घराजवळील ही वस्तू वापरा फक्त 2 मिनिटात धान्यातील किडे पळून जातील, पुन्हा धान्यात कीड कधीच नाही!

मित्रांनो धान्य वर्षभर आपल्याला पुरावे म्हणून धान्य साठवून ठेवत असतो परंतु, याच धान्यामध्ये साधारणता बारा प्रकारचे किडे तयार होतात. यामध्ये सोंड, भुंगेरा, खापरा, तांडळातील पतंग असे किडे तयार होतात.

हे किडे जास्त पावसाळ्यात व हिवाळ्यात पाहायला मिळतात. पावसाळ्यात व हिवाळ्यात असणारे तापमान व आद्रता पोषक ठरते म्हणून या ऋतू मध्ये धान्यांना जास्त जपावे लागते. कीटकांचा जीवनक्रम 1 ते 15 दिवस असून, त्यांची प्रजनन क्रिया खूप असल्याने त्यांची संख्या झपाट्याने वाढते.

कृषितज्ञांच्या मतानुसार धान्याला कीड का लागते तर किडा, भोंगेरा, सोंड यांचा प्रादुर्भाव शेतात धान्य पिकत असतांनाच होतो. पिकलेल्या धान्यावर ते अंडी घालतात आणि अशा रीतीने शेतातील उपद्रव धान्यात येतो आणि नंतर घरी येतो. साठवणुकीची साधने पोते यामध्ये किडे आसरा शोधतात. म्हणूनच खबरदारीचे उपाय करणे दक्षता घेणे आवश्यक असते.

त्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे धान्य उन्हात चांगले वाळवावे. धान्य भरण्याची साधने नेहमी स्वच्छ व कोरडी ठेवावी. जुनी पोती वापरायची झाल्यास शक्यतो धुन वापरावी. धान्य ठेवायची जागा स्वच्छ कोरडी असावी. चला तर पाहुयात हा उपाय कसा करायचा.

अशा या उपायासाठी मित्रांनो आपल्याला लागणार आहे वेखंड. वेखंड या साठी खूप उपयुक्त आहे. या उपायासाठी वेखंडच का घ्यायचा तर वेखंडाच्या चूर्णाच्या वासाने ढेकूण, पिसवा, किटक, तिथे थांबत नाहीत.

घरातील साहित्याने वेखंडाचे चूर्ण करून घ्या. हे चूर्ण एक कापड घ्या त्यामध्ये हे चूर्ण टाका त्याची पोटली बनवा आणि पोटली धान्यामध्ये टाका. या चूर्णाच्या वासाने धान्यातील किडे, पिसवा, ढेकूण, सोंड येत नाहीत. धान्यामध्ये अळ्या होत नाहीत. असा हा उपाय तुम्ही नक्की करा.

Leave a Reply

Your email address will not be published.