मिसेस मुख्यमंत्री मालिकेतील सुमीच्या लग्नातील हे सीन्स नाही आवडले प्रेक्षकांना….

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती मित्रांनो मिसेस मुख्यमंत्री या मालिकेमध्ये आत्ताच म्हणजे रविवारी समर आणि सुमीचे लग्न दाखवण्यात आले आहे. व या लग्नातील काही प्रसंग अतिशय छान दाखवले पण काही प्रसंग हे अशे होते की ज्यामुळे प्रेक्षक प्रचंड नाराज झाले. व काही प्रेक्षकांनी या मालिकेविषयी बनवलेल्या व्हिडीओ खाली कमेंट करून व तसेच मॅसेज करून मालिकेतील या सिन विषयी नाराजी व्यक्त केली आहे. तर मित्रांनो प्रेक्षक नाराज होण्याचे हे कोणते सिन आहेत ते आपण पाहणारच आहोत. पण त्या अगोदर या मालिकेतील काही चांगले सीन पाहुयात.

मित्रांनो या मालिकेतील अभिनेता “तेजस बर्वे” म्हणजे समर याच्या अभिनयाचे खूप कौवतुक होत आहे. तेजस हा समरच्या रूपामध्ये खूप चांगला अभिनय करत आहे. समर आणि सुमीच्या या लग्नामध्ये समरला नवरदेव म्हणून खूप चांगला मेकअप करण्यात आला होता. आणि त्यामुळेच तो खूप छान ही दिसत होता. आणि तसेही तेजस बर्वे हा अभिनेता खऱ्या आयष्यात सुद्धा दिसायला खूप सुंदर आहे. त्यामुळे मुलींमध्ये त्याच्या विषयी विशेष अशी क्रेझ पाहायला मिळते. आणि या मालिकेमुळे तर त्याच्या लोकप्रियते मध्ये खूप वाढ झाली आहे. आणि यानंतर या लग्नातील चांगला सीन म्हणजे नवरीचा आणि तिच्या वाडलांमधील इमोशनल सीन……!!

यातील एक सीन असा आहे की सुमीच्या वडिलांना स्वतःच्याच मुलीच्या लग्नात सर्व स्वयंपाक स्वतः बनवावा लागतो. हा सीन देखील खूप चांगला दाखवण्यात आला आहे. यानंतर लग्नाच्या शेवटी सुमीचे वडील सुमिला सोडून जात असताना त्यांचा रडण्याचा इमोशनल सीन दाखवण्यात आला आहे. हा सीन देखील खूप छान आहे. यानंतर बाबण्या आणि समरचे मामा यांचेही विविध सीन या मालिकेमध्ये पाहायला मिळतात. हे देखील खुप छान आहेत. विनोदी एकटिंग करताना त्यांचा ताळमीळ हा देखील खुप उत्तम आहे. आणि त्यामुळेच या मालिकेच्या सुरवाती पासूनच बाबण्या आणि समरचे मामा यांच्या अभिनयाचे खूप कौवतुक केले जात आहे. तर मित्रांनो ही आहेत या मालिकेतील काही चांगले सीन……!! आणि आता पाहुयात या मालिकेतील असे काही सीन ज्यामुळे प्रेक्षक प्रचंड नाराज आहेत. तर समर आणि सुमीच्या या लग्नामध्ये प्रेक्षक ज्या गोष्टीमुळे सर्वाधिक नाराज आहेत ती गोष्ट म्हणजे सुमीची overacting…….!!

सुमीच्या अनेक सीन बद्दल प्रेक्षकांनी असे म्हटले आहे. की ही अभिनेत्री खूप overacting करते. अभिनेत्री अमृता धोंडगे ही या मालिकेत सुमीची भूमिका साकारत आहे. पण प्रत्येकांना या मालिकेत अमृताचे अनेक सीन हे overacting असल्याचे वाटत आहे. आणि या लग्नातील विशेष सीन म्हणजे सुमी ही स्वतःच्या लग्नात सायकल वरून येते हे तर खरच खूप अति दाखवण्यात आले आहे. आणि हे न पटण्यासारखे देखील आहे. पण शेवटी ती मालिकाच..!! तुम्हालातर माहीतच आहे मालिकांमध्ये काहीही दाखवले जाऊ शकते. पण सुमीच हा सीन मात्र प्रेक्षकांना आवडलेला नाही सर्व प्रेक्षकांनी सुमीच्या या सीन ला overacting म्हंटले आहे. या नंतर समोर येत आहे तर त्यांच्या लग्नातील न आवडण्याची गोष्ट म्हणजे अनेक प्रेक्षकांचे असे म्हणने आहे की सुमीच्या या लग्नातील मेकअप हा व्यवस्तीत न्हवता. म्हणजे समारला ती नवरी म्हणून अज्जिबात शोभत न्हवती. असे त्यांचे म्हणणे आहेत. या लग्नामध्ये सुमीचा मेकअप जसा दिसतो त्यापेक्षा त्यांच्या लग्नातील जे काही फोटो समोर आले आहेत त्या फोटोमध्ये ती खूप छान दिसत आहे असे प्रेक्षकांचे म्हणणे आहे. यानंतर प्रेक्षकांना न आवडलेला आणखीन एक सीन म्हणजे लग्न विधीच्या वेळेस सुमीचे वडील हे बनियन आणि टॉवेल घालून लग्न विधीला बसले आहेत. आणि हे खरच न पटण्यासारखे आहे.

कारण आमदाराच्या घरचं लग्न आहे आणि त्यामुळेच कोणी नवरीच्या बापाला तात्पुरता एखादा शर्ट सुद्धा देणार नाही का….?? त्यामुळेच प्रेक्षकांचे असे म्हणणे आहे की हे सर्व खूप over दाखवण्यात आले आहे. त्यामुळे अश्या प्रकारे अनेक प्रेक्षकांनी कमेंट लिहून संगीतले आहे. काहींना हे लग्न आवडले आहे तर काही प्रेक्षकांना या लग्नावर आणि या मालिकेवर देखील प्रचंड टीका केली आहे.
तर मित्रांनो आम्ही आशा करतो की नेहमी प्रमाणे ही माहिती देखील तुम्हाला आवडली आहे व यामध्ये सांगितलेल्या माहिती प्रमाणे तुम्हाला या लग्नाविषयी काय वाटत आहे ते कमेंट मध्ये लिहून नक्की कळवा……!!

Leave a Reply

Your email address will not be published.