निरमा पॉवडर वरच्या या मुलीची ही स्टोरी समजल्यावर तुम्हाला धक्काच बसेल…

नव्वदच्या दशकात लोकांचे आयुष्य फक्त एका चॅनेलवर अडकलेले होते. काही ठराविक कार्यक्रम आणि जाहिराती पाहून सुद्धा भारतीय लोक आनंदी होत होते. आजही त्या काळातील काही गोष्टीं आजची पिढी कधीच विसरू शकणार नाही. 90 च्या दशकातील जाहिरातींबद्दल बोलतांना निरमा वॉशिंग पावडर तुम्ही कधीच विसरू शकणार नाही. निरमा वॉशिंग पावडर च्या जाहिरातीत जंगल आजही अनेकांच्या ओठांवर सहज येत. त्याकाळी धुण्याची पावडर म्हणजे निरमा असा अनेकांनी समज करून घेतला होता, इतका हा ब्रँड मोठा झाला होता.

वॉशिंग पावडर निरमाचे ते गाणे तेव्हाही लोक पुटपुटत होते आणि आजही ते लोकांच्या स्मरणात आहे. तुमच्या लक्षात आले असेल की निरमा वॉशिंग पावडरच्या पाकिटावर पांढरा फ्रॉक घातलेली एक मुलगी आहे. पण ही मुलगी नेमकी कोण हे जाणून घ्यायचा तुम्ही कधी प्रयत्न केला का? काय आहे त्यामागची स्टोरी अडचणींचा सामना करत एक साधा वॉशिंग पावडर बनवणाऱ्या कसा झाला एतका यशस्वी. आज आपण या पोस्टमधून समजून घेणार आहोत.

असा आला निरमापाकिटावर मुलीचा फोटो : 1969मध्ये गुजरातचे करसनभाई यांनी वॉशिंग पावडर बनवायला सुरुवात केली. त्यांना एक मुलगी होती तिच्यावर जीवापाड प्रेम करायचे. त्यांच्या मुलीचे नाव निरुपमा होत, पण करसनभाई लाडाने तिला निरमा म्हणायचे. ते तिला आपल्या नजरेपासून दूर जाऊ देत न्हवते. पण नशिबा पुढे कोणाचे काही चालत नाही हेच खरे, एक दिवस कुठेतरी जात असतांना निरूपणाचे अपघातात निधन झाले. करसनभाई ना या धक्क्यातून सावरण्यासाठी वेळ लागला. करसनभाई ची इच्छा होती की निरुपनाने मोठे होऊन नाव कमवावे. पण तिच्या अकाली निधनामुळे त्यांचे हे स्वप्न अपूर्ण राहिले. पण त्यांनी निरमाला अमर करण्याचा दृढ निश्चय केला. त्यामुळे त्यांनी निरमा वॉशिंग पावडर ची सुरुवात केली आणि पाकिटावर निरमाचा फोटो लावला.

brandyuva.in

निरमा साठी सोडली सरकारी नोकरी. करसनभाई सरकारी नोकरी करत होते. दररोज सायकलवर ऑफिसला जाताना रस्त्यात असलेल्या लोकांच्या घरी निरमा वॉशिंग पावडर ची विक्री करत होते. त्या काळी अहमदाबादमध्ये निरमाला चांगली पसंती मिळत होती. करसनभाईनी 3 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर या वशिंग पॉवडेरचा फॉर्म्युला तयार केला. बनवण्यापासून ते विकण्यापर्यंतचे सर्व काम करसनभाई स्वतः करत होते. काही काळानंतर त्यांनी आपल्या नोकरीवर पाणी सोडले आणि निर्माण संपूर्ण लक्ष केंद्रित केले.

अशी झाली निरमाच्या गाण्याची निर्मिती एके दिवशी त्यांनी संपूर्ण टीमला सांगून मार्केट मधील सर्व निरमा पाकीट परत मागवले. टीमला वाटले की करसनभाईनी हार मानली आणि निरमा आता लवकरच बंद होणार आहे. पण करसनभाईच्या डोक्यात वेगळीच कल्पना होती. त्यांनी निरमा ची वेगळीच जाहिरात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर निरमाची जाहिरात शानदार जिंगल सोबत टीव्हीवर झळकण्यास सुरुवात झाली. निरमाने एका रात्रीत संपूर्ण देशाचे लक्ष आपल्याकडे आकर्षित केले. वाशिंग पावडर निरमा हे गाणे लोकांच्या ओठांवर आले. निर माने फक्त आता गुजरातच्या अहमदाबाद मध्ये नाही तर देशात स्वतःची ओळख निर्माण केले होते. आखीर करसनभाईनी निरमाला म्हणजेच आपल्या मुलीला अमर बनवण्याचे स्वप्न पूर्ण केले होते.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.