नमस्कार मित्रांनो एका विड्याच्या किंव्हा खाऊच्या पानाचा अशा पद्धतीने वापर करा आयुष्यामध्ये पोट साफ होण्यासाठी कुठल्याही प्रकारचे चूर्ण किंव्हा गोळी घ्यावी लागणार नाही. खासकरून पोटामध्ये गॅस होणं पूर्णतःहा बंद होईल, पोटाची संबंधित जेवढ्या पण समस्या असतील त्या कायम स्वरूपी निघून जातील तेही सात दिवसांमध्ये.
सात दिवसांमध्ये तुम्हाला याचा इतका जबरदस्त फायदा दिसून येईल की त्या नंतर पोट साफ होण्यासाठी कोणत्याही प्रकारचा औषध घ्यावं लागणार नाही. उपाय अगदी सोपा आणि साधा आहे. याचा आणखी शरीराला जबरदस्त फायदा म्हणजे तुमचा हायबीपी चा त्रास, रक्त घट्ट झालेलं असेल तर ते सुद्धा याने पूर्णपणे नॉर्मल होत.
मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त दोन गोष्टी लागतात. एक म्हणजे खाऊच पान. सात दिवस आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यामुळे दररोज नवीन पान लागणार आहे. पानाचा उपयोग सुगंधी पदार्थ आणि पोटातील वायुनाशक म्हणून अनेक वर्षांपासून होत आहे.
अनेक प्रकारच्या रोगांवर हे पान उपयोगी ठरत. दुसरी गोष्ट आपल्याला लागणार आहे लसूण. लसूण हा अनेक प्रकारच्या आजारांवर उपयोगी ठरतो. लसूण तुमच्या शरीरातील पित्त कमी करतो. यकृताचे आणि पित्ताशयाचे जेवढे पण विकार असतील ते हा लसूण कमी करत.
त्याचबरोबर पोटामधील जंत, मेला पुढे ढकलण्याची गती वाढवत. असा लसूण आपल्याला दोन पाकळ्या घ्यायचा आहे. एक पान आपल्याला स्वच्छ धुऊन घ्यायच्या आहेत त्या मध्ये दोन लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि जेवणानंतर लगेचच आपल्याला हे पान खायचे आहे.
दिवसातून दोन वेळा आपल्याला हा उपाय करायचा आहे. सकाळी जेवल्यानंतर एक आणि संध्याकाळी जेवल्यानंतर एक वेळेस. असं फक्त तुम्ही सात दिवस करून पहा. त्यानंतर पोटामध्ये अजिबात गॅस होणार नाही. करून पहा अतिशय साधा उपाय आहे. हे दोन्ही पदार्थ खाल्यानंतर जर तुमचं तोंड तिखट झालं तर त्यानंतर थोडा मध खा.
टीप: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.