बाळासाहेब ठाकरे आणि दादा कोंडके यांची खासरे मैत्री जी इतरांपेक्षा थोडी वेगळीच होती….

दोन प्रतिभा व्यक्ती अर्थातच दोन तलवारी एकाच म्यानात राहत नाहीत असे म्हणतात. पण मराठी चित्रपट सृष्टीतले सुपर स्टार दादा कोंडके आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मैत्री याला अपवाद ठरली. दोघेही आपापल्या क्षेत्रात वाघ एक भाषणाने फटकारे मारणारा तर एक अभिनयाच्या जोरावर चौकार,षटकार ठोकणार. दोघांमधील साम्य म्हणजे भाषेवरची हुकूमत आणि जनमानसाच्या मनांवर ठाव घेणार हजर जबाबी पणा. लेखक नाटकार वसंत सबनीस लिखित “विच्या माझी पुरी करा” हे नाटक महाराष्ट्र भर धुमाकूळ घालत होते. त्याला कारण होते त्या नाटकातील दादा कोंडके यांचा अभिनय, नाटकात काम करता करता भालजी पेंढारकर यांच्या तांबडी माती या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. दरम्यान दादांनी स्वतः चित्रपट निर्माण करण्याचा निर्णय घेतला,आणि त्यांनी सोंगाड्या चित्रपटाची निर्मिती केली. साधारण 1973-74 चा तो काळ त्या काळात मराठी माणूस चित्रपट सृष्टीत असला तरीही त्यावर अधिराज्य होते ते हिंदी भाषिकांचेच त्या मुळे मराठी माणसाचे बेनर वाले चित्रपट वगळता इतरांचे चित्रपट लावायला थेईटर मालकांचा नकार असे. त्यात सोंगाड्या दादा चां पहिला चित्रपट.

दादांना चित्रपट प्रदर्शित करण्याचा ना अनुभव होता ना पैसा त्यामुळे कोहिनुर चित्रपट मालकाने दादांचा चित्रपट प्रदर्शित करण्यास नकार दिला. त्या वेळी दिंनदिव्या हा चित्रपट कोहिनुर ला लागला होता. दादांचा पहिलाच सिनेमा थेईटर न मिळाल्या मूळे राखडतो काय अशी स्तिथी निर्माण झाली होती. दरम्यान मुबईत शिवसेनेचा बोल बाला वाढत होता. दादांची थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. मराठी माणसाचा चित्रपट प्रदर्शित करायला थेईटर मालक नकार देतो ही गोष्ट बाळासाहेबांना खटकली. बाळासाहेबांनी आदेश दिला आणि दादांचा चित्रपट झळकला. तेव्हापासून अखेर पर्यंत दादांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. दिवसेंदिवस दादांच्या यशाची कमाल वाढतच राहिली. मराठी रसिकांनी दादांवर भरभरून प्रेम केले. बाळासाहेबांच्या आदेशावर दादांचा सोंगाड्या कोहिनुर वर झळकला आणि ठेव्हापासून दादांची आणि बाळासाहेबांची मैत्री घट्ट झाली. जेव्हा बाळासाहेब नाराज असत, तेव्हा त्यांच्या खोलीत एकाच माणसाचा प्रवेश असे ते म्हणजे दादा कोंडके बाळासाहेबांनी ही त्यांची मैत्री अखेर पर्यंत सांभाळली. इतके की बाळासाहेबांचे निधन झाल्यावर्ती शिवतीर्थावर अखेर चे भाषण करताना बाळासाहेबांची दादांची आठवण काढली होती.

आपल्या चित्रपटातून दादांनी अनेक नेत्यांची खिल्ली उढवली होती. अगदी यशवंत राव चव्हाण ते शंकरराव चव्हाण ते शरद पवार यांच्या पर्यंत. पण दादांनी बाळासाहेबांवर कधीही अशब्द वापरला नाही. एकदा तर एका राजकीय नेत्यांनी राजकीय पक्ष्यानवरती टीका करण्यास सांगितले. त्या वर दादा म्हणाले मी कोणावर ही ठिका करेन पण शिवसेना व बाळासाहेबांवर टीका करणार नाही. असे स्पष्ट सांगून टाकले. दरम्यान राज्यात युतीचे सरकार आले आणि अनेकांनी मंत्री पद मिळवण्यासाठी मातोश्री वर यायला सुरुवात केली. बाळासाहेबांनी अत्यंत जवळच्या व्यक्तींना त्या बद्धल विचारले अर्थातच बाळासाहेबांनी दादांची विचारले. तुम्हाला कोणते मंत्री पद हवे आहे. दादांना सांस्कृतिक मंत्री पद देण्याचा विचार होता. तेव्हा दादांनी बाळासाहेबांना विचारले तुम्ही कोणते मंत्री पद घेणार, मी शिवसेना प्रमुखच राहणार असे बाळासाहेब म्हणाले. त्यावर मी ही शिवसैनिकच राहणार असे दादा म्हणाले. दादा अनेकदा शिवसेना नेत्यांच्या प्रचाराला ही जात असे. तिथे ते आपल्या भाषणात डबल मिंनिंग बोलायचे. अगदी डबल मिंनिंग बोलून नेत्यांचीही खिल्ली उडवत असे. अश्या भाषणाने दादांचे शत्रू ही अनेक झाले होते. त्यामुळे दादांवर शत्रू हल्ले करतील असे मित्र त्यांना सांगत असे. तेव्हा दादांना घरी पाठवण्यासाठी शिवसेनिकांचा ताफा दादांच्या मागे असायचा. जवळपास 5-50 लोकांचा ताफा त्यांच्या बरोबर असायचा. जो पर्यंत दादा घरी पोहचण्याची खात्री होत नसे, तो पर्यंत शिवसेनीक दादांचा पिच्छा करायचे. दरम्यान शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व दादा कोंडके हे दोघेही आपल्यात नाहीत. मात्र दोघांपैकी एकाची आठवण आली तर दुसऱ्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.