औरंगजेबच्या मृत्युपत्रात संभाजी महाराजांबद्दल काय लिहिलं होतं ? जाणून घेऊया थोडक्यात…

आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनबद्दल खूप आदर आहे. या बाबतीत कसलीच शंका नाही. पण जेव्हा आपण एखाद्या अडाणी माणसाला विचारतो की छत्रपती संभाजी महाराज कसे होते, तो दोनच शब्दात उत्तर देतो. संभाजी महाराज रगेल होते आणि रंगेल होते. या दोन शब्दात महाराजांचा इतिहास संपतो. खर तर आपण कधी इतिहास वाचलाच नाही. इतिहासाच्या तळाशी कधी गेलोच नाही. १४ मे १६५७ रोजी पुरंदरावरती वर एका शिवरत्नाचा जन्म झाला. आपल्या जेष्ठ पुत्राच्या आठवणीत जिजाबाई आऊसाहेबांनी त्याच नाव संभाजी ठेवलं. संभाजी महाराज दीड वर्ष्याचे असताना नियतीने एक चुकी केली. त्याच्या आऊ साहेब शिवाजी महाराजांच्या थोरल्या राणीसाहेब सईबाई यांचं निधन झाले. जिजाई नावाच्या चालत्या बोलत्या छायेत संभाजी महाराज घडू लागले.

वयाच्या १४व्या वर्षी संभाजी महाराजांनी बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिला. आज जरी संभाजी महाराजाचं नाव घेतलं तरी अंगात एक ऊर्जेचा प्रेरणाश्रोत निर्माण होतो. मग तर विचार करा ते त्या राजेचे पुत्र आहेत त्या राजेंच्या कल्याणच्या सुभेदाराची सून मायेने परत पाठवली तो त्या राजेंचा पुत्र आहे. कसा घडला असेल, कसे घडले असेल चरित्र्य, कसा घडला असेल स्वाभिमान, कसा असेल अभिमान, तो औरंगजेब चा मुलगा आला स्वराज्यात राजेंची मदत मागायला.आणि संभाजी महाराजांनी मैत्रीचं प्रतीक म्हणून आपली एक अंगठी अकबराला भेट म्हणून दिली. ती अंगठी अकबराने नाचणारीला दिली. हे कळताच छावा कडाडला. ज्याला मैत्रीची कदर नाही त्याच्याशी कसलाही पदर आम्हाला जोडायचा नाही. ज्याना आपली अंगठी नाचणारीला दिल्यावर इतका संतापतो तर पहा किती मोठं असेल चरित्र्य. औरंगजेबाने जेव्हा स्वराज्यावर आक्रमण केले तेव्हा त्याला ९वर्षे तसभरसुद्धा पुढे सरकू दिले नाही.  

१ फेब्रुवारी १६८९ रोजी बैठक संपवून संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत असतानाच औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने संभाजी महाराज यांच्या ३००-४०० च्या तुकडीवर आपले ३००० चे सैन्य घेऊन संगमेश्वराजवळ चालून आला. मराठ्यांच्या आणि शत्रूच्या सैन्यात मोठी चकमक उडाली. मराठ्यांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्‍नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. शत्रूने संभाजीराजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवि कलश यांना जिवंत पकडले. मराठ्यांचा राजा वैरांच्या मगरमिठीत सापडला.

संभाजी महाराजांना पकडले हे ऐकताच औरंगजेब भयानक खुश झाला. संभाजी महाराज्यांना औरंगजेबाच्या दरबारी पेश केलं. औरंगजेब चा वजीर अश्रफ खान म्हणाला, संभा जुक जाओ, संभा हमारे सामने जुक जाओ, त्यावर कलश म्हणाले राजे हे वह जुकते नही जूकाते हैं। संभाजी महाराज्यांना पाहून औरंगजेब बेभान झाला. आपल्या आसनावरून उठून नमाझ पडायला लागला. हे पाहून संभाजी महाराज म्हणाले, क्ववीजी कवी आहात आपण मग सुचते का यावर एखादी कवीता, त्यावर कवी कलश म्हणाले क्यों नहीं महाराज,

“राजन हो तुम सांच खरे , खूब लढे तुम जंग,
देखत तब चंडप्रताप जही, तखत त्यजत औरँग “।। .

शेवटी इतका त्रास ठेऊन संभाजी महाराजांना मारल्यावर, शेवटी तो औरंगजेब म्हणत राहिला…

” सचमुच छावा है छावा शेर का… हमने आँखे निकाल दी उसकी, लेकिन उसकी आँखे झुकी नही हमारे सामने. ” ” हमने जबान काँट दी उसकी, लेकिन उस जबान से उसने मांगे नही दो लब्ज रहेम के. ” ” हमने हात तोड़ दिए उसके, लेकिन नही फैलाए उसने अपने हात हमारे सामने. ” ” हमने पांव काँट दिए उसके, लेकिन नही टेके उसने अपने घुटने हमारे सामने. ” ” हमने गर्दन काँट दी उसकी, लेकिन उसकी गर्दन नही झुकी हमारे सामने. ” “सचमुच छावा है छावा शेर का ” ….. “या अल्लाह होंगे कामयाब कभी या ऐसे ही लौटना पड़ेगा ख़ाली हाथ देहेल्ली…… “

असे होते आपले राजे आणि अभिमान असला पाहिजे आपल्याला.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.