पायाच्या लांब बोटाचे रहस्य, जाणून घेतले तर तुम्ही चकित होऊन जाल…

नमस्कार मित्रांनो आजच्या या माहितीमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत पायाच्या लांब बोटांच्या रहस्याविषयी. आपण नेहमीच बघतो की आपल्या पायाची बोटे व अंगठा सारखे असतात. पण काही लोकांच्या पायाची बोटे वाकडी तिकडी (सारखी नसलेली) असतात. कधी बोटे पायाच्या अंगठ्यापेक्षा मोठी,तर कधी अंगठा बाकीच्या बोटांपेक्षा मोठा असतो.

या पायाच्या बोटांच्या अंगठ्यापेक्षा मोठे व लहान असण्याचे वेगळेच महत्व असते. शास्त्रांच्या मते असे म्हटले जाते, की आपल्या शरीराचे असलेले अवयव आपल्याविषयी खूप काही सांगतात. तुम्ही व्यक्तीच्या शरीराच्या अवयवांना बघून त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल खूप चांगल्या प्रकारे सांगू शकता.

व्यक्तीचे अवयव म्हणजेच अंग बघून त्यांचा स्वभाव, व्यक्तिमत्व कसे असेल ते सगळे तुम्ही जाणून घेऊ शकताव व्यक्तीच्या अंगांना बघून त्यांच्या स्वभावाबद्दल सांगणार्याल शास्त्राला “सामुद्रिक शास्त्र” म्हणून ओळखले जाते. सामुद्रिक विद्येचे शिक्षण घेतल्यानंतर कोणीही व्यक्ति कोणत्याही व्यक्तीच्या शरीराची अंगे बघून त्याचे व्यक्तिमत्व, तसेच त्याच्या जीवनातील रहस्य याबद्दल चांगल्या प्रकारे सांगू शकतात.

ज्या लोकांच्या पायाच्या अंगठ्याजवळील बोट मोठे असते, ज्या लोकांच्या पायाच्या अंगठ्याजवळील बोट जास्त लांब व बाकीची बोटे लहान असतात, अशी माणसे उर्जावान म्हणजेच स्फूर्तिदायक असतात. अशी माणसे साधारणत: ध्येयवेड्या स्वभावाची असतात व काहीतरी करण्याची जिद्द ठेवतात. असे लोक कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी आपली पूर्ण ताकद व ऊर्जा पणाला लावतात.

पायाच्या अंगठ्याजवळचे बोट लहान असलेली लोक नेहमी खुश रहातात किंवा तसा प्रयत्न करतात. त्याशिवाय,ज्या लोकांच्या पायाच्या अंगठ्याजवळील बोट मोठे असते ते बुद्धीमान असतात. पण असे लोक शारीरिक रूपाने अशक्त असतात. असे लोक प्रत्येक काम विचारपूर्वक करतात. ज्या लोकांच्या पायाच्या अंगठ्याच्या लगतची दोन्ही बोटे समान असतात व बाकी बोटे लहान असतात, त्याचा अर्थ असा आहे की समाजात तुम्ही तुमच्या मेहनतीसाठी ओळखले जाता.

असे लोक समजदार असतात व भांडण तंट्यापासून दूर राहातात. ज्या लोकांच्या पायाची बोटे अंगठ्यापासून लहान लहान होत जातात, असे लोक नेहमी आपले श्रेस्ठत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या अधिकारांबद्दल सतत बोलतात. त्यांना वाटते मी जे म्हणतो तेच खरे आहे व लोकांनी त्याचा स्विकार केला पाहिजे.

जर समाजात किंवा कुटुंबातील कोणी व्यक्ति त्यांच्या इछेचा अवमान करीत असेल, तर त्यांना खूप राग येतो. पण हे आपला राग दाखवत नाहीत. मित्रांनो, तुम्हाला आमची माहिती आवडली तर जरूर मित्रांना शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published.