मुंबईत चाळीत राहणारा मुलगा ते बॉलिवूडचा सुपर स्टार, गोविंदाचा थक्क करणारा जीवनप्रवास…

मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना मनमुराद हसवणार्या कधी कॉमेडी तर कधी ड्रामा करून तर कधी प्रेक्षकांना आपल्या ठेक्यावर नाचायला लावणाऱ्या गोविंदा शिवाय बॉलीवूड कायम अपूर्ण असेल. गोविदांचे सिनेमे आता फार काही चालत नसतील मात्र याच बॉलिवूडला कधी काही गोविंदाचे सिनेमांनी जिवंत ठेवलं होतं. गोविंद आणि त्याच्या आयुष्यात चाळीत राहण्यापासून सुपरस्टार आणि खासदार असा मोठा प्रवास केला आहे. त्यामुळे गोविंदाचा आयुष्यातील या घटना तुम्हाला प्रेरणादायी ठरेल. गोविंदा चे वडील अरुण कुमार अहुजा हे अभिनेते होते. तर त्याची आई निर्मलादेवी या गायिका होत्या. त्याच्या वडिलांनी औरत तसेच आणखी काही चित्रपटात काम केले होते. त्यानंतर त्यांनी एका चित्रपटाची निर्मिती केली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला आणि त्यांची आर्थिक परिस्थिती पूर्ण ढासळली.

मुंबईमध्ये चांगल्या घरात राहणाऱ्या त्याच्या कुटुंबावर विरार मधील एका चाळीत राहण्याची वेळ आली. यानंतर गोविंदा चा जन्म विरार मध्ये झाला. त्याला लहानपणापासूनच सिनेसृष्टी विषयी मोठे आकर्षण होतं. विरार मध्ये त्याच्या घरासमोरचं एक छोटं थेटर होतं. या थेटरमध्ये तो दिवसाला 2चित्रपट तरी पाहायचा वयाच्या पंधराव्या वर्षी तो रोज विरार हुन ट्रेनने राजश्री प्रॉडक्शनच्या ऑफिस मध्ये काम मागण्यासाठी जात असे आणि त्याला तिथून अनेकदा हाकलून दिले जायचे.

त्या काळात मिथुनची मोठी क्रेझ होती. मिथुनचा डिस्को डान्सर चित्रपट पाहून त्याला सुद्धा डान्स शिकण्याची जबरदस्त इच्छा झाली. त्यामुळे त्याने सरोच खानच्या अकॅडमीत डान्स शिकण्यासाठी प्रवेश मिळवला. तो इतका चांगला डान्स करत होता, की काही महिन्यातच इंस्ट्रक्टर म्हणून त्याची निवड करण्यात आली. त्याचं काम पाहून त्याच्या मामाने गोविंदाला तन बदन या सिनेमात पहिला ब्रेक दिला.

Superstarsbio .com

सिनेमात काम देण्याअगोदर गोविंदकडे केस कापायला पैसे नव्हते. मामाने यासाठी त्याला पैसे दिले, परंतु हा सिनेमा पूर्ण होण्याअगोदर त्याचा एक्झाम सिनेमा प्रसिद्ध झाला. या चित्रपटापासून त्याने त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी आजवर आखे, साजन, चले ससुराल, दिवाना मस्ताना, राजा, बडे मिया छोटे मिया, हसीना मान जाएगी, शिकारी, जोडी नंबर वन, क्यूको मैं झूट नहीं बोलता, अखियो से गोली मारे, पार्टनर या हिट चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

गोविंदाची प्रसिद्धी पाहून 2004 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने गोविंदाला लोकसभेचे तिकीट दिल. यावेळी गोविंदाचा समोर भाजप करून ज्येष्ठ नेते विद्यमान खासदार केंद्रीय मंत्री राम नाईक होते. जे या ठिकाणी तब्बल 1981 पासून खासदार होते. राम नाईक याच पारडं या मतदारसंघातून जड मानलं जात होतं. या निवडणुकीवेळी गोविंदाने त्याची संपत्ती तब्बल 250 कोटी घोषित केली होती. गोविंदाने या ठिकाणी जोरदार प्रचार केला, यावेळी त्याने राम नाईक यांचा पराभव करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.