टक्कलवर इतके केस येतील की पूर्ण टक्कल भरून जाईल…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. आज आम्ही आपल्या साठी टक्कलवर 21 दिवसातच केस उगवणारा असा खुपच प्रभावशाली आणि घरगुती उपाय घेऊन आलो आहे. जर टक्कल पडले असेल तर आपल्याला चार जणांच्यात गेल्यावर लाजिरवाणे होते आणि आपण सुंदर असून देखील आपले वय जास्त दिसते.

आपल्या पर्सनॅलिटी वर सुद्धा याचा परिणाम होत असतो. तर असे तुमचे देखील टक्कल पडले असेल तर तुम्ही हा उपाय करा, तुम्हाला लगेचच याचा फरक जाणवेल. या उपायाने हळुहळु तुमच्या टक्कलवर केस येण्यास सुद्धा सुरुवात होईल. चला तर उपाय कसा करायचा, उपाय करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लागतात ते पाहूयात.

मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागतात सीताफळाच्या झाडाची पाने. या साठी आपल्याला 15 ते 20 पाने घ्यायची आहेत. सीताफळाच्या झाडाची पाने घ्यायची आहेत आणि ती स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायची आहेत. यानंतर आपल्याला ही पाने पाठयावर बारीक करून घ्यायची आहेत. तुमच्याकडे जर खलबत्ता असले तर त्या मध्ये देखील तुम्ही हे करू शकता. हे बारीक करण्यासाठी तुम्ही कोणत्याही यंत्राचा वापर करू नका.


पाठयावर किंव्हा खलबत्त्याचा वापर करूनच तुम्हाला या पानांचा लेप तयार करायचा आहे. थोडे थोडे पाणी टाकत तुम्हाला याची पेस्ट बनवायची आहे. पेस्ट बनवल्यानंतर यामधील जी मोठी पाने राहतात ती बाजूला काढून टाकायची आहेत.
फक्त आपल्याला या मधील पेस्ट घ्यायची आहे. पेस्ट एक वाटीत काढून घ्या. हा लेप आपला तयार झालेला आहे.

मित्रांनो हा लेप रात्री झोपताना जसे आपण मेहंदी लावतो त्याप्रमाणे हा लेप टक्कलवर लावून घ्यायचा आहे आणि हे टक्कलवर असेच राहू द्यायचे आहे. सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्याने केस स्वच्छ धुऊन घ्यायची आहेत. मित्रांनो ज्या वेळी ही पेस्ट तुम्ही लावणार आहेत त्याच वेळी तुम्हाला ही पेस्ट तयार करायची आहे. आधी करून ठेवायची नाही.

मित्रांनो हा उपाय करतांना तुम्हाला दुसरा याचबरोबर एक उपाय करायचा आहे. तो उपाय म्हणजे एक ग्लास तुम्हाला कोमट पाणी घ्यायचे आहे आणि दररोज रात्री झोपतांना त्यात एक चमचा त्रिफळा पावडर टाकायची आहे. सकाळी उपाशी पोटी तुम्हाला हे पाणी पिऊन घ्यायचे आहे. असे जर तुम्ही 21 दिवस केले तर तुमच्या टक्कलवर भरभरून केस येण्यास सुरुवात होईल.

मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडलीच असेल अशी आम्ही आशा करतो. माहिती तुमच्या मित्रांनो नक्की शेअर करा.या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published.