शरद पवार यांच्या पहिल्या निवडणुकीचा किस्सा…

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आज आम्ही तुम्हाला शरद पवार यांच्या पहिल्या विधानसभा निवडणुकी बद्दल सांगणार आहोत. त्यांना त्यांच्या पहिली निवडणूकी साठी कोणत्या स्थानिक समस्यांना समोरे जावे लागले हे देखील पाहणार आहोत. 1967 ची विधानसभा निवडणुक ऑक्टोंबर महिन्यात होणार होती. त्यावेळी युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते “शरद पवार” आणि त्यांचं वय होत अवघ 26 वर्ष…,

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विनायकराव पाटील यांनी “बारामतीतून संधी मिळाली तर विधानसभा निवडणूक लढवशील का?” अस विचारल. मात्र बारामतीतील सर्व नेत्यांनी एकत्र येऊन शरद पवार या नावाला आक्षेप घेतला. विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीसाठी “शरद पवार” या नावाच्या शुभारस प्रस्तावाला बारामती तालुका काँगेसन “1 विरुद्ध 11” असा निकाल कळवला. जिल्हा काँगेसनेही तो प्रस्ताव तसाच प्रदेश काँग्रेसकड पाठवला. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या निवासस्थानी प्रदेशच्या संसदीय मंडळापुढं उमेदवारांची नाव आणि स्थानिक संघटनांचे ठराव चर्चेला आले. पुणे जिल्हा काँगेसन बारामती तालुका काँगेसकडून आलेला ठराव पुढे करून शरद नवखा आहे….! त्याच्या उमेदवारीला सर्वांचा विरोध आहे त्याचा निवडणुकीत निभाव लागणार नाही अशी भूमिका मांडून पुण्याच्या मालतीबाई शिरोळ यांच्या उमेदवारीची मागणी केली.

मात्र प्रदेशाध्यक्ष पाटील व मुख्यमंत्री चव्हाण यांनी पवारांच्या नावाचा आग्रह कायम ठेवला. विरोधातील एकाला चव्हाणांनी विचारलं “270 पैकी किती जागी काँग्रेस विजयी होईल?” नेता उद्गारला “190 ते 200” चव्हाणांनी प्रतिप्रश्न केला, “म्हणजे 80 उमेदवार पराभूत होतील तर?” नेता म्हणाला शक्य आहे. त्याचा आधार घेऊन यशवंतराव चव्हाण म्हणाले “ठीक आहे मग बारामतीची आणखी एक जागा गेली असे समजा आणि शरदलाच उमेदवारी द्या…!” अश्या प्रकारे शरद पवारांना त्यांच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मिळाली. पण स्थानिक विरोध मात्र कायमच राहिला. यानंतर उत्साह वाढलेल्या शरद पवारांनी बारामती गाठून प्रचाराला सुरुवात केली. तालुका काँगेसच्या सेवा पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले. युवक काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या बाजून तालुक्यातील सर्व युवावर्ग आला, एका बाजूला विरोधात गेलेले बुजुर्ग आणि दुसरीकडे नवीन नावासोबत एकत्र झालेली युवा पिढी….!!

युवा पिढीने त्यावर्षी बारामतीतून या नवख्या उमेदवाराला प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या दुप्पट मतांनी विजयी केलं….!! याच बारामतीने राज्याला पुढे सर्वात तरुण मुख्यमंत्री दिला.
मित्रांनो आम्ही आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्की आवडली असेल, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला कळवा.

2 Comments on “शरद पवार यांच्या पहिल्या निवडणुकीचा किस्सा…”

 1. चांगल्या व्यक्तीला समाजात विरोध होतोच शरद पवार हे बहू आयाम असणारे व्यक्तिमत्व होते
  विरोध असून देखील डळमळून न जाता धीरोदात्तपणे
  निवडणुकीला सामोरे जाऊन केवळ राज्यालाच नव्हे
  तर भारतासारख्या बलाढ्य देशाला एक मार्गदर्शक
  नेता मिळाला हे भारतीयांचे भाग्यच म्हणावे या पुढे
  महाराष्ट्रात तरी असा नेता होणे कठीण बाकी ते काय सांगावे
  त्रिवार वंदन

  1. होते याठिकाणी आहे असे वाचावे

Leave a Reply

Your email address will not be published.