सकाळी ८ वाजल्यानंतर स्नान करणार्‍या महिलांनी ही माहिती जरूर वाचा- गरुड पुराणात श्रीकृष्ण काय म्हणतात!

नमस्कार, तुमचे स्वागत आहे. आपल्या रोजच्या जीवनातील काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला खूपच सामान्य वाटतात. आपण त्या गोष्टी एक दिनचर्या म्हणून करताच राहातो पण त्यापाठी काय शास्त्र आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. जर सखोलपणे विचार केला, तर असे समजून येईल, की आपल्या पूर्वजांनी आपल्यावर जितके म्हणून संस्कार केले आहेत किंवा ज्या सवयी आपल्याला लावल्या आहेत त्या आपल्यासाठी खूपच लाभदायक असतात.

स्नान हे सुद्धा आपल्यासाठी रोजचे एक जरूरी काम असते व स्नान केल्यामुळे आपल्या शरीरास होणारे फायदे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहेत. शास्त्रानुसार स्नान हे एक महत्वपूर्ण व उत्तम असे कार्य आहे. पण तुम्हाला माहीत आहे का स्नानाची एक पद्धत व योग्य अशी वेळ असते? आपण नेहमीच आपल्या इछा व सोईप्रमाणे दिवसात कोणत्याही वेळी स्नान करतो. पण आपली ही सवय खूप चुकीची आहे. ह्यामुळे फायदे कमी व नुकसान जास्त असते.

आपल्या महान शास्त्रापैकी गरुडपुराण ह्यामध्ये आपल्या जीवनातील प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीचा उल्लेख केला गेला आहे आणि जिवन -मृत्यू तसेच स्वर्ग- नरक याबरोबरच धर्म, व्यावहारिक ज्ञान, संस्कार, आचरण, व्यवहार इत्यादिविषयी खूप काही सांगितले गेले आहे. आज आपण जाणून घेऊया गरुडपुराणानुसार स्नानासाठी कोणती वेळ उत्तम आहे, स्नान किती प्रकारचे असतात, व त्याचे काय लाभ व हानी आहेत. जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, तर करा व माहिती आवडली तर लाइक व शेअर करायला विसरू नका.

सगळ्यात प्रथम आपण जाणून घेऊया स्नानाचे किती प्रकार आहेत. शास्त्रानुसार ब्रम्हस्नान, देवस्नान, ऋषिस्नान, मानवस्नान, व दानवस्नान हे स्नानाचे मुख्य प्रकार असतात. त्यांचे वेळेनुसार वर्गीकरण केले गेले आहे. गरुडपुराणानुसार ब्रम्हमुहूर्तावर केलेले स्नान हे सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. ब्रम्हमुहूर्त म्हणजेच रात्रीचा अंतिम प्रहर व सूर्योदयापूर्वी ठीक दीड ते २ तास आधीची वेळ. म्हणजेच सकाळी ४.३० ते ५ पर्यंतची वेळ.

शास्त्रामध्ये ही वेळ दिवसातील सर्वश्रेष्ठ वेळ मानली गेली आहे. कारण या वेळी वातावरणात अद्धभूत व चमत्कारी ऊर्जा असते, कारण ही वेळ देवतांची असते. त्यामुळे देवतांचे स्मरण करून ब्रम्हमुहूर्तावर केलेले स्नान हे सर्वश्रेष्ठ स्नान मानले गेले आहे. ह्यावेळा स्नान केल्यामुळे व स्नानाच्या लगेच नंतर सूर्यदेवाला अर्घ्य दिल्यामुळे आपल्या जीवनात सुख, समृद्धि व शांति येते. दिवसभर आपले तन व मन सकारात्मक उर्जेने भरलेले राहाते.

दुसरे आहे देवस्नान- सकाळी ५ ते ६च्या दरम्यान केले गेलेले स्नान हे देवस्नान आहे. सगळ्या पवित्र नद्यांचे स्मरण करून केल्या गेलेल्या स्नानाला श्रेष्ठ स्नान मानले गेले आहे. या वेळेला स्नान केल्यामुळे आपल्या शरीरात सकारात्मक ऊर्जा संचार होते व नकारात्मकता व वाईट विचार आपल्या शरीरातून बाहेर निघून जातात. मन शुद्ध होते.

तिसरे म्हणजे सकाळी जेव्हा आकाशात तारे दिसतात त्या वेळी केलेले स्नान हे ऋषि स्नान मानले जाते. हे पण श्रेष्ठ स्नान आहे. आपल्याला ह्यामुळे मानसिक शांति मिळते.

चौथे स्नान म्हणजे ६ ते ८ या वेळेत केलेले स्नान मानव स्नान मानले गेले आहे. हे स्नान सूर्योदयाच्या वेळी किंवा लगेच नंतर केले जाते. हे स्नान पण चांगले मानले गेले आहे. यामुळे दिवसभर सकारात्मक ऊर्जा व्याप्त राहाते.

पाचवे स्नान सकाळी ८ वाजल्यानंतर केलेले स्नान. हे स्नान योग्य मानले गेले नाही. ह्यावेळी वातावरणात असलेल्या देवी, शक्ति कमी होतात. त्यामुळे मनुष्यात उत्साह, ऊर्जा याची कमतरता दिसून येते. ज्यामुळे दिवसभर आळस जाणवतो. पूर्ण दिवस सुस्ती राहाते. ८ वाजल्यानंतर स्नान करणार्‍या महिलांच्या जीवनात दुर्भाग्य राहाते.

सहावे स्नान म्हणजे दानव स्नान- दुपारी १२ वाजल्यानंतर केलेले स्नान म्हणजे दानव स्नान. अशा लोकांच्या मनात दिवसभर क्रोध, राग, द्वेष, कमजोरी, चीडचिडेपणा राहातो. त्यांच्या जीवनात संकटे येतात. गरुडपुराणात ब्रम्हस्नान, ऋषिस्नान, देवस्नान, मानवस्नान करण्याचे सांगितले आहे. ईश्वराच्या पूर्ण श्रद्धेने, सूर्यदेवतेला अर्घ्य दिल्यामुळे आपले तन व मन शुद्ध होते.

स्नान करताना “गंगेच यमुनेच एवम गोदावरी, सरस्वती, नर्मदे, सिंधु, कावेरी जल स्मिन संनिधी करू” हे गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधु, कावेरी माझ्या स्नानाच्या पाण्यात तुम्ही सगळ्या या.” असा मंत्र जप केल्यामुळे नकारात्मकता निघून जाते, आजार नाहीसे होतात व व्यक्ति सुखी व समृद्ध राहातो. धन्यवाद.

टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवनेचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published.