या नेत्यांच्या मुली आहेत खूपच सुंदर, चालवत आहेत राजकारणाचा वारसा…

महाराष्ट्र विधानसभा च बिगुल वाजलं आणि राजकीय पक्षाची धावपळ सुरू झाली.अख्या महाराष्ट्रात प्रचाराचा दुराळा उडालाय.या मध्ये पुरुषांप्रमाणे महिला सुद्धा आघाडीवर आहेत.देशात महिलांना आरक्षण मिळालं आणि महिला प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमठवत आहेत.याला राजकारण अपवाद नाही.या महिला सक्षम पणे राजकारणात काम करत आहेत.या मध्ये राजकीय घराण्यांच्या मुली सुद्धा राजकीय वारसा चालवत आहेत.कोण आहेत अश्या कन्या ज्या सक्षम पणे राजकीय वारसा पुढे चालवत आहेत.हे आपण आज पाहणार आहोत.

या मध्ये सर्वप्रथम नाव येत ते म्हणजे सुप्रियाताई सुळे यांचं..राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणजे शरद पवार यांच्या त्या कन्या. सुप्रियाताई या सध्या खासदार आहेत. त्यांनी बारामती या मतदारसंघातुन विजय प्राप्त केला आहे.

दुसरा क्रमांक लागतो तो म्हणजे पंकजाताई मुंडे यांचा…भाजप नेत स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या त्या कन्या आहेत. 2019 विधानसभा निवडणुकीत परळी या मतदारसंघातुन त्या इलेक्शन लढवत आहेत. पंकजाताई यांचे प्रतिस्पर्धी आहेत ते म्हणजे त्यांचे चुलत भाऊ धनंजय मुंडे. ही लढत नेहमी चुरशीची असते. अख्या महाराष्ट्रच या मतदारसंघाकडे लक्ष आहे.

तिसऱ्या क्रमांकावर आहेत त्या म्हणजे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या दुसऱ्या कन्या प्रीतमताई मुंडे.. प्रीतमताई मुंडे सुद्धा लोकसभेत खासदार म्हणून निवडून आल्या आहेत.

त्यानंतर नंबर लागतो तो म्हणजे पूनम महाजन यांचा…स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्या त्या कन्या आहेत.पूनम महाजन या सुद्धा प्रमोद महाजन यांच्या वारसा उत्तम प्रमाणे चालवत आहेत.

प्रणितीताई शिंदे काँग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या त्या कन्या आहेत. प्रणितीताई शिंदे या सोलापूर 2019 च्या निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या समोर खूप मोठे आवाहनही आहे.

त्यानंतर आहेत रोहिनी ताई खडसे. भाजप चे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या त्या कन्या आहेत.त्या देखील 2019 ची विधानसभा निवडणुक लढवत आहेत. एकनाथ खडसे याना तिकीट न देता भाजपने त्यांच्या मुलीला संधी दिली आहे.

त्यानंतर येतात त्या स्मिताताई पाटील. राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते म्हणजे स्वर्गीय आर आर पाटील (आबा) यांच्या त्या कन्या आहेत. आर आर आबा नंतर राष्ट्रवादी ने संपूर्ण जबाबदारी स्मिता ताई यांच्यावर सोपवली आहे व त्या ती जबाबदारी अत्यंत चांगल्या प्रकारे सांभाळत आहेत.

या मध्ये तुम्हाला सर्वात ज्यास्त कोणाचे प्रतिनिधित्व आवडत व का आवडत आम्हाला नक्की कंमेंट मध्ये कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *