‘तुझ्यात जीव रंगला’ मालिका होणार बंद ? त्या जागेवर आली नवी मालिका…

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आज आम्ही तुम्हाला झी मराठी वरती चालू असणारी “तुझ्यात जीव रंगला” ही मालिका बंद होणार आहे का? की तिची वेळ बदलणार आहे? अशे प्रश्न पडले असेल तरी हे तितकेच खरे आहे की ह्या मालिकेच्या जागी दुसरी नवीन मालिका येणार आहे. तर चला मित्रांनो ह्याच्या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ. मित्रांनो टीव्ही वरील मालिका पाहताना तुम्ही त्यांच्या कधी भाव विश्वामध्ये हरवता आणि ती मालिका कधी तुमच्या जगण्याचा भाग बनते ते तुम्हाला देखील कळत नाही.

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका “तुझ्यात जीव रंगला” आणि त्यातील लोकप्रिय कलाकार यांच्या भूमिकांमुळे महाराष्ट्राच्या घरा-घरात पोहोचले. यातील प्रत्येक कलाकाराने आपली अशी एक वेगळी ओळख बनवली, लाजरी आणि सोजवळ अश्या “पाटकबाई”, तर रांगडा पण तितकाच भाविक “राणा दा”, भावा वरून जीव ववाळून टाकणारा “सूरज”, गोदाआक्का, लाडू, नंदिता वहिनी, या सर्वांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले मात्र आता ही मालिका प्रेक्षकांचं निरोप घेण्याच्या मार्गावर असल्याचे समजत आहे. सर्वत्र तशी चर्चा देखील रंगली आहे. आता तुम्ही म्हणाल मालिका अशी कशी अचानक निरोप घेईल. आणि तसेही हे निर्मात्यांनी जाहीर देखील केले नाही. मात्र थांबा याबद्दल अधिकृत रित्या जाहीर केले नसले तरी या मालिकेच्या जागेवर त्याच वेळी नवीन मालिका दाखवण्यात येणार आहे,

तशी झी मराठीवर जाहिरात देखील सुरू झाली आहे. त्यामुळे “तुझ्यात जीव रंगला” ही मालिका बंद होण्याच्या चर्चेला अधिकच पुष्टी मिळाली आहे. आता “तुझ्यात जीव रंगला” या मालिकेच्या जागी म्हणजेच संध्याकाळी साडेसात वाजता नवी मालिका सुरू होत आहे, “लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू” अश्या ह्या नवीन मालिकेचं नाव आहे. सध्या अनेक मालिकेच्या टाईटल्स मधून मालिकेच्या कथानकाची थीम सांगितली जाते आणि हा ट्रेन सध्या जोरात सुरू आहे, म्हणून येऊ घातलेली ही नवीन मालिका नक्की कशी असणार या बद्दल सध्या प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या या मालिकेचा झी मराठी वाहिनीवर गोंधळ सुरू आहे ही मालिका 21 सप्टेंबर पासून सुरू झाल्यानंतर तुझ्यात जीव रंगला ही मालिका बंद करावी लागणार किंवा या मालिकेची वेळ तरी बदलली जाणार, मात्र सध्या अजून तरी या मालिकेच्या बदलणाऱ्या वेळेविषयी चैनल कडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

नवीन मालिका सुरू करण्यासाठी घोषणेची किंवा प्रमोची गरज असते कारण त्यातून चैनलला फायदा असतो. एखादी मालिका संपवण्यासाठी त्याबद्दल घोषणा करण्यात चैनल चा कोणताही फायदा नसल्याने त्याबद्दल बऱ्याचदा आधीच घोषणा केली जात नाही. त्यामुळे असे झाल्यास संध्याकाळी साडेसात वाजता “राणा दा” आणि “पाटकबाई” यांना त्यांच्या लाडक्या प्रेक्षकांना मात्र पाहता येणार नाही……!! मित्रांनो तुम्हाला आम्ही दिलेली माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published.