सगळ्यात मोठा पापी, नकळतपणे ही ५ पापे करणारे जीवनभर दरिद्रीच राहातात, कोणती आहेत ती पापे जाणून घ्या….

नमस्कार मित्रांनो आपल्या धर्मामध्ये एकूण १८ पुराण आहेत. त्यामध्ये शिवपुराण हे एक असे पुराण आहे ज्यामध्ये मनुष्य जीवन सुखमय होण्यासाठी अनेक मंत्र सांगितले गेले आहेत. शिवपुराणात माता पार्वती व भगवान शिव यांच्या संवादाचे सार सांगितले गेले आहे. शिवपुराणामध्ये अशा ५ पापांचे वर्णन केले गेले आहे, व जो मनुष्य नकळत किंवा चुकून ही पापे करतो त्याला त्याचा दंड भोगावा लागतो.

शिवपुराणानुसार मनुष्याने अशी पापे चुकूनही करू नयेत. भगवान शिवाची तुमच्यावर कृपा होत नाही. कलियुगात धर्म फक्त १/४ उरला आहे. म्हणून मनुष्य पाप करतो. पण तुम्ही देवावर विश्वास ठेवून जर धर्माच्या मार्गावर चालत राहिलात, तर निराकार ईश्वराला तुम्ही लवकर प्रसन्न करू शकता. त्यासाठी तुम्हाला पापरहित मनुष्य बनावे लागेल. जर तुम्ही यावर लक्ष दिले तर चुकूनही तुमच्या हातून पाप घडणार नाही व ईश्वराची सहज तुमच्यावर कृपा होऊ शकते. पण तरी तुम्हाला त्याचे उचित फळ प्राप्त होत नाही कारण नकळत तुमच्या हातून काही पापे होतात, जे तुमच्या पुण्यकर्माचे
संतुलन बिघडवतात.

म्हणून तुम्हाला या पापांबद्दल माहिती असणे जरूरी आहे. आज आम्ही तुम्हाला त्या ५ पापांबद्दल सांगणार आहोत जी भगवान शिवानी पार्वतीला सांगितली होती. भगवान शिवांच्या अनुसार कलियुगातील माणूस चुकून अशी पापे करतात. पण ज्या व्यक्ति अशी पापे करत नाहीत, ते जीवनात सुखी राहातात. अशी व्यक्ति निरोगी राहाते. चला तर मग जाणून घेऊया कोणती आहेत ती पापे. आमची माहिती आवडली तर जरूर लाइक व शेअर करा.

सगळ्यात प्रथम मानसिक पाप- शिवपुराणानुसार, कलियुगी मनुष्य रोज मानसिक पाप करतो. मानसिक पाप ते असते जे माणसाच्या जीवनात वाईट विचार निर्माण करते, जे कोणत्याही स्त्रीबद्दल असो, किंवा दुसर्‍या व्यक्तीची उन्नती बघून होते, किंवा कोणाचे सौंदर्य बघून झाले असुदे, मनात त्याच्या प्रती वाईट विचार आणणे हे पाप आहे. तसेच, ईश्वराला प्रार्थना करणे, कोणाचे तरी वाईट होण्यासाठी तर ते पाप आहे. कोणत्याही मनुष्याच्या मनात देवाचा निवास असतो. तुम्ही जर मनात वाईट विचार आणले, तर तो त्या देवाचा अपमान मानला जातो.

दुसरे पाप आहे वाचेच्याद्वारे झालेले पाप- शिवपुराणानुसार तोंडाने कोणाला वाईट बोलणे किंवा कोणाला दू:ख देण्यासाठी वाईट भाषा वापरणे हे खूप मोठे पाप आहे. त्याला “वांछित पाप” असे म्हणतात. मनुष्याने नेहमी सत्य व मधाळ, गोड बोलले पाहिजे. जे लोक आपल्या तोंडाने खोटे बोलतात किंवा कटू शब्दात कोणाचा अपमान करतात, त्याला पाप मानले जाते. असे लोक जीवनात गरीब राहातात.

तिसरे आहे शारीरिक पाप- शिवपुराणात प्रकृतीला ईश्वर मानले गेले आहे. अत: प्रकृतीचे नुकसान करणे हे पाप मानले जाते. झाडे, रोपे कापणे, पशुचि हत्या करणे हे शारीरिक पाप आहे. त्याशिवाय पायाखाली छोटे छोटे जीवजंतूंची हत्या करणे, हे पाप मानले गेले आहे. चौथे पाप आहे निंदा करणे- शिवपुराणानुसार कलियुगातील सगळ्यात मोठे पाप आहे निंदा करणे. मनुष्याने कधीही कोणाचीही निंदा करू नये. वडीलधार्‍यांची निंदा करणे मोठे पाप आहे.

पाचवे पाप चुकीच्या व्यक्तींच्या संपर्कात राहाणे- भगवान शिवांच्या नुसार चोरी करणे, हत्या करणे पाप आहे. त्याचबरोबर अशा लोकांच्या संपर्कात येणे., त्यांना मदत करणे हे मोठे पाप आहे. ही पापे नकळत होतात. तर ही होती ५ पापे ज्यापासून मनुष्याने स्वत:ला वाचविले पाहिजे. आमची माहिती लाइक व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.