गणरायाच्या मुर्तीसारखा दिसणारा कच्चा हिरा सूरत येथील एका व्यावसायिकाच्या घरी मोठ्या संख्येने, भाविकांना आकर्षित करत आहे. या मौल्यवान हिऱ्याचे मूल्य 500 कोटी रुपये अंदाजी केले गेले आहे. गणपतीच्या मूर्तीसारखी दिसणारी ही मूर्ती संपूर्ण सूरतमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. शहरातील कटारगाम भागात राहणारे राजेश पांडव म्हणाले की, त्यांनी २००५ मध्ये खरबडीत हिराचा तुकडा २९’००० रुपयात खरेदी केला होता.
हा हिरा कांगो मधील म्बुजई या खाणीतून लिलावासाठी भारतात आनला होता. ते म्हणाले की “जेव्हा मी हिरा व्यवस्तीत तेव्हा हिरा भगवान गणेशाच्या मूर्तीसारखा दिसत होता. यानंतर,त्याने गणेशोत्सवात त्याची पूजा करण्याचे ठरविले. हा हिरा म्हणजे गणरायाची मूर्ती 24.11 मिमी लांब आणि 16.49 मिमी रूंदीची आहे, जे 27.74 कॅरेटचे बनलेले आहे. ते म्हणाले की “स्थानिक उद्योग संघटनेच्या आग्रहाने २०१६ मध्ये सूरत येथील हिरा उद्योगासाठी वार्षिक प्रदर्शन ‘स्पार्कल’ या प्रदर्शनात त्याचे प्रदर्शन केले गेले. तेव्हापासून याला व्यापक प्रसिद्धी मिळाली.

पांडव म्हणतात की ते एक हिरा व्यापारी होते, तेव्हा त्यांनी हा मोठा हिरा खरेदी केला होता. आता, माझ्याकडे एक लहान पॉलिशिंग युनिट आहे. जेव्हा तुम्ही देवावर विश्वास ठेवतात तेव्हाच तुम्हाला अशा गोष्टी मिळतात. बर्याच लोकांच्या त्यांच्याकडून हिरा खरेदी करण्यासाठी ऑफर आल्या आहेत, परंतु त्यांना तो हिरा विकायचा नाही. ते मूर्ती तिजोरीत ठेवतात आणि फक्त गणेशोत्सवात पूजा करण्यासाठी काढतात.