झाले त्याच्या नंतर तिला कोणत्याही निर्मात्यांनी ऑफर दिली नाही.

2009 साली तिने “झक मारली बायको केली” या मराठी चित्रपटामध्ये काम केले. परंतु तिला मैने प्यार किया सारखे यश पुन्हा कधीच मिळाले नाही. अमोल पालेकरांच्या कच्ची धूप या मालिकेतून आपल्या करियरची सुरवात करणाऱ्या भाग्यश्रीचे वय सध्या 48 असून तिच्याकडे पाहून असे कोणालाच वाटणार नाही की ती दोन मुलांची आई आहे. तर या अभिनेत्रीने तिच्या एका हट्टा मुळे स्वतःचे करियरच नष्ट केले.

जर तिने इतर अभिनेत्यांसोबत काम केले असते तर ती आज मोठ्या अभिनेत्रींच्या पंगतीत नक्कीच असती पण हट्टीपणाला औषध नसते तेच खरे…..!! मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की आम्हाला कमेंट मध्ये लिहून कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.