१०० कौरवांना एक साथ कसा जन्म दिला गांधारीने, पहा कौरवांच्या जन्माची कथा…

गांधारी ही मूळची गांधार (म्हणजे हल्लीचा अफगाणिस्तान) या देशाची राजकन्या होती. गांधार राज्य भारताच्या वायव्य दिशेला होते. गांधारी ही भगवान शंकराची परमभक्त होती. बाल्यकाळातच गांधारीने रुद्राची आराधना करुन शंभर पुत्र होण्याचे वरदान प्राप्त केले होते. हिच्या वरप्राप्तीची ही हकीगत ऐकूनच भीष्म यांनी हस्तिनापुरचा राजा धृतराष्ट्र याच्यासाठी लग्नाची मागणी घातली. कुरुवंशातील संततिहीनता हिच्या आगमनाने नाहीशी होईल असा या मागणीमागे मुख्य हेतू होता.

यथावकाश, महाभारतातील पितामह भीष्म यांनी गांधारच्या सुबल नावाच्या राजापुढे धृतराष्ट्र आणि कन्या गांधारी यांच्या विवाहाचा प्रस्ताव ठेवला. हा प्रस्ताव गांधार राजपुत्र शकुनीला पसंत पडला नाही. गांधारीला आंधळ्या धृतराष्ट्रासाठी मागणी घालून भीष्मांनी गांधारचा अपमान केला असे त्याला आयुष्यभर वाटत राहिले. परंतु गांधारीने हा विवाहप्रस्ताव स्वखुशीने मंजूर केला व धृतराष्ट्राच्या प्रमाणेही स्वतःलासुद्धा दृष्टीची देणगी नाकारली व तिने आयुष्यभर डोळ्यावर पट्टी बांधून आयुष्य व्यतीत केले.

हस्तिनापुरच्या धृतराष्ट्र राजाची पत्नी आणि दुर्योधनादि शंभर कौरवांची माता असलेली गांधारी ही गांधार देशाधिपती सुबल राजाची कन्या असली तरी ती दक्षकन्या मति हिच्या अंशाने जन्मली होती, असे म्हणतात एक न्यायनिष्ठुर स्त्री या नात्याने व्यासांनी महाभारतात हिचे स्वभाव चित्रण केले असून, दुर्योधनादि पुत्रांच्या हेकेखोर वर्तनामुळे हिच्या मनाची झालेली तडफड महाभारतात अत्यंत प्रभावीपणे चित्रित केली आहे.

गांधारीला विवाहानंतर लौकरच गर्भधारणा झाले. व तो गर्भ 2 वर्ष झाले तरी देखील तिच्या पोटातच होता ह्याच्या मुले ती खूप घाबरली होती नंतर तिला अशी वार्ता अली की कुंतीला युधिष्ठिर नावाचा पुत्र झाला आहे. ही वार्ता समजताच असूयेने हिने आपला अपुर्‍या दिवसांचा गर्भ बाहेर काढला . त्यामुळे लोळागोळा झालेला मृतप्राय गर्भपिंड पुत्र म्हणून हिला प्राप्त झाला, आणि ही शोकातिरेकाने रडू लागली. महर्षि वेद व्यासांनी आपल्या योग दृष्टीने हे पाहिले आणि लगेच गांधारीकडे आले. मग गांधारीने त्यांना तो गर्भपिंड दाखविला.

महर्षि वेद व्यासांनी राजा गांधार यांना सांगितले की तुम्ही त्वरीत शंभर मडकी तयार करा आणि त्याच्यात तूप भरा आणि त्या माडक्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवा नंतर महर्षी वेद व्यासांनी शंकरांची आराधना केली व महर्षी वेद व्यासांनी त्या गर्भपिंडेवर त्यांच्या जवळचे पाणी शिंपडले व त्या गर्भपिंडीचे छोटे छोटे 101मौंसाचे तुकडे झाले नंतर महर्षी यांनी ते तुकडे 101 माडक्यामध्ये ठेवले व्यासजी म्हणाले की, आता हे मडकी दोन वर्षानंतर उघडा. असे सांगून महर्षि वेदव्यास तपश्चर्या करण्यासाठी हिमालयात गेले. नंतर त्या माडक्यांमधून सर्वप्रथम दुर्योधनाचा जन्म झाला व त्याच बरोबर 99 पुत्र आणि एक कन्या जन्माला आली गंधारीला एकुण 100 पुत्र आणि एक कन्या होती.

Leave a Reply

Your email address will not be published.