जेव्हा कोणी नवीन कार विकत घेतो, तेव्हा आपल्याला अपेक्ष्या पण नसते की आपल्या गाडीची इतकी चर्चा होऊ शकते, की उद्याच्या वर्तमानपत्राची हेडलाईन बनेलं. परंतु कार डोनाल्ड ट्रम्प ह्यांची असेल तर चर्चा होणे साहजिकच आहे. अमेरिका आणि तेथील राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल अशा बर्याच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला ठाऊक नाहीत पण त्यांच्या विषयी नुकतेच एक रहस्य समोर आले आहे. काळजी करू नका, फक्त डोनाल्ड ट्रम्प ह्यांची कॅडिलॅक बीस्ट लिमो कार प्रथमच लोकांच्या समोर आली, जी तेथील लोकांच्या कोणत्यातरी रहस्य पेक्षा कमी न्हवे. डोनाल्ड ट्रम्पची ही कार बीस्ट
ह्या नावाने जगभर प्रसिद्ध आहे, या कारला आतापर्यंत पूर्णपणे रहस्यमय ठेवण्यात आले आहे, तरी तिच्या विषयी काही माहिती समोर आली आहे. चला आम्ही आपल्याला या बिस्ट
ची वैशिष्ट्ये सांगतो:
या कारला 8″ इंच जाड दरवाजे आहेत ज्यांचे वजन बोइंग 757 विमाना एवढे आहे. एकदा या बीस्ट
कारचे दरवाजे बंद झाले की त्यांच्यावर कोणत्याही रासायनीक हल्ल्याचा परिणाम होणार नाही. आणि ह्या दरवाज्यांनवरती कोणताही रासायनिक हल्ला झाल्यास ते आतून स्वतःला सील करू शकतात. कारच्या पुढील दरवाज्यांना 5 इंच येवढ्या जाडीचा थर दिला आहे जो कोणत्याही प्रकारच्या बुलेटचा सामना करण्यास सक्षम आहे. तरी, ड्रायव्हरच्या साइड विंडोमध्ये 3 इंच येवढ्या जाडीची ग्लास आहे जेणे करून आपत्कालीन परिस्थितीत ड्रायव्हर सर्व्हिस एजंटशी संपर्क साधू शकेल.

बीस्ट
ला बुलेट प्रूफ, माइन प्रूफ आणि इतर प्रकारच्या हल्ल्यांपासून पूर्णपणे सुरक्षित करण्यात आला आहे. म्हणजेच, कारवरती कोणत्याही हल्ल्याचा काही परिणाम होत नाही. या कारमध्ये राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प ह्यांच्या रक्तगटाशी जुळणाऱ्या रक्ताचा एक रेफ्रिजरेटर ठेवण्यात आला आहे. गाडीवरती कोणत्याही हल्ल्याला सामोरे जाण्यासाठी एक गण आणि एअरब्याग सुद्धा योग्य त्या ठिकाणी बसविण्यात आले आहेत. बीस्ट च्या समोरच्या लोखंडी जाळीमध्ये विविध प्रकारच्या आधुनिक गण समाविष्ट आहेत. तसेच समोरून हल्ला करणाऱ्यांसाठी त्यांच्या वरती जाळ फेकणारी एक विशेष बंदूक बसवली आहे.

कारच्या मागील ज्या सीटवर्ती डोनाल्ड ट्रम्प बसतात त्या सीट वरती एक Satellite फोन फिट केला आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रॅप डायरेक पेंटागण (अमेरिकन संरक्षण विभागाचे मुख्यालय) यांच्याशी थेट संपर्क साधू शकतात. बीस्ट
च्या चाकांमध्ये स्टीलचे रिम लावलेले आहेत व त्यामुळे चाक पंक्चर झाले तरी कारची गती कमी होत नाही