मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आज आम्ही तुम्हाला अमोल मिटकरी यांच्या विषयी थोडी माहिती सांगणार आहोत. मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का की “अमोल मिटकरी” नक्की कोण आहेत? तर चला मित्रांनो त्यांच्या विषयी जाणून घेऊ. सध्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभा गाजवण्यात आघाडीवर असणाऱ्या युवा नेत्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे आणि ते नाव म्हणजे, “अमोल मिटकरी” सर्वसामान्य कुटुंबातून आलेले अमोल मिटकरी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर चिटणीस आहेत. सध्या त्यांच्या नंतर डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या सभांना महाराष्ट्रातून सर्वाधिक मागणी आहे. YouTube वर त्यांच्या video वर लाखो Views मिळत आहेत. हे video तितकेच शेअर देखील केले जात आहेत. आता हे अमोल मिटकरी कोण हेच आपण जाणून घेणार आहोत.
भाषणांनमध्ये शायरी पासून श्लोक म्हणून दाखवणारे, रामायण महाभारताचे अभ्यासपूर्ण दाखले देणाऱ्या अमोल मिटकरी यांची पार्श्वभूमी काय ? असा प्रश्न बहुतांश जणांना पडला आहे. अकोला जिल्यातील अमरावती जिल्हा सिमेलगत असणाऱ्या खारपान पट्ट्याचे गाव कुटासा राज्यभरात आपल्या वक्तृत्व शैलीची छाप पडणाऱ्या अमोल मिटकरी यांचे हे गाव… त्यांच्या परिवारावर कर्मयोगी गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा मोठा प्रभाव, जेमतेम दोन एकर शेती सांभाळून किराणा दुकान चालवणाऱ्या त्यांच्या वडिलांनी समाजसेवेची ज्योत त्यांच्या मनात जागती ठेवली आल्याने प्रभोदनाच पुरोगामी विचाराच्या प्रसंग प्रसाराचे काम ते मोठ्या जोमाने करीत आहेत.
विचार व्यक्त करण्याची शक्ती निसर्गाने सर्वांनाच दिली आहे, मात्र त्याचा प्रभावी वापर करून कुटासा सारख्या छोट्या गावातुन थेट देशपातळीच्या आघाडीचा वक्ता होण्याची ख्याती अमोल मिटकरी यांनी प्राप्त केली.

राष्ट्रसंतांच्या भजनाची आवड आणि विचारांचा प्रभाव असणाऱ्या अमोल मिटकरी यांनी लहानपणापासून गुरुदेव भजन व कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रसंतांचे विचार गावा-गावात पोहोचवण्याचे काम केले. आपल्या वक्तृत्व कलेची साधना व उपासनेतून त्यांनी श्रोत्यांवर लहान पणा पासूनच प्रभाव पाडला त्यांनी राज्य घटनेचा सखोल अभ्यास केला, राज्य घटनेतील बारकावे अभ्यासताना त्यांनी महात्मा जोतिबा फुले, राज्यश्री शाहूमहाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारही त्यांनी जाणून घेतले गणेश उत्सव, दुर्ग उत्सव किंवा आणखी कोणताही कार्यक्रम असो आपले विचार मांडण्याची त्यांना प्रभावी वक्तृत्व शैलीमुळे संधी मिळात गेली. सर्व प्रश्नांची उत्तरे राज्यघटनेत असल्याचे ठाम मत ते आपल्या सभांमधून वारंवार व्यक्त करतात. सावरकरांची जन्मगाव असलेल्या भगूर येथे केलेल्या परखड भाषणातून प्रतिगाम्यांच्या त्यांनी समाचार घेतला. विचारपीठावरून उतरतानाच श्रोत्यांनी अक्षरशः त्यांना डोक्यावर घेतले होते.
अमोल मिटकरी यांनी समाजातील अनिष्ट चालीरीती यासह सामाजिक भेदावर कडाडून प्रहार केला. जातीय ताण कमी करण्याच्या त्यांच्या प्रयत्नातून बारामती येथे शारदा व्याख्यानमालेत माझी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या वक्तृत्व शैलीचे कैतुक करीत सोबत काम करण्याची संधी दिली. प्रभावी वक्तृत्व शैलीचा वापर करून कुटासा सारख्या छोट्या गावातून थेट देशपातळीवर आघाडीचा वक्ता होण्याची ख्याती अमोल मिटकरी यांनी प्राप्त केली.
मित्रांनो आम्ही आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्की आवडली असेल, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.