उपवासाला साबूदाणा खिचडीचा फराळ केल्याने काय होते? जाणून घ्या संपूर्ण सत्य…

मित्रांनो स्वागत आहे तुमचे आमच्या mahiti. in या वेबसाईट वरती मित्रांनो उपवासा दिवशी सर्वजण खात असणारा फराळ म्हणजे “शाबुदाना खिचडी” आणि फराळाचे पदार्थ यांच्या विषयी थोडी माहिती तुम्हाला सांगणार आहोत. मित्रांनो या पदार्थांच्या बद्दल सोशल मीडिया वरती पसरवल्या जाणाऱ्या शंका-कुशंका, चांगले-वाईट पणा व त्यामुळे आपल्या उपवसावरती कोणता परिणाम होतो ते आज आपण जाणून घेऊयात.

उपवास असताना आपण जे पदार्थ खोतो ते योग्य की अयोग्य..? उपवास त्यामुळे सफल होईल..? का उपवासाला बाधा येईल..? अश्या अनेक शंका मनात येऊन जर आपण त्या अन्नाकडे शंकेने जर बघत गेलो तर आपल्या मनात त्यामुळे कटुता निर्माण होईल. व आपल्या मनातील कटुता आपल्या शरीरावर आणि आपल्या अध्यात्म वरती प्रतिबिंबित होऊन त्यातून चुकीचा संदेश आपल्या मनाला जाईल ज्यामुळे उपवासाच्या पदार्थांकडे आपण वेगळ्या दृष्टीने पाहू. यामुळे असे काही घडू म्हणून आपण आज येथे या पदार्थांच्या विषयी थोडी माहिती जाणून घेणार आहोत. उपवासाच्या दिवशी बहुतेक सर्वच लोक शाबुदाणा म्हणजे साबूदाणा खिचडी, शाबुदानाची उसळ, किंवा शाबुवडा असे अनेक साबूदाणाचे पदार्थ खात असतात. आपण आत्ता वैज्ञानिक दृष्ट्या शबुदाण्याची किचडी उपवासाठी योग्य की अयोग्य या विषयी जी माहिती मिळाली आहे ते तुम्हाला सांगत आहोत…..!!

साबूदाणाच्या खिचडी मध्ये बटाटा, शेंगदाण्याचे कूट, त्याच बरोबर मिरची हे पदार्थ सर्वजण प्रामुख्याने वापरतात. या पदार्थातील वैज्ञानिक घटक व ते आपल्या उपवासासाठी कसे सहायक ठरतात प्रथम या दृष्टीने आपण साबूदाण्याच्या पदार्थांकडे पाहणार आहोत. तर सर्वात प्रथम जाणून घेऊयात की शाबुदाणा कशापासून बनतो…!! तर हा साबुदाणा Tapioca च्या कंदमुळापासून बनतो व याच्या निर्मिती विषयी बऱ्याच शंका आहेत सोशल मीडिया वरती बऱ्याच पोस्ट आपल्याला दिसतात. परंतु त्याचा शोध घेतला असता साबुदाणा हा अत्यंत आधुनिक तंत्रज्ञान वापरून स्वच्छतेची काळजी घेऊन बनवला जातो. शाबुदाण्यामध्ये Carbohydrate असतात व ते खूप ऊर्जा देतात त्यामुळे हे पदार्थ खाल्ल्याने आपल्याला पोट भरल्या सारखे वाटते. व त्यामुळे भूक लागणे थांबते, त्याचबरोबर याच्यात potassium हा घटकही आहे हा घटक आपल्या शरीररातील ब्लड प्रेशर वरती नियंत्रण ठेवतो आणि त्यामुळे उपवासाच्या दिवशी आपले मन शांत राहते. व देवाचे स्मरण करण्यासाठी ते चांगले योग्य ठरते. या सर्वांमुळे आपल्या पोटाला आराम वाटतो व साबूदाण्या मध्ये कॅल्शियन, Iron, व Vitamin C असल्याने तो शरीराला उत्साह देतो. परंतु शाबुदाणा हा नियमित खाण्याचा पदार्थ नाही….!!

ऊर्जा पुरवणारा हा पदार्थ उपवासाच्याच दिवशी व आठवड्यातून एकावेळस खाणे योग्य ठरेल. साबुदाण्याची खिचडी बनवताना वापरला जाणारा दुसरा पदार्थ म्हणजे बटाटा, ह्याला वैज्ञानिक नाव आहे solanum tuberosum व हे देखील एक कंदमूळच आहे. यात protein, Vitamin C, B carbohydrate, amino acid आणि protein हे पचण्यास सोपे असतात. बटाट्यातील Carbohydrate आणि protein glucose amino acid मध्ये रूपांतरित होऊन शरीराला शक्ती देतात. व एकदा फराळ केला की दिवसभर तुम्हाला ताकद देत राहतो. साबुदाण्याच्या किचडीत तिसरा महत्वाचा पदार्थ म्हणजे शेंगदाण्याचे कूट यात vitamin B 3 हे असतात व ते मेंदूला उत्साहित ठेवतात. व त्यामुळे उपवास करणाऱ्याचे मन शांत आणि क्रियाशील राहते. व त्यात भरपूर प्रमाणात असलेले fibre हे उर्जापुरावठा करतात यामुळे लवकर भूक लागत नाही. आणि त्यात आपण चौथा पदार्थ वापरतो त्याचे नाव आहे हिरवी मिरची ह्यात माधिल असणारा घटक Vitamin C हा आपल्यातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो. व ही देखील गोष्ट आपल्या साठी योग्य ठरते.

तर मित्रांनो आपण आत्ता शाबुदाणा व त्याच्या पदार्थांच्या मध्ये असणारे घटक पाहिले आणि ते घटक आपल्या शरीराला कसे उपयोगी पडतात त्याची माहिती घेतली व या माहितीतून आपल्याला हे समजत आहे की उपवासाच्या दिवशी साबुदाण्याची खिचडी खाणे आपल्या शरीरासाठी योग्य ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published.