अरे बापरे, या ठिकाणी अक्षरशः डोक्यावरून जाते विमान….

ग्रीसच्या स्कीअथॉस विमानतळाजवळच्या शांत पर्यटनस्थळाजवळ ब्रिटिश एअरवेजचे विमान पर्यटकांच्या डोक्यावरुन अगदी काही फुटांवरुन गेले . ते जात । असतानाचा नाट्यपूर्ण प्रसंग पर्यटकांनी जीव धोक्यात घालत सेल्फी घेऊन साजरा केला . यू । ट्युबवरुन हे दृश्य व्हायरल झाले . नागरिकांनी या विचित्र साहसाबद्दल नकारात्मक भावना नोंदविल्या. स्कीअथॉस विमानतळ समुद्राच्या अगदी जवळ, काही यार्डावर आहे.

विमानतळाची धावपट्टी केवळ ५,३४१ फूट आकाराची आहे. साहसाचे आकर्षण असलेल्या पर्यटकांना येथील समुद्र आकर्षित करतो. उड्डाण करणारी किंवा उतरणारी विमाने जमिनीच्या अगदी जवळून जात असल्याने वाऱ्याच्या प्रचंड झोताचा फटकारा बसतो. भिंतीवरुन अक्षरशः हे विमान पाहणाऱ्यांपैकी काही जण वाऱ्याच्या वेगामुळे खाली पडले.

इतक्या कमी उंचीवरुन विमानतळाच्या धावपट्टीकडे गेलेल्या या विमानाचा व्हिडीओ नागरिकांनी ऑनलाइन शेअर केला आहे. येथे नेहमीच कमी उंचीवरुन विमाने उतरतात. ती अक्षरश: आपल्या डोक्यावरून जात असल्याचा भास होतो. वाऱ्याचे प्रचंड झोत रोज़ अनुभवण्यास मिळतात. गेल्याच आठवड्यात आम्ही अगदी कमी उंचीवरुन जाणाऱ्या ब्रिटिश एअरवेजच्या विमानाचे अविश्वसनीय दृश्य टिपले, असे यूट्युबवर । प्रसारित झालेल्या या घटनेचे वर्णन एका पर्यटकाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.