5 वी नापास असलेले आजोबा झाले दोन हजार करोड रुपये कंपनीचे मालक.

MDH मसाले अर्थातच महाशय धर्मपाल गुलाटी  मसाल्यांच्या जाहिरातीत तुम्ही एक पिळदार मीश्यांच्या पिळदार आजोबांना पाहिलंच असेल, ते कोणी सामान्य व्यक्ती नसून ते आहेत MDH कंपनीचे मालक धर्मपाल गुलाटी. धर्मपाल गुलाटी हे आज सर्वात वय असणारे CEO आहेत. त्यांना पद्धभूषण पुरस्काराने सुद्धा समानीत करण्यात आले आहे.आज 97 वय वर्ष असूनही ते आज अगदी तंदुरूस्त आहेत. आजही ते आपली कंपनी उत्साहाने सांभाळतात. जिची किंमत आज दोन हजार करोड रुपये आहे. त्यांच्याकडे हे सर्व आधीपासून नव्हते. धर्मपाल गुलाटी हे अगदी सामान्य कुटुंबातील सदस्य होते. मात्र ते त्यांच्या मेहनतीने व स्वतःच्या जिद्दीवर आज हिते आहेत. धर्मपाल गुलाटी यांचा जन्म 27 मार्च 1923 रोजी सियालकोट मध्ये झाला जे आज पाकिस्तान मध्ये आहे.

फाळणीनंतर समस्थ कुटुंब धर्मपाल गुलाटी भारतात आले. जेव्हा ते भारतात आले ठेव्हा त्यांच्याकडे फक्त 1500 रुपये होते. त्या वेळी त्यांनी दिल्ली येते करोलबाग येते अजमल खान रोड वर मसाल्याचे दुकान उभा केले. हळूहळू व्यवसाय वाढत होता वाढत्या व्यवसाय सोबत अडचणीही वाढत होत्या. पण त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. अडचणीही लढत राहिले आणि शेवटी 1500 रुपये पासून सुरू केलेला व्यवसायात ते दोन हजार करोड रुपयांचे मालक झाले. धर्मपाल गुलाटी सर्वात वयोवृद्ध CEO आहेतच सोबत FMCG म्हणजेच फास्ट मोवेइंग काँसुमर गुड्स नुसार,ते पाचवी नापास असतानाही जगातील सर्वात ज्यास्त कमावणारे CEO आहेत.

भारत व दुबई मध्ये मिळून त्यांचे एकूण 18 फॅक्टरी आहेत इथे बनविले मसाले जगभरात पाठविले जातात. धर्मपाल गुलाटी यांना 6 मुली व एक मुलगा आहे जे त्यांना हा व्यवसाय सांभाळण्यास मदत करतात. MDH मसाल्यांच्या एका जाहिरातीच्या शूट मध्ये एक वृद्ध अभिनेता गैरहजर होता, शूटिंग पूर्ण पणे बंद ठेवावा लागणार होता. यावर त्यांनी धर्मपाल गुलाटी यांना ते कॅरॅक्टर प्ले करण्यास सांगितले आणि त्यांनीही ते काम आवडीने केले. त्या वेळे पासून धर्मपाल गुलाटी हे स्वतः त्यांच्या कंपनीचे अबेसिडर आहेत. परिणामी MDH मसाल्यांच्या प्रत्येक जाहिरातीत आपल्या चेहऱ्यावर अनुभवाच्या सुरकुत्या असणाऱ्या वर तदुरुस्त असण्याची छवी मिळते. धर्मपाल गुलाटी यांची एक ठराविक दिनचाऱ्या आहे ते सकाळी लवकर उठतात व्यायाम करतात, योग्य डाएटिंग करतात, वयाचा एवढा प्रवास ओलांडून ही त्यांना कोणतेही व्यसन नाही. म्हणून ते आज फिट आहे आणि आपल्या कंपनीला तितक्याच मेहनतीने व जिद्धीने सांभाळत आहेत.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.