सोशल मिडियावरती एका रात्रीत सामान्य माणसाचे आयुष्य कसे बदलते याचे जिवंत उदाहरण म्हणजे रानू मंडल या आहेत. आपल्या आवाजाने रानूने इंटरने वापरकर्त्यांना आपले चाहते बनवले. याचा परिणाम म्हणून ती ‘इंटरनेट स्टार’ म्हणून उदयास आली. रानूचे गाणे बॉलिवूड स्टार्सपर्यंतही पोहोचले. त्यानंतर हिमेश रेशमियाने त्यांना त्याच्या चित्रपटात गाण्याची संधी दिली आहे. पण हिमेश रेशमियाच्या आधी एक माणूस आहे जो रानूसाठी देवदूतासारखा धावून आला होता. या व्यक्तीने राणूचा एक व्हिडिओ बनविला जो व्हायरल झाला. चला तर जाणून घेऊया कोण होता तो व्यक्ती ?
पश्चिम बंगालमधील रानाघाट स्टेशनवर फक्त गाणे गाऊन राणू जगत होती. त्यांना बर्याच लोकांनी गाणे गातानाही पाहिले होते पण बर्याचदा लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. रानू अनेकदा जुनी गाणी गात असे. तिच्या व्हायरल व्हिडिओमध्ये ती लता मंगेशकर यांचे एक प्यार का नगमा हे गाणे गात आहे. एक दिवस रानू हे गाणे म्हणत होती, त्यावेळी अतींद्र चक्रवर्ती तिथे उपस्थित होते आणि त्यांनी व्हिडिओ बनविला होता. अतींद्रने हा व्हिडिओ आपल्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यानंतर काय घडले हे सर्वांना माहिती आहे. हिमेश रेशमियासाठी जेव्हा राणू गाण्याचे रेकॉर्ड करीत होते तेव्हा अतिंद्रही स्टुडिओमध्ये होते.

स्वत: अतींद्र त्यावर विश्वास ठेवू शकत नाही की, त्याच्या एका व्हिडिओने एका महिलेचे आयुष्य कसे बदलले. रानुला संधी दिल्याबद्दल अतींद्रने हिमेश रेशमिया यांचे आभार मानले. व्हिडिओनंतर अतींद्र सतत राणूच्या संपर्कात असतो. अतिंद्र हे एक सॉफ्टवेअर इंजिनिर असून ते रानघाट येथे राहतात.

हिमेश रेशमियाचा पुढचा चित्रपट हैप्पी हार्डी एंड हीर हा आहे. यात रानूने तेरी मेरी कहानी हे गाणे गायले आहे. हिमेश रेशमियाने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये रानू स्टुडिओमध्ये रेकॉर्ड करीत आहे. त्यावेळी हिमेश स्वत: जवळ उभे राहून मार्गदर्शन करीत आहे.