घसा, नाक व छाती यामध्ये जमलेल्या कफसाठी हा आहे रामबाण उपाय…
महिन्याच्या मुलापासुन ते ८० वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत सगळ्यांसाठी
उपयोगी…

मित्रांनो, सर्दी, खोकला, कफ यापासून सुटका मिळविण्याचा एक जबरदस्त उपाय आज आम्ही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. मी इथे घेतली आहे दालचिनी. दालचिनीबद्दल तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे जी खाण्याचा स्वाद तर वाढवते त्याचबरोबर कितीतरी आजारांपासून आपल्याला दालचिनी वाचविते. दालचिनीचे
सेवन हे ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी फायदेशीर आहे. खूपच वेगाने चरबी वितळते व आपले वजन कमी होते.

दालचिनीचे सेवन केल्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ति वाढते. दालचिनीच्या सेवनाने लहान सहन आजार तर आपल्याला
होताच नाहीत. गरम पाण्याबरोबर जर दालचिनीचे सेवन केले तर शरीरातील जास्तीची चरबी गायब होईल. तसेच जे मधुमेहाचे रुग्ण आहेत त्यांनी दालचिनीचे सेवन जरूर केले पाहिजे. याची चव चांगली असते. सौंदर्यामध्ये पण याचा उपयोग केला जातो. चेहऱ्यावर जर थोडी दालचिनीची पाऊडर लावली तर मुरूमे, काळे डाग यापासून सुटका होते. सर्दी, खोकला यावर उपयोगी आहे. दालचिनी प्रकृतीने थोडी गरम असते पण आपल्या शरीरासाठी खूपच स्वास्थ्यकारकआहे. ह्याचा उपयोग सगळेच करू शकतात.

अथरायटीससाठी, हृदयरोगासाठी दालचिनी उत्तम आहे. ज्यांना सांधेदुखी आहे त्यांनी दालचिनीचे पाणी जरूर घेतले पाहिजे. घशामध्ये सूज आहे, सर्दी आहे, खोकला, घसा दुखत असेल तर तुम्ही दालचिनी व मध याचा वापर करून ठीक होऊ शकता. कधीकधी खोकून खोकून घसा दुखतो, आवाज येत नाही तर दालचिनी घेतल्यामुळे घसा ठीक होतो. मी दालचिनी कुटून घेतली आहे. पाऊडर केली आहे. मार्केटमध्ये पण पाऊडर मिळते पण घरातील पाऊडर शुद्ध असते.

दालचिनी आपल्या खाण्याचा स्वाद वाढविण्याबरोबरच आपल्या
शरीरासाठी खूपच फायदेशीर असते. जे लोक दालचिनीचे चिमुटभर पण सेवन करतात, त्यांना हृदयरोग होत नाही, त्यांचे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहाते, दालचिनीमध्ये मोठ्या प्रमाणात अॅंटी-ओकसिडेंट्स असतात. इन्सुलीन कमी करते, साखरेची पातळी नियंत्रित ठेवते, मधुमेह ठीक करते, त्याचबरोबर अलझायमरमध्ये पण फायदेमंद आहे. दालचिनी व मध याचे सेवन केल्यामुळे विसरण्याचा जो आजार असतो त्यात पण फायदा होतो. आपले मेटाबोलीसम वाढविते.

मी थोडी म्हणजेच १/२ चमचा दालचिनी पाऊडर घेतली आहे व २ चमचे मध घेतला आहे, ज्यामुळे मुले पण खाऊ शकतील. हे जास्त परिणामकारक होण्यासाठी त्यामध्ये १ चिमुट हळद घाला. हळद घशातील सूज कमी करते, नैसर्गिक वेदनाशामक आहे व १ चिमटी काळी मिरी पाऊडर त्यामध्ये मिसळा. पण हा उपाय केल्यावर १/२ तास तुम्हाला काहीही खायचे नाही.

पाणी कोमट पिऊ शकता. सर्दी, खोकला यावर खूपच फायदेशीर आहे. दालचिनीची जास्त पाऊडर तयार करून ठेवू नका स्वाद निघून जातो. कॅन्सरसारख्या आजारापासून वाचविते दालचिनी पाऊडर. तुम्ही १५ दिवस गरम पाण्याबरोबर दालचिनी पाऊडर घेऊन बघा, तुमचे वजन वेगाने कमी होईल. घशातील सूज कमी होईल, जर थोडे सैंधव मीठ घातले तर.कोणताही याचा दुष्परिणाम नाही.

वात दूर करते त्यामुळे सांधेदुखीमध्ये खूप फायदेशीर आहे दालचिनीचे सेवन. मी एक ग्लास गरम पाणी घेतले आहे. दिवसातून
दोनदा हे मिश्रण घेऊन गरम पाणी प्या. रात्री घेतले तरी चालेल. त्याचबरोबर गरम पाण्याचा वाफारा जरूर घ्या. आमची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर मित्रांनो लाइक व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.