घरामध्ये कासव कोठे ठेवायला हवे, जाणून घ्या घरामध्ये कासव ठेवण्याचे फायदे…

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की आपल्या घरामध्ये कासवाची स्थापीत केल्याने, कासव घरामध्ये ठेवल्याने आपल्याला कोण कोणते लाभ होतात. मित्रांनो जर आपल्या घरामध्ये पैश्यांची जर तंगी असेल, आपल्या घरात जे पैसा टिकत नसेल, किंवा आपल्या घरामध्ये सतत गरिबी आणि दारिद्रय असेल तर मित्रांनो आपण हे कासव नक्की स्थापित करा.

आपल्याला जर एकाद्या कामामध्ये यश मिळत नसेल, वारंवार अपयश पदरी पडत असेल, नोकरी मिळत नसेल, तरी सुद्धा हे कासव आपली मोठी मदत करत. मित्रांनो चिनी शास्त्र भेंगशुई तसेच भारतीय शास्त्र, वास्तुशास्त्र या दोन्हीही शस्त्रांनी या वस्तूच महत्त्व मान्य केलेले आहे. आणि जर आपण धार्मिक दृष्ट्या पाहिलं तर ज्यावेळी समुद्र मंथन करण्यात आलं…! मित्रांनो त्यावेळी जो मदरांचाल नावाचा पर्वत होता, हा पर्वत झेलून ठेवण्याचे काम एका महाकाय कासवाणे केले होते. या कासवाच्या पाठीवरती हा पर्वत ठेवण्यात आला होता मग हे समुद्र मंथन देव आणि दानवांनी मिळून केल होत. लक्ष्यात घ्या हे जे महाकाय कासव होत हे कासव म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून प्रत्यक्ष भगवान श्री विष्णु होते. भगवान विष्णू नारायनांचाच तो एक अवतार होता. आणि म्हणून मित्रांनो ज्या घरामध्ये कासव स्थापित केलं जातं त्या ठिकाणी भगवान विष्णू प्रसन्न होतात. आणि ज्या ठिकाणी भगवान विष्णू त्या ठिकाणी माता लक्ष्मी हे समीकरण आहे.

मित्रांनो तुम्हाला जर धनवान बनायचं असेल घरात जर पैश्याची समस्या नको असेल तर अपल्यावरती माता लक्ष्मी चा कृपा, अशीर्वाद नक्की असायला हवा, आणि हा कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी भगवान विष्णूची भक्ती करण्यावाचून पर्याय नाही. भगवान विष्णूच नमो: नारायनांचं नाव ज्यावेळी तुम्ही घेता त्यावेळी माता लक्ष्मी अपोआप प्रसन्न होत असतात. आणि असे हे विष्णू स्वरूप कासव तुम्ही घरामध्ये स्थापित करता, त्यावेळी कायम स्वरूपी माता लक्ष्मी चा कृपा आशीर्वाद आपल्याला लाभतो. आणि कासव घेत असताना, खरेदी करताना चांदी असेल, तांबे असेल, पितळ असेल, किंवा पंच धातू, किंवा सप्त धातू अश्या वेगवेगळ्या धातूंच कोणत्याही धातूंच खरेदी करू शकता. हे कासव तुम्ही देवघरामध्ये स्थापित करा तुमचा जो हॉल असेल, लिविंग रम असेल त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही हे कासव स्थापित करू शकता किंवा तुमचा जो business आहे, उद्योग धंदा आहे, किंवा तुमचे जे दुकान आहे, ऑफिस आहे, त्या ठिकाणी सुद्धा हे कासव स्थापित करता येत.

हे कासव ठेवताना खाली एक प्लेट ठेवावी व त्या प्लेट मध्ये हे कासव ठेवावे आणि त्या नंतर पूजा करताना हे कासव पूर्ण पणे पाण्यात बुडेल अश्या प्रकारे ते प्लेट मध्ये ठेवाव. आणि मग आपण पूजा करू शकता. कासव ठेवण्यासाठी उत्तर दिशा ही सर्वोत्तम दिशा आहे, कारण उत्तर दिशा ही धनाची देवता कुबेर यांची दिशा मानली जाते. सर्व देवीदेवतांमध्ये कुबेर हे धनाचे देवता म्हणून ओळखले जातात. आणि म्हणून ह्या दिशेला जर तुम्ही कासव ठेवले तर आपल्या घरातील पैश्यांची सर्व समस्या नष्ट होतात. आणि मित्रांनो जर तुम्हाला उत्तर दिशेला हे कासव ठेवता आले नाही तर तुम्ही ते पूर्व दिशेला देखील ठेऊ शकता. पूर्व दिशेला कासव ठेवल्याने आपल्या घरामध्ये आजारपण निर्माण होत नाही. आपल्या घरातील लोकही ज्यास्त आजारी पडत नाहीत. आणि मित्रांनो कासव ठेवताना त्या कासवाचे तोंड आपल्या घराकडे होईल याची नक्की काळजी घ्या.

जर कासवाचे तोंड आपल्या घराच्या बाहेरच्या दिशेला असेल तर मित्रांनो त्यामुले आपल्या घरामध्ये येणार सर्व पैसा, सर्व सुखसमाधान बाहेर जाऊ लागत. आणि त्यामुळे आपल्या घरात शांतता राहत नाही. त्यामुळे मित्रांनो त्या कासवाचे तोंड हे आपल्या घराच्या आतील बाजूस असायला हवे, आणि मित्रांनो कासवा हे कधी दक्षिण दिशेला ठेऊ नका कारण दक्षिण दिशा ही मृत्यू ची देवता यमराज यांची दिशा मानली जाते. आणि या दिशेला कासव ठेवल्या नंतर त्याचे खूप नाकारत्मक परिणाम आपल्याला भोगावे लागते. मित्रांनो आपल्या घरामध्ये कासव ठेवण्यासाठी सर्वोत्तम जागा म्हणजे आपले जे देवघर, ती सर्वोत्तम जागा आहे. आणि जर मित्रांनो आम्ही सांगितलेल्या दिशांमुळे तिथे कासव ठेवता येत नसेल तर तुम्ही ते लिविंग रूम किंवा हॉल मध्ये देखील ठेऊ शकता. परंतु मित्रांनो ते कासव तुमच्या घराच्या किचन मध्ये किंवा बेडरूम मध्ये ठेऊ नका, जर आपल्याला जेगेची अडचण असेल जर रूम्स कमी असतील तर मित्रांनो आपण त्या ही ठिकाणी कासव ठेऊ शकता पण मित्रांनो त्या ठिकाणी स्वच्छता, पवित्रता असावी याची काळजी घ्या.

मित्रांनो कासव स्थापित केल्या नंतर त्याची नित्य नियमाने पूजा केली जाईल याची काळजी आपण घेतली पाहिजे. हे कासव स्थापित करताना एखादा शुभ मुहूर्तावर्ती की जो शुभ दिवस आहे तर असा शुभ दिवस पाहून आपल्या घरामध्ये स्थापित करावं आणि मग त्या नंतर त्याची अगदी नित्य नियमाने त्याची पूजा करावी, ज्यावेळी आपण देवपूजा करतो, सकाळी आणि सायंकाळी त्यावेळी आपण ह्या कासवाची सुद्धा पूजा करायला हवी, मित्रांनो आपण जे कासवावरती जे पाणी टाकत आहोत, ते पाणी रोजच्या रोज बदलले जाईल याची सुद्धा आपण नक्की काळजी घ्या.
मित्रांनो आम्ही आशा करतो की तुम्हाला आम्ही दिलेली सर्व माहिती आवडली आसेल, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.