गावात एकच बस थांबते म्हणून, जेव्हा एका शाळकरी मुलगी थेट आमदारालाच पत्र लिहते तेव्हा…

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या Mahiti.in या वेबसाईट वरती आज आम्ही तुम्हाला कधीही पक्षांतर न करता चक्क अकरा वेळा आमदार झालेल्या गणपती राव देशमुख यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया अस्सल लोकप्रतिनिधी बद्दल… गावात एकच बस थांबते म्हणून, जेव्हा एक शाळकरी मुलगी थेट आमदारालाच पत्र लिहते तेव्हा…

आमच्या गावात एकच बस थांबते. दुसऱ्या बसही थांबण्यात याव्या, म्हणून पेन्नूरमधल्या प्रेरणा गवळी या शाळकरी मुलीने थेट आमदारालाच पत्र लिहिले. तिने लिहिलेल्या पहिल्या पत्राला उत्तर आलं नाही म्हणून दुसरं पत्र लिहिलं. यावेळी तिच्या पत्राची लागलीच दखल घेतली गेली. आमदारांनी पंढरपूरच्या आगारप्रमुखांना फोन केला आणि सोलापूर-पंढरपूर बसला पेन्नूरला बस थांबा सुरू करण्याची सूचना केली. हे एवढ्यावरच थांबलं नाहीतर त्या आमदारांनी प्रेरणाला पत्र लिहिले. ज्यात नागपूरच्या अधिवेशनात असल्याने पहिल्या पत्राला उत्तर देऊ शकलो नाही, असं स्पष्टीकरणही दिलं. साधेपणा आणि मातीशी नाळ राखण्याच्या स्वभावामुळेच लोकांनी त्यांना ११ वेळा आमदार बनवून विधानसभेवर पाठवलं. हे आमदार दुसरे तिसरे कोणी नसून ते आहेत, सांगोल्याचे गणपतराव देशमुख!

महाराष्ट्रातील सर्वात वयस्कर आमदार गणपतराव देशमुख आहेत, गणपतराव देशमुख 94 वर्षांचे आहेत. गणपतराव देशमुख यांनी बाराव्या वेळेस विधानसभा निवडणूक जिंकली आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून गणपतराव देशमुख शेतकरी कामगार पक्षाकडून बाराव्या वेळेस निवडून आले. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम करूणानिधी हे देखिल 12 वेळेस विजयी झाले आहेत.

मात्र ते एवढ्या वेळेस विजयी होऊनही त्यांना अधिक काळ विरोधी पक्षांच्या बाकावर काढावे लागले. दोन वेळेस अल्पकाळासाठी ते मंत्रीही राहिले. सांगोला शहरात एका छोट्याशा घरात ते राहतात.

Leave a Reply

Your email address will not be published.