स्वराज रक्षक संभाजी मालिकेतील ही अभिनेत्री आहे खूप दयावान, 40 रुपयांत देते पोटभर जेवण…

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत संभाजी मालिकेतील अश्या एका अभिनेत्री बद्दल जी खूप दयावान आहे आणि ती फक्त 40 रुपयांत पोटभर जेवण देते, तर चला मित्रांनो आपण जाणून घेऊया त्या अभिनेत्री बद्दल व ती नक्की कोण आहे ती……!! मित्रांनो स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमध्ये शिवकन्या राणू अक्काची ही भूमिका प्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी साकारली आहे.

अभिनेत्री अश्विनी ही “अस्मिता” आणि “बॉईज” या चित्रपटामध्ये ही झळकली होती. पण तिला सर्वात ज्यास्त लोकप्रियता ही स्वराज्य रक्षक संभाजी ह्या मालिकेतून मिळाली. जरी राणू अक्काच्या भूमिकेमध्ये पारंपारिक वेशभूषेत दिसत असली तरी ती खरी आयुष्यात तेवढीच glamorous देखील आहेत. अभिनेत्री अश्विनी ही राणू अक्काच्या भूमिकेसाठी जेवढी फेमस आहे त्यापेक्षा ज्यास्त ती तिच्या सामाजिक कार्यासाठी खुप लोकप्रिय आहेत अश्या अनेक अभिनेत्री आहेत ज्या टीव्ही आणि फिल्म क्षेत्रातून भरपूर पैसा कमवतात प्रेक्षकही त्यांच्यावर भरभरून प्रेम करतात. पण प्रेक्षक त्यांच्या प्रेमाबद्दल आणि सामाजिक कर्याबद्दल जाणीव ठेवून जनतेसाठी काही चांगल्या गोष्टी करणाऱ्या अभिनेत्री मात्र फार कमी आहेत. आणि या समाजसेवा करणाऱ्या थोड्या अभिनेत्री पैकी एक नाव आहे, ते म्हणजे अश्विनी महांगडे यांचं अनेक सामाजिक कार्यांमध्ये अश्विनी अग्रेसर असते या सर्व सामाजिक कर्यांमध्ये अश्विनीचे सर्वात मोठे आणि महत्वाचे सामाजिक कार्य म्हणजे अश्विनीने शिव जयंतीच्या मुहूर्तावर मीरा रोड येथे “रयतेचे स्वराज्य परिपूर्ण किचन” हे हॉटेल सुरू केले आहे.

मंडळी ह्या हॉटेलचे विशिष्ट असे आहे की यात बेघर व्यक्तींना मोफत आणि इतरांना कमीत कमी पैशामध्ये म्हणजे अगदी 35 ते 40 रुपयांमध्ये सामान्य जनतेला दर्जेदार आणि पोटभर जेवण दिले जाते. खरच आजच्या महागाईच्या काळात इतक्या स्वस्तात जेवण देणे म्हणजे हे खूप मोठे सामाजिक कार्य आहे. आणि यात त्यांनी कोणत्याही फायद्याचा विचार न करता हे हॉटेल सुरू केले आहे. त्यामुळेच अभिनेत्री अश्विनी यांचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. शिव विचारांची प्रेरणा घेऊन त्यांनी हे हॉटेल सुरू केले आहे. आणि लवकरच संपूर्ण महाराष्ट्रभर हा हॉटेलचा विस्तार केला जाणार आहे. अभिनेत्री अश्विनी ही त्यांचे सामाजिक कार्य रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या प्रतिष्ठान मार्फत त्या करत असतात 19 फेब्रुवारी 2019 रोजी शिवजन्मोत्सवाच्या शुभ मुहूर्तावर त्यांनी किल्ले प्रतापगड येथून या प्रतिष्ठानची स्थापना केली होती. मित्रांनो अभिनेत्री अश्विनी ह्या मूळच्या सातारा जिह्यातील वाई येथील आहेत त्यांचे शिक्षण ही तिथेच झाले आहे. यानंतर त्यांनी हॉटेल मॅनेजमेंट मध्ये उत्तम शिक्षण देखील घेतले आहे. त्यांचे वडील हे नाटकांमध्ये सक्रिय होते त्यांनी अनेक नाटके दिगदर्शिक केले आहेत आणि वडीलांमुळेच अश्विनी नाटकांकडे वळाल्या कॉलेजमध्ये असताना अश्विनी यांनी अनेक एकांकिका आणि डान्स स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.

यानंतर त्यांच्या वडिलांनी दिगदर्शीक केलेल्या “यदा कदाचित” हे त्यांचे पाहिले नाटक…!! कॉलेज च्या काळात अश्विनी सोबत एक गंभीर घटना घडली होती जी तिला आजही आठवते आणि ती घटना म्हणजे ती तिच्या भावा बरोबर कॉलेजमधुन घरी येत असताना तिची ओढणी बाईकच्या चकामध्ये अडकली यामुळे ती खूप जोरात खाली पडली तुला खूप लागलं पण अश्विनी या अपघातातून बचावली हा तीच्या खूप भयंकर दिवस होता. त्यामुळे आजही रस्त्यावरून बाईकने जाणाऱ्या एकाद्या स्त्रीची किंवा मुलीची ओढणी जर हवेत उडत असेल तर अश्विनी त्या स्त्रीला पदर किंवा ओढणी सावरायला सांगते……!!
तर मित्रांनो प्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी महांगडे विषयीची थोडक्यात माहिती आम्ही आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्की आवडली असेल तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा…!!

Leave a Reply

Your email address will not be published.