राज ठाकरे : जेव्हा मनसेची महाराष्ट्राच्या राजकारणात एंट्री होते…

तुम्हा सर्वांचं स्वागत आहे Mahiti.in ह्या वेबसाईट वरती नेहमी प्रमाणेच आजही तुम्हाला आम्ही काही माहिती सांगणार आहोत…..!! ही गोष्ट आहे 30 जानेवारी 2003 या दिवसाची जेव्हा महाबळेश्वर मध्ये शिवसेनेचं अधिवेशन भरलं होत. आणि तिथे उपस्थित असनऱ्यांमध्ये एकच चर्चा सुरू होती ती म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचा उत्तराधिकारी कोण….? राज ठाकरे की उद्धव ठाकरे या वादग्रस्त अधिवेशना बद्दल तुम्हाला सांगणार आहोत. राज ठाकरेच बाळासाहेबांचे उत्तराधिकारी होतील असे अनेकांना वाटत होतं. कारण राज हे विद्यार्थी सेनेच काम आधीपासूनच करत होते. ते काका बाळ ठाकरेंसारखच बोलायचे.

उद्धव ठाकरे आधीपासूनच राजकारणात ज्यास्ती रस दाखवत न्हवते म्हणूनच 2003 सालच्या महाबळेश्वर अधिवेशना आधी अशी चर्चा होती की, बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या जवाबदऱ्यांची विभागणी हे दोन्ही भावांमध्ये करतील, असे पत्रकर मंदार फणसे सांगतात. पण सगळ्यांनाच तेव्हा धक्का बसला जेव्हा खुद्द राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव कार्याध्यक्ष पदासाठी मांडला. पण असे काय झालं याचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला तोडे फ्लॅशब्याक मध्ये जावं लागेल. 1995 मध्ये युतीची सत्ता आल्यानंतर राज ठाकरे हे बाळासाहेबांचे वारसदार तेच असतील अशी चर्चा चालू होती. पण रमेश केनी हत्या प्रकरणात त्यांचे नाव आलं आणि ते राजकारणातून थोडे साईट ट्रॅक झाले. या प्रकरणातून पुढे राज ठाकरे यांची निर्दोष सुटका झाली. पण तोपर्यंत राजकारणात त्यांचं थोडं नुकसान झालं होतं. याच काळात 1997 च्या मुंबई महापालिका निवडणूकापासून उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या सक्रिय राजकारणात entry झाली.

उद्धव ठाकरे यांच्यावर जवाबदऱ्या वाढायला लागल्या तसे राज ठाकरे समर्थकांना सापातन वागणूक मिळत असल्याच्या तक्रारीसुद्धा यायला लागल्या. राजकारणात चाचपडणाऱ्या राज ठाकरेंनी तेव्हा मातोश्री इन्फ्रा ही कंपनी उभा करून बांधकाम व्यवसायात पाय रावण्याचा पर्यंत सुद्धा सुरू केला. सध्या गाजनार कोहिनुर स्कुअरच प्रकरण याच काळात सुरू झालं. उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी 2004 च्या विधांसभा निवडणुकांपूर्वी संजय निरुपम यांना हाताशी धरून उद्धव ठाकरेंनी मी मुंबईकर हे कॅम्पेन सुरू केलं. पण त्याच काळात मुंबईत रेल्वेच्या परीक्षेसाठी आलेल्या उत्तर भारतीय तरुणांना राज ठाकरेंच्या भारतीय विद्या सेनेच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला. एकूणच उद्धव आणि राज या दोन टाळवारींना एका म्यानात राहणं जड जायला लागलं होतं. नोव्हेंबर 2005 माध्ये राज ठाकरे यांनी शिअवसेनेतल्या सर्व पदांचे राजीनामे दिले. आणि महिन्याभरात पक्ष सुद्धा सोडला…..!!

या काळात राज ठाकरे यांची समजूत काढण्याचाअनेकदा प्रयत्न झाला बाळासाहेबांचे निरोप घेऊन मनोहर जोशी आणि संजयराव कृष्णगंजवर गेले होते. पण काही राज समर्थकांनी संजराव यांच्या गाडीची नासधूस केली होती. राज ठाकरे शिवसेना सोडल्यानंतर नेमकं काय करतात याबद्दल साहजिकच सर्वांनाच प्रश्न होता शिवसेना सोडल्यानंतर 2006 च्या जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचा दवरा केला आणि मुंबईत परतल्यानंतर नव्या पक्षाची घोषणा केली….!! “माझ्या विठ्ठला भोवती भडव्यांची गर्दी जमा झाली” हे राज ठाकरे यांच त्यावेळीच वाक्य प्रचंड गाजलं आपल्या पक्षाची पहिली सभा राज यांनी थेट शिवाजी पार्क येथे घेतली. मराठी माणसांच्या आणि भूमी पुत्रांचा जो मुद्दा घेऊन बाळासाहेबांनी शिवसेना स्थापित केली होती. त्याच थाटनेवर मनसेने सुद्धा वाटचाल सुरू केली. पुढच्याच वर्षी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसेचे 7 नगरसेवक निवडून आले….!!

2009 सालच्या आपल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत आपल्या 13 जागा जिंकत दणदणीत प्रवेश केला. त्या पाठोपाठच्या स्थानिक स्वराज्य स्वस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा मनसेची कामगिरी ही लक्षणीय होती. त्यांनी नाशिक महापालिकाही जिंकली, पुण्यात विरोधीनेतेपक्ष देखील मिळवलं, आता माणसे ही शिवसेनेला मागे टाकणार की काय असे वाटत असतानाच मानसेच इंजिन रुळावरन घसरल. ज्या वेगानं तरुण मनसेकडे आकर्षित झाले तेवढ्याच स्पीडने ते त्यांच्यापासून दूर देखील गेले. पक्षातल्या नेत्यांनी तक्रारी केल्या की राज ठाकरे भेटायला वेळच देत नाहीत. एकामागुन एक नेते जायला लागले पक्षाची संघटना छोटी होती, ती सुद्धा खिळखिळी व्हायला लागली. पत्रकार दीप्ती राऊत सांगतात की मराठीच्या मुद्द्यावर आंदोलन करत रस्त्यावर उतरत अनेक तरुणांनी स्वतःवर केसेस घालून घेतल्या होत्या. पण पक्ष्यान त्यांना नंतर जे साथ देणं गरजेचं होतं ते मात्र होताना दिसलं नाही.

जन्माच्या पहिल्या दशकातच मनसेला उतरती कळा लागली. मग अस्तित्व टिकवण्यासाठी मनसेने स्वतः बदल केले 2014 मध्ये मोदींवर स्तुती उधळणाऱ्या राज यांनी 2019 मध्ये स्वतःचा एकही उमेदवार न देता मोदी आणि शाह यांच्या विरुध्द प्रचार केला. शिवसेना सत्तेच्या तळात मळात असताना राज ठाकरे मनसेला विरोधी पक्ष म्हणून पुढे करतायत पण कमकुवत संघटना असतानाही स्वतःच्या वक्तृत्वाच्या बळावर त्यांना किती यश मिळेल हे येणारा काळच ठरवेल……!!
आम्ही दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा…@

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *