या कारणामुळेच Yamaha RX 100 चे उत्पादन बंद केले गेले, जाणून घ्या या बाईकविषयी रहस्यमय गोष्टी…

90 च्या दशकात Yamaha ची बाईक RX 100 खूपच लोकप्रिय होती. पण आजकाल ही बाईक रस्त्यावरून धावताना दिसून येत नाही. 80 च्या दशकात Yamaha RX 100 लॉन्च झाल्यानंतर या बाईकने तिच्या Performance ने सर्व बाईक चालकांना वेड लावले होते. अवघ्या 100 सीसीची क्षमता असूनही, या बाइकने उत्कृष्ट पिकअप आणि वेगाने धावणे, याच्यातून तिने खूप लोकांचे मन जिंकले.

आज जरी , TVS Bajaj KTM , अश्या कित्येक स्पोर्ट्स बाईक्स रस्त्यावर हजारो असल्या तरी Yamaha RX 100 चाहत्यांची कमी नाही. असे बरेच लोक आहेत ज्यांना अजूनही Yamaha RX 100 खरेदी करण्याची इच्छा आहे. या बाईकमध्ये कंपनीने 98 सीसी क्षमतेचे 2-स्ट्रोक, एअर कूल्ड इंजिन वापरले आहे. जे 11 BHP ची पॉवर आणि 10.39 NM चा टॉर्क तयार करतो. विभागातील ही एकमेव बाईक होती जीच्यामध्ये इतकी पॉवर आणि टॉर्क दिले गेले होते.

सरकारच्या मानकांमुळे कंपनीला या बाइकचे Production 1996 मध्ये थांबवावे लागले. आज आम्ही तुम्हाला या बाईकशी संबंधित काही मनोरंजक गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे ही बाईकला अजूनही लोकांनी मनात जिवंत ठेवली आहे.

या बाईकला “second Hand bike” म्हणून अजूनही लोक सर्वाधिक पसंत करतात. Yamaha RX 100 बाईक चे Top Speed 100 Km/h इतके होते. RX 100 ही 100 CC क्षमतेची देशातील सर्वोत्कृष्ट बाईक होती, इमिशन नॉम्स मुळे कंपनीने बाईकचे उत्पादन बंद केले. भारतीय बाजारपेठेत बाईकला लाँच करताना त्या वेळी हिची किंमत ऑन-रोड 19,764 रुपये होती. आपल्या भागात ही पहिली बाईक आहे जिचे “Second Hand ” मॉडेल 1 लाख रुपयांपर्यंत विकले गेले होते. या बाईकच्या इंजिनमध्ये खरच 100 cc इंजिन वापरलेले आहे की नाही याची कित्येक अर्थव्यवस्थांनी तपासणी केली होती. Yamaha ची ही बाईक ताशी 100 किलोमीटरचा वेग पकडण्यासाठी अवघ्या 7 सेकंदाचा अवधी घ्यायची.

Leave a Reply

Your email address will not be published.