जेव्हा इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया एका गरीब भारतीय नोकराच्या प्रेमात पडली…

9 व्या शतकाच्या शेवटी, क्वीन व्हिक्टोरियाबद्दलचे वास्तव जगासमोर आले, जे इंग्लंडचे राजघराणे सामान्य ब्रिटीश नागरिकाला स्वीकारायला तयार नव्हते. 22 जानेवारी 1901 रोजी ब्रिटनच्या राणी व्हिक्टोरिया यांचे निधन झाले. राणी राज कुटुंबातील होत्या. त्यांचे पालन पोषण खूप कठोरपणे झाले होते. व्हिक्टोरियाच्या जन्मानंतर 8 महिन्यांतच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या मामानेच त्यांचे शिक्षण केले. असे म्हंटले जाते की व्हिक्टोरियाला एकांकीपणात कोणत्याही माणसाला भेटण्याची परवानगी नव्हती. वृद्ध सेवकसुद्धा त्यांच्याकडे जाऊ शकत नव्हते. जोपर्यंत ती शिक्षकां सोबत अभ्यास करत होती तो पर्यंत तिच्या जवळ तिची आई किव्हा आजी बसे. परंतु इतके काटेकोरपणा असूनही, 19व्या शतकाच्या शेवटी, जगासमोर एक वास्तव आले. जे इंग्लंडचे राजघराणे सामान्य ब्रिटीश नागरिकाला पचवायला तयार नव्हते.

काय होती ती गोष्ट राणीच्या प्रेमात पडल्याची चर्चा सर्व ठिकाणी पसरली होती. जर ती ब्रिटनची राणी होती तर एका राजासोबतच तिचे प्रेम झाले असावे असे वाटले. पण जेव्हा ही बाब लोकांसमोर आली तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. ब्रिटनची पहिली राणी, व्हिक्टोरिया, एखाद्या राजावर नव्हे तर ती एका सामान्य नोकरांच्या प्रेमात पडली होती. तो भारतीय होता.अब्दुल करीम हा एक सडपातळ माणूस होता,ज्याने राणी व्हिक्टोरियाला आपल्या प्रेमात पाडले होते.
व्हिक्टोरिया ही जगातील पहिली राणी होती, जी एकट्या पुरुष सोबत भेटू शकत नव्हती.

कशी सुरू झाली प्रेमाची गोष्ट अब्दुल करीम 24 वर्षांचा होता. जेव्हा ते 1887 मध्ये आग्रा हुन इंग्लंड ला गेले होते. त्यांना भेटी च्या स्वरूपात क्वीन व्हिक्टोरिया यांच्याकडे पाठवण्यात आले होते. वर्षभरातच या तरूणाला राणीच्या दरबारात शिक्षकाचा दर्जा देण्यात आला आणि त्यास राणीला हिंदी आणि उर्दू शिकविण्याच्या सूचना देण्यात आल्या.अब्दुल और विक्टोरिया यांच्या प्रेमाचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा,अब्दुलची डायरी समोर आली. ज्यावरून असे दिसून आले की भारतातून राणीचा नोकर म्हणून ब्रिटनला आलेला अब्दुल करीमच्या राणी कशी प्रेमात पडली. व्हिक्टोरिया आणि अब्दुल यांची कहाणी अगदी चित्रपटातील स्टोरी सारखी होती. श्रीमंत कौटुंबिक मुलगी आणि एक गरीब मुलगा यांच्यातील प्रेम.

काही दिवसांनी अब्दुल करीमची वागणूक इतक्या उंच आणि सुंदर व्यक्तिमत्त्वाची होती की राणी त्यांच्यावर प्रभावित झाली नाही तर, त्याच्या जवळही जाऊ लागली. नंतर अब्दुल करीमच्या नावासमोर मुन्शी ही पदवी लागली. ते राणीचे भारतीय सचिव झाले.जेव्हा राणी अब्दुलच्या प्रेमात पडली तेव्हा ती 60 वर्षांची होती. राणीच्या निधनानंतर किंग एडवर्ड यांनी अब्दुल करीम यांना 1901 मध्ये परत भारतात पाठवून दिले. एवढेच नव्हे तर करीम व महारानी यांच्यातील पत्रव्यवहार त्वरित जप्त करून नष्ट करण्यात आले. करीम व राणी जवळ जवळ 15 वर्ष एकत्र राहिले. घरी परत आल्यानंतर ते आग्रा येथे एकटेच राहत असे. जी शेवटची वर्षे आग्र्या मध्ये घालवली ती संपत्ती राणीने त्यांना दिली होती. 1909 मध्ये जेव्हा अब्दुल यांचे निधन झाले तेव्हा ते फक्त 46 वर्षांचे होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *