एकेकाळी रस्त्यावर कचरा उचलत होता हा क्रिकेटपटू…

मित्रांनो, आपण कोणत्याही यशस्वी व्यक्तीला हासत आणि आनंदी असताना पाहत तर असतो, पण त्या व्यक्तीचा त्या टप्प्यावर पोहोचत असताना प्रवास कसा झाला असेल हे आपल्या लक्षात येत नाही. अशीच एक व्यक्ती म्हणजे ख्रिस गेल जो नेहमी हसत असतो. परंतु आपल्यापैकी खूपच कमी लोकांना माहिती आहे की ख्रिस गेलने आपल्या आयुष्यात खूप संघर्ष केला आहे, ख्रिस गेल यांचे कुटुंब एका साध्या झोपडीत राहत होते. घरी अति गरीबीमुळे ख्रिस गेलला त्यांचा अभ्यास पूर्ण करता आला नाही.

आपल्याला हे ऐकून आश्चर्य वाटेल की ख्रिस गेल कुटुंबासाठी अन्नधान्य गोळा करण्यासाठी जागोजागी कचरा गोळा करीत असे. ख्रिस गेलने एका टेव्ही चैनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, कधीकधी खाण्यापिण्यास काही नसताना चोरी करायला भाग पाडायचा. पण त्यावेळी ख्रिस गेल हे माहीत न्हवते की कधी तरी त्याचे नशिब त्याला इतके सात देईल की तो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असेल. गेलच्या क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात लुक्का क्रिकेट क्लब पासून झाली. त्यावेळी ख्रिस गेल 19 वयोगटामध्ये प्रथमच खेळला होता. नंतर त्याने भारता विरुद्ध पहिला वनडे सामना 1999 रोजी खेळला आणि पहिला टी -20 सामना न्यूझीलंड विरुद्ध 2006 मध्ये खेळला होता

कसोटी क्रिकेटमध्ये गेलच्या नावावरती एक अनोखा विक्रम आहे. गेलं जगातील पहिले खेळाडु आहेत ज्यांनी टेस्ट म्याच खेळताना त्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर 6 धावा म्हणजे षटकार ठोकला होता. 2013 च्या आयपीएल सामन्यात बेंगरूळ ( RCB ) टीम मधून खेळत असताना पुणे वॉरियर्स विरुद्ध गेलने फक्त 30 चेंडूत शतक ठोकले होते. गेल मैदानावररती एका वेगळ्या स्टाईलसाठी देखील ओळखला जातो. आनंद साजरा करण्यासाठी गेलने मैदानावर बर्‍याचदा नृत्य देखील केले आहे. त्यांचा प्रसिद्ध गंगनम स्टाईल डान्स कोणाला विसरता येईल.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.