नमस्कार मित्रांनो, तुमचे सगळ्यांचे परत एकदा स्वागत आहे. मित्रांनो, भारतीय संस्कृतीमध्ये भविष्य बघण्यासाठी काही विधी
सांगितले गेले आहेत, ज्यामध्ये सामुद्रिक शास्त्र हे भविष्य बघण्याचे एक प्राचीन विज्ञान आहे. विष्णुपुराणांमध्ये वर्णन केलेल्या एका कथेनुसार हे शास्त्र माता लक्ष्मीने भगवान विष्णुंना ऐकवले होते व समुद्रदेवतेने ते ऐकून त्याचा प्रचार केला होता. म्हणून ह्या शास्त्राला “सामुद्रिक शास्त्र” म्हणतात.
हातांच्या रेषा, हातावरील पर्वत, नखांची ठेवण व विविध चिन्हांच्या गहन अभ्यासानंतर या विद्येचा विकास झाला आहे. सामुद्रिक शास्त्रामध्ये शरीरावरील ३ चिन्हांचे खूप महत्व आहे. त्याचप्रमाणे, हातांवरील ३ रेषा जसे की भाग्य रेषा, मस्तीष्क रेषा, हृदय रेषा, मंगल रेषा, इत्यादि रेषांच्या शिवाय विभिन्न चिन्ह जसे की शंख, चक्र, मंदिर,स्वस्तिक, त्रिशूल, ध्वज,पर्वत इत्यादि व हाताचा आकार, हाताचा रंग, इत्यादीच्या अध्ययनाने मनुष्याचा भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळ
याचबरोबर मनुष्याचा स्वभाव व व्यक्तिमत्वाची पण माहिती होते.
तसेच बोटे वपंजाची लांबी, त्याचा आकार, तसेच नखावर असलेल्या चिन्हांमुळे पण व्यक्तीची शारीरिक स्थिति व त्याचे भविष्य हे समजू शकते. आजच्या या माहितीमध्ये आम्ही तुम्हाला आपल्या हाताच्या पंजावर असलेल्या काही चिन्हांबद्दल जी छोट्या छोट्या रेषांनी मिळून हातावर विशेष जागी बनतात त्यांचे महत्व बघणार आहोत तसेच आपल्या नखांवर जी अर्धचंद्राकार आकृती
तयार होते त्याचा अर्थ पण समजून घेऊया. तर सगळ्यात पहिल्यांदा, जाणून घेऊया पंजावर बनलेल्या चिन्हाविषयी. पण त्याआधी तुम्हाला विनंती करतो, की ही माहिती लाइक जरूर करा, आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका.
ज्या लोकांच्या हाताच्या पंजावर शंख असतो., ते निश्चितपणे धनवान बनतात. अशा लोकांना जीवनात धनाची कमतरता कधीच पडत नाही. त्यांचा स्वभाव दृढनिश्चयी असतो. त्याचप्रमाणे पंजावर माशासारखे चिन्ह असेल, तर ते सौभाग्य व ऐश्वर्याचे प्रतीक आहे. काही लोकांमध्ये हातावर हे लहानपणीच असते व काही लोकांमध्ये अर्ध्या वयात हे चिन्ह बनते व त्यांचा भाग्योदय होतो. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांच्या हाताच्या पंजावर मंदिरासारखे चिन्ह बनते, ते नेहमी समाजात मान सन्मान व किर्ति प्राप्त करतात. असे लोक बसतात
एका जागी पण माहिती आजूबाजूच्या सगळ्या लोकांची ठेवतात. म्हणून कोणी संकटात असेल, तर त्यांच्याकडे सल्ला मागायला लोक येतात, कारण हे लोक बुद्धीमान असतात, चांगले मार्गदर्शक असतात.
तिसरी गोष्ट म्हणजे चारित्र्यवान व धार्मिक प्रवृती असलेल्या लोकांच्या पंजावर ध्वजाचे चिन्ह असते. स्वस्तिक चिन्ह पण शुभ, दयाळूपणाचे व सात्विकतेचे प्रतिक आहे. चौथी गोष्ट म्हणजे भाला, त्रिशूल यासारखी चिन्ह शूर व वीर मनुष्याच्या हातावर आढळतात. आता बोलूया पंजावर आढळणार्या पर्वतांविषयी. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या कुंडलीत ज्या ग्रहाची स्थिति मजबूत व शुभ असते, त्या ग्रहाच्या पर्वताची ऊंची जास्त असते. त्या पर्वतावर काही शुभ चिन्हे बनलेली असतात व त्या बोटाची लांबी देखील बाकी बोटांच्या तुलनेत जास्त असते. जर कोणाची अनामिका बोट मोठे असेल तर त्याच्या रवि पर्वताची ऊंची जास्त असते व त्यावर शुभ चिन्ह असेल. अशी व्यक्ति प्रसिद्ध व गुणवान असते. दुसरी गोष्ट, ज्या लोकांच्या हातावर शनि पर्वताची ऊंची जास्त असते, त्या व्यक्ति मेहनती, शिस्तप्रिय असतात.
जर गुरु पर्वताची ऊंची जास्त असेल, तर त्या व्यक्तिला राजनीति, व्यवसाय, नौकरी या कोणत्याही क्षेत्रात सफलता मिळते. जर शुक्राची ऊंची जास्त असेल, तर अशी व्यक्ति संगीत, कला या क्षेत्रात उंनत्ती प्राप्त करतात. बुध प्रभाव असलेल्या व्यक्ति बौद्धिक क्षेत्रात प्रगति करतात व मंगळाच्या प्रभावाच्या प्रशासन सेवेत जातात. आता जाणून घेऊया आपल्या नखावर असलेल्या
अर्धचंद्राचा काय अर्थ असतो. याचे वेगळे महत्व असते.
ज्योतिषशास्त्रानुसार, नखांवर जी सफेद रंगाची अर्धचंद्राकार आकृती असते तो खूप शुभ असते.
अनामिका बोटाच्या नखावर जर अर्ध चंद्र बनत असेल, तर
त्या व्यक्तिला समाजात मान सन्मान मिळतो. दुसरी गोष्ट ज्या लोकांच्या मध्यमा बोटावर अर्धचंद्र बनतो, त्या व्यक्ति व्यापारात प्रगति करतात. हे बोट शनिचे मानले जाते. तर्जनीच्या बोटावर अर्धचंद्र असेल, त्या व्यक्तीच्या जीवनात धनाची वृद्धी होते. अंगठ्याच्या नखावर जर अर्ध चंद्र असेल, तर व्यक्ति बुद्धिमान व लीडर बनणारी असते. असे लोक पुढे जाऊन चांगले वक्ता बनतात. कोणत्याही व्यक्तीच्या सगळ्यात छोट्या बोटाच्या नखावर अर्धचंद्र असेल तर ते शुभ मानले गेले आहे. भाग्य बलवान असते.
सगळ्या बोटांवर अर्धचंद्र असतो व बोटे लांब असतात, ते लोक आपल्या स्वबळावर पुढे जातात. आमची ही माहिती आवडली असेल तर जरूर लाइक व शेअर
करा. धन्यवाद.