जंजिरा – जेव्हा सिद्दी जंजिरा सोडून पळून जातो….

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या Mahiti.in या वेबसाईट वरती आज आम्ही तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांनी जंजिऱ्यावर केलेल्या आक्रमना विषयी माहिती सांगणार आहोत जो जंजिरा 350 वर्षे अजिंक्य राहिला आहे. तो जंजिरा आपल्या छत्रपती संभाजी महाराजांनी अवघ्या 30 दिवसांत स्वराज्यामध्ये आणला असता परंतु दुर्दयवाने तसे घडले नाही……..!! तुम्हाला सांगूं इच्छितो की संभाजी महाराजांनी “कोंढाजी बाबा” यांच्या मृत्यूनंतर जंजिऱ्यावर भगवा फडकवण्याची मोहीम हाती घेतली तेव्हा नेमके काय झाले…..?? कोंढाजी बाबांच्या मृत्यू नंतर संभाजी महाराजांनी स्वतः जंजिऱ्याची मोहीम हाती घेतली. जंजिरा घेण्यासाठी संभाजी महाराज इरेला पेटले होते.

स्वराज्याच्या हितासाठी जंजिरा किल्ला स्वराज्याला जोडणं अत्यंत महत्वाचे होते. आणि जंजिरा संभाजी महाराजांना आपला ठाव लागू देत न्हवता. आणि संभाजी राजे मागे सरकायला तयार न्हवते. संभाजी राजे आणि जंजिरा यांच्यामध्ये आड येत होता तो म्हणजे जंजिऱ्याचा महादरवाजा जो किनाऱ्यावरून दिसतच न्हवता त्यामुळे आक्रमण करायचे कुठण असा मोठा प्रश्न संभाजी महाराजांना पडला होता. पण संभाजी राजे देखील प्रचंड धाडशी, प्रचंड साहसी, आणि प्रचंड पराक्रमी मग भर बैठकीत संभाजी राजेंनी बहिर्जी नाईक यांना विचारलं “बहिर्जी काका ज्यावेळी जंगली स्वापक पिसळतात तेव्हा नक्की काय करतात….?” बहिर्जी काका यांनी हसत हसत उत्तर दिले “राज त्या जंगली स्वापकांना ताणून ताणून मारतात” आणि मग ताडकन उठले संभाजी महाराज “हा सिद्धी म्हणजे मुजोर आणि माजोर झालेला जंगली जनावरच याला सुद्धा ताणून ताणून मरावं लागेल.” बहिर्जी काका त्या सिद्धी नावाच्या वारुळात हात घालून हा सिद्धी नावाचा साप ठेचायचा आणि असा ठेचायचा की उभ्या आयुष्यात त्यानं मान वरती नाही काढली पाहिजे.

नियोजन ठरलं काम चालू झालं संभाजी महाराजांनी घाट घातला समुद्रातच सेतू म्हणजे पूल बांधायचा आणि अनेकांच्या नजरा विस्फारल्या, डोळे भिरभिरले, भुवया उंचावल्या अरे उसळलेल्या समुद्रात पिसाळलेल्या लाटांत पूल बंधन काय सोपी गोष्ट आहे का….? आणि “जी अश्यक्य गोष्ट शक्य करून दाखवतात त्यांनाच मराठे म्हणतात”……!! आणि काम चालू झालं समुद्रातच सेतू बांधायचं. मोठ मोठे दगड, लाकडी ओंडके, कापसाच्या गाठी, महाकाय झाडं, कपडे लत्ते सर्व काही पाण्यात पडू लागल. आसपासची झाड तोडली गेली, भले मोठे डोंगर पोखरले गेले, आणि सगळी मालमत्ता दर्यात टाकण्यात आली. मावळे तर होतेच पण स्वराज्याची रयत सुद्धा या कामात हातभार लावू लागली. पण समुद्र पूल बांधून देत न्हवत भले मोठे दगड कापसाच्या गाटूल्या आणि लाकडी ओंडके जसेच्या तसे समुद्राबाहेर फेकले जात होते. पण मराठे हार मानायला तयार न्हवते आणि अरे तेवढेच न्हवे तर समुद्र अजूनच चवताळून उठला समुद्राला भरती आली.

समुद्राच्या लाटा उंच उंच उड्या मारत आसमनाशी स्पर्धा करायला लागल्या पण मागे सारतील ते शंभुराजे कसले अरे होळी दिवशी पेटत्या होळीतून नारळ काढणारी जात आमची पाण्याला बागून घाबरतो की काय…….!! अश्याच धैर्याने संभाजी महाराजांनी काम चालूच ठेवलं. आणि तब्बल 800 मीटर लांबीचा पूल बांधून तयार केला. सिद्धी खैरियत खान, सिद्धी कासम खान जंजिऱ्याच्या बुरूजावरण मराठ्यांवर लक्ष ठेऊन उभे होते. पण मराठे काय करतात याचा सुगावा त्यांना लागत न्हवता. संभाजी राजेंनी मोहीम चालू करून तब्बल एक महिना उलटला होता. आणि मागचे 10-15 दिवस तर मराठे शांतच होते. कारण पूल बांधायचं काम चालू होतं पण सिद्धीला समजत न्हवत मराठे इतके शांत कसे अरे शांत बसणं मराठ्यांच्या रक्तातच नाही मग हे इतके शांत कसे…? सिद्धीचा मनात शंकेची पाल पुटपुटली आणि त्याने चौकशी चालू केली मग त्याला आश्चर्याचा धक्काच बसला अंगातील सार बळ निघून गेल दिवसा डोळ्यासमोर चांदण्या चमकू लागल्या जेव्हा त्याला समजलं मराठे समुद्रातच पूल बांधतायत अरे जर हा पुल तयार झाला तर मराठे जंजिऱ्याच्या महादरवाज्याला धडक देतील आणि जंजिरा हातचा जाणार त्याने भय खाल्ले सिद्धीला कळून चुकले की हा संभाजी राजा म्हणजे काय साधा-सुधा न्हवे तर महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेला दुसरा वाघ आहे वाघ……..!!

अरे नाचणारा मोर आणि सत्तेचा जोर कायम स्वरूपी कधीच नसतो, काळ संपला की पिसारा आणि पसारा दोन्ही अटपाव लागतो, आपला काळ संपल्याची जाणीव सिद्धीला झाली. आणि त्याने आपला पसरा आवरायला सुरवात केली.……!! आणि सिद्धीने सामानाची आवराआवर चालू केली, संभाजी महाराजांच्या तावडीतून जर आता वाचायचे असेल तर जंजिरा सोडण्याशिवाय सिद्धीकडे दुसरा पर्यायच न्हवता. सिद्धी खैरियत आणि सिद्धी कासम खान यांनी जंजिरा आपल्या हापश्यांच्या हवाली केला आणि कुटुंब कबिलासह सिद्धी जंजिरा सोडून पळाला………!! समुद्रात दूरवर असणाऱ्या खडकाळ टेकडीवर जीव मुठीत धरून काही वास्तव्यासाठी थांबला.

दुर्दयवाने ही बातमी संभाजी महाराजांच्या कानावर आलीच नाही, दुर्दयवाने ही बातमी मराठांच्या गोठात पासरलीच नाही अन्यथा त्याच दिवशी जंजिऱ्यावर भगवा फडकला असता…….!! आणि 350 वर्षे हा जंजिरा त्या जंजिऱ्यावर फक्त सिद्धीचीच सत्ता राहिली ज्या जंजिऱ्यान सर्वांना सळो की पळो करून सोडल त्या जंजिऱ्याला संभाजी महाराजांनी फक्त 30 दिवसात स्वतःच्या तालावर थय्या थय्या नाचवल आणि भर पाण्यात त्या सिद्धीला घाम फोडला ही ताकद होती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि निधड्या छातीन संभाजी महाराजांच्या सोबत काम करणाऱ्या मर्द मराठयांची…………!!

Leave a Reply

Your email address will not be published.