51 वर्षाची झाली सलमान खानची पहिली अभिनेत्री भाग्यश्री दिसते खूपच ग्लॅमरस ! फोटो पाहून विश्वास बसणार नाही ..

‘मैंने प्यार किया’ या चित्रपटात सलमान खानची नायिका बनलेल्या भाग्यश्रीने त्या काळात आपल्या निरागसतेने सर्वांची मने जिंकली होती. पन्नाशी ओलांडलेली भाग्यश्री आजही स्टाईलच्या बाबतीत बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींना मागे टाकते. तिचे फॅशन स्टेटमेंट आणि निरागस सौंदर्याने तिच्या चाहत्यांची ह्रदये आजही धडधडतात. भाग्यश्रीच्या स्टायलिश फोटोंचा सोशल मीडियावर बोलबाला असतो.

आज आम्ही तुम्हाला तिचे काही अतिशय सुंदर आणि स्टायलिश फोटो दाखवत आहोत. तिचा हा लूक पाहून भाग्यश्री 50 वर्षांची आहे हे सांगणे खरोखरच कठीण आहे. अभिनेत्रीने ब्लॅक टॉपसह लाल रंगाचा शॉर्ट स्कर्ट घातला होता आणि या लुकला ग्लॅमर येण्यासाठी काळे बूट घातले होते. खुल्या केसांमध्ये आणि कमीत कमी मेकअपमध्येही भाग्यश्री खूपच सुंदर दिसत आहे.या पांढऱ्या रंगाच्या डिझायनर गाऊनमध्ये भाग्यश्री एखाद्या जलपरीसारखी दिसत आहे.जेव्हा क्रु मेंबरसमोर नोरा फतेहीचा टॉप घसरला, अभिनेत्री ठरली उप्स मोमेंटची शिकार

हेवी डायमंड ज्वेलरी आणि परफेक्ट मेक-अप तिला आणखी सुंदर बनवतो. हा फोटो पोस्ट करताना भाग्यश्रीने स्वतः लिहिले की, अशा पोशाखात फक्त फोटोसाठी पोज देणे चांगले आहे, महिला हे कपडे घालून कसे चालतात हे त्यानंच माहित. यावरून असे दिसून येते की जेव्हा पोशाखांचा विचार केला जातो तेव्हा ती नेहमी आरामाची काळजी घेते. भाग्यश्री अगदी कॅज्युअल लूकमध्येही सुद्धा आजही सध्याच्या अभिनेत्रिणा मागे टाकते.

 

निळ्या डेनिम जीन्ससह या तपकिरी रंगाच्या लेदर जॅकेटमध्ये भाग्यश्रीचा लूक जबरदस्त दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावरील निरागसतेमुळे भाग्यश्री प्रत्येक आउटफिटमध्ये अप्रतिम दिसते.बर्‍याचदा लांब केसांमध्ये दिसणारी भाग्यश्री लहान केसांमध्ये खूपच स्टायलिश दिसते. या लूकमध्ये बोब हेअरकटमध्ये दिसणारी भाग्यश्री आजच्या बॉलिवूड अभिनेत्रींना ग्लॅमरच्या बाबतीत टक्कर देत.

भारतीय लूकसोबतच वेस्टर्नमध्येही भाग्यश्री नेहमीच आकर्षक दिसते. या ग्रे कलरच्या रफल साडीमध्ये भाग्यश्री देसी स्टाईलमध्ये दिसत आहे. साडीसोबत स्टायलिश दिसण्यासाठी तिने बांगड्यांऐवजी हातात ब्रेसलेट आणि घड्याळ घातले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.