घरात गरिबी येण्याची 10 कारणे ९९% लोकांना माहिती नाहीत…वास्तूशास्त्र

मित्रांनो घरात होणार्‍या लहान गोष्टींमध्ये काही संकेत लपलेले
असतात, हे संकेत जर समजून घेतले तर आपण जाणून घेऊ शकतो की भविष्यात येणारा काळ कसा असेल व संकटांपासून तुम्ही वाचू शकता. ज्योतिषानुसार जेव्हा दारिद्र्य वाढण्याची संभावना असते, तेव्हा घरात छोट्या छोट्या गोष्टी त्याचा इशारा देतात. आज आपण जाणून घेऊया गरीबी वाढण्याचे कोणते
संकेत तुम्हाला मिळू शकतात.

घरात जर काही संकट येणार असेल, तर त्याचा परिणाम सगळ्यात प्रथम घरात लावलेल्या तुळशीच्या झाडावर होतो. तुळशीचे झाड
एकदम सुकून जाते ज्यामुळे घरात संकट व दारिद्र्य येण्याचे संकेत मानले गेले आहे. खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये काळ्या मुंग्या येणे हे तुमच्या पुढे येणार्‍या वाईट वेळेचा संकेत देते. जर तुमच्या घरात
लावलेल्या झाडांची पाने सुकत असतील, तर ती लगेच कापुन टाका. घरात लावलेली झाडे नेहमी हिरवीगार असली पाहिजेत. कधीही झाडांची पाने सुकू नयेत, नाहीतर बुध ग्रह खराब होतो व त्यामुळे तुमच्यावर कर्ज वाढते. झाडांना नियमित पाणी जरूर घाला, ती सुकू देऊ नका. घरात झाडू लक्ष्मीचे प्रतिक आहे. कारण
झाडू दारिद्रयाला बाहेर काढते. त्यामुळे घरात सुख, समृद्धि व धनदौलत येते.

झाडूवर कधीही पाय ठेवू नये, त्यामुळे लक्ष्मीचा अनादर होतो. तुमचे कोणतेही लहान मूल अचानक घरातला केर काढू लागले तर त्याचा अर्थ घरात नको असलेला कोणीतरी पाहुणा येणार आहे. सूर्यास्तानंतर झाडू म्हणजेच केर काढू नये. कारण हे व्यक्तीच्या दुर्भाग्याला आमंत्रण देते. सकाळी नाश्ता करण्याच्या आधी झाडू जरूर मारा. हे शुभ असते. झाडू उलटा ठेवणे हा अपशकुन
मानला गेला आहे. झाडू नेहमी आडवा जमिनीवर ठेवावा कारण तो उलटा ठेवला तर घरात कलह होतो व घरात गरीबी येते. अंधार पडल्यावर केर काढू नये त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते.

घरातील कोणताही सदस्य बाहेर गेला तर लगेच केर काढू नये. काही वेळाने केर काढा. झाडू नेहमी लपवून ठेवा. कोणाची नजर
त्यावर पडता कामा नये. जसे आपण धन लपवून ठेवतो त्याप्रमाणे झाडू पण घरात येणार्‍या लोकांपासुन लपवून ठेवावा. वास्तुविज्ञानानुसार, जे लोक झाडूसाठी ठराविक स्थान न बनविता तो कुठेही ठेवतात, त्यांच्या घरात त्यांना आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो. खर्च वाढतो.

गाई किंवा कोणत्याही प्राण्याला झाडूने मारून हाकलून लावू नये त्यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घरातून रुसून निघून जाते. ज्या घरांमध्ये दूध उकळून सांडते, त्या घरात अचानक पैशांचा खर्च वाढतो, घरातील लोक आजारी पडतात. बर्‍याच लोकांचे असे म्हणणे आहे की दूध उकळून सांडणे हे शुभ असते, पण मी
त्यांना सांगतो, की रोज दूध उकळून सांडत असेल, तर ते शुभ नाही. जर तुम्ही कोणत्याही कामासाठी घरातून बाहेर जात असाल, व येताना घरी तुम्हाला दरवाज्यात प्रथम पालीचे दर्शन झाले, तर तुमचा वाईट काळ सुरू होणार आहे ह्याचा हा संकेत आहे. वेळ नेहमी सारखी नसते. हिम्मत ठेवून पुढे जा.


तुम्ही नवीन घर घेतले असेल व त्यात आधीच पाल मरून पडली असेल, तर घरात होम, हवन करावे लागेल. जर तुम्ही असे केले नाही तर त्या घरातील व्यक्तीची प्रगती होणार नाही. नकळत पाल तुमच्या शरीराच्या कोणत्याही भागावर पडली, तर येणार्‍या काळाचे सूचक आहे. तुमच्या डोक्यावर जर पाल पडली, तर ते शुभ आहे. धनलाभ होणार आहे. पण जर ती केसांवर पडली, तर ते चांगले नाही.

तुमच्या जीवनात भारी संकट येणार आहे. डोळ्यांचे फडफडणे हा पण एक संकेत आहे. महिलांचा डावा डोळा फडफडणे शुभ संकेत आहे. महिलांचा उजवा डोळा फडफडणे अशुभ असते. पुरुषांचा उजवा डोळा फडफडणे शुभ आहे. तसेच कावळा पण संकेत देतो. जर कावळा कोणत्या स्त्रीच्या डोक्यावर येऊन बसला, तर तिच्या
पतीवर मोठे संकट येणार आहे. खूप जास्त कावळे घराच्या छतावर जमा झाले, तर अशुभ आहे. काचेची भांडी तुटत असतील, तर दारिद्र्य येण्याचे संकेत आहे. कमेन्ट मध्ये तुम्ही “हर हर महादेव” जरूर लिहा. आमची माहिती आवडली तर
जरूर शेअर व लाइक करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.