उद्या गुरुपुष्यामृतयोग या राशींचे भाग्य चमकणार पुढील 11 वर्षं राजयोग…

दिनांक 28 ऑक्टोबर उद्या गुरुपुष्य अमृतयोग, या राशींचे भाग्य चमकणार पुढील अकरा वर्ष राजयोग. मित्रांनो नशीब जेव्हा कलाटणी घेते तेव्हा मनुष्याच्या जीवनातील नकारात्मक परिस्थितीमध्ये बदल घडून येण्यास वेळ लागत नाही. ग्रहनक्षत्राचा सकारात्मक प्रभाव आणि शुभघटिका, शुभसंयोग जमून आल्यास भाग्योदय घडून यायला वेळ लागत नाही. दिनांक 28 ऑक्टोबर पासून असाच काहीसा शुभ आणि सुंदर काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत.

आता आपले नशीब चमकण्यास वेळ लागणार नाही. ग्रहनक्षत्राची शुभस्थिती आणि गुरुपुष्य अमृतयोगाचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात मांगल्ल्याचे दिवस घेऊन येणार आहे. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. उद्योग, व्यापार आणि कार्यक्षेत्रात भरपूर लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनात चालू असणारी आर्थिक तंगी आता दूर होणार आहे. मित्रांनो पुष्य नक्षत्राला नक्षत्राचा राजा मानले जाते.

ज्योतिषयशास्त्रामध्ये पुष्य नक्षत्राला विशेष महत्व प्राप्त आहे. पुष्य योग हा गुरुवारी येत असल्यामुळे या संयोगाला गुरुपुष्य अमृतयोग असे म्हटले जाते. गुरुला पुष्य नक्षत्रांचा देवता मानण्यात आले आहे. या नक्षत्राचा स्वभाव अतिशय शुभ फलदायी मानला जातो. या नक्षत्राचा सकारात्मक प्रभाव मनुष्याच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यश प्रदान करून देतो. दीपावलीच्या अगोदर आधी या संयोगाचे येणे अतिशय शुभ फलदायी मानले जात आहे.

यावेळी पुष्य नक्षत्र हे 24 तासांपेक्षा अधिक राहणार आहे. पंचांगानुसार अश्विन कृष्ण पक्ष पूर्णवसु नक्षत्र दिनांक 28 ऑक्टोबर रोज गुरुवार सकाळी 9 वाजून 41 मिनिटांनी गुरुपुष्य अमृतयोगाला सुरुवात होणार असून दिनांक 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजून 39 मिनिटांनी हा संयोग समाप्त होणार आहे आणि विशेष म्हणजे या वेळी सर्वार्थ सिद्धी योग आणि रवी योग सुद्धा बनत आहे. या संयोगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या राशीवर पडण्याचे संकेत आहेत. गुरुपुष्य अमृतयोग हा मौल्यवान वस्तूंच्या खरेदीसाठी विशेष महत्वपूर्ण मानला जातो.

या दिवशी घर जमीन, सोने चांदी, वाहन खरेदीसाठी किंवा मौल्यवान वस्तूंच्या खरेदीसाठी हा दिवस विशेष लाभकारी मानला जातो. गुरुपुष्य अमृतयोगाच्या शुभमुहूर्तापासून या भाग्यवान राशींच्या जीवनात सुखाच्या सुंदर बहार येण्याचे संकेत आहेत. अपयश आणि दुःखाचा काळ समाप्त होणार असून प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडण्याचे संकेत आहेत.

सुरुवात करूया मेष राशीपासून. मेष राशीवर गुरुपुष्य अमृतयोगाचा अतिशय शुभप्रभाव दिसून येणार आहे. मागील अनेक दिवसांपासून ज्या कामांसाठी परिश्रम घेत आहात ती कामे या काळात पूर्ण होण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रातून आर्थिक लाभ होण्याचे संकेत आहेत. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहणार असून कुटुंबातील सदस्यांच्या इच्छा पुर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार आहात. नशिबाला प्रयत्नांची जोड दिल्यास प्रगतीला वेळ लागणार नाही. या काळात चुकीच्या कामांपासून दूर राहणे आपल्या हिताचे ठरणार आहे.

यानंतर आहे मिथुन राशी. मिथुन राशीसाठी हा काळ एखाद्या वरदानासमान ठरू शकतो. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. परंतु या काळात आपले कर्म चांगले ठेवणे आवश्यक आहे. यश प्राप्तीसाठी प्रयत्नांची गती वाढवणे आवश्यक आहे. आलेला संधीचा योग्य उपयोग करून घेणे आवश्यक आहे. उद्योग, व्यवसाय आणि व्यापारातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. व्यवसायानिमित्त केलेले प्रवास लाभाचे ठरणार आहेत. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. गुंतवणूक करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

यानंतर आहे सिंह राशी. सिंह राशीसाठी येणारा काळ सुखाचे सुंदर दिवस घेऊन येईल. गुरुपुष्य अमृतयोगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या राशीवर दिसून येईल. करियरच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार असून धनलाभ होण्याचे संकेत आहेत.

यानंतर आहे कन्या राशी. हा संयोग कन्या राशीचा भाग्योदय घडून आणण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रात आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल. उद्योग, व्यापारातून आर्थिक आवक वाढणार आहे. मागील अनेक दिवसांपासून अपुर्ण राहिलेल्या मनोकामना या काळात पुर्ण होणार आहेत. कार्यक्षेत्रात ज्या कामांना हात लावाल ती कामे यशस्वीरित्या पुर्ण करून दाखवणार आहात.

यानंतर आहे तुळ राशी. तुळ राशीसाठी हा संयोग अतिशय शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. व्यवसायाचा विस्तार घडून येण्यास सुरुवात होणार आहे. आता जीवनातील अडचणींचा काळ समाप्त होणार असून प्रगतीच्या काळाची सुरुवात होणार आहे. उद्योग, व्यापार आणि कार्यक्षेत्रात नवे आर्थिक व्यवहार जमून येतील. या काळात आर्थिक आवक वाढणार असून घर, जमीन अथवा वाहन खरेदीचे योग जमून येऊ शकतात.

यानंतर आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीसाठी ग्रहनक्षत्र अनुकूल बनत असून गुरुपुष्य अमृतयोगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या राशीवर पडण्याचे संकेत आहेत. करियरमध्ये प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येतील. उद्योग, व्यापारातून आपल्या कमाईमध्ये वाढ दिसून येईल. वैवाहिक जीवनात सुखाचे सुंदर दिवस येतील. या काळात नातेसंबंध मधुर बनणार आहेत. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी हा काळ लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत.

यानंतर आहे मकर राशी. मकर राशीच्या जीवनात हा संयोग आनंदाची बहार घेऊन येणार आहे. या काळात आपल्या मानसन्मान आणि प्रतिष्टेमध्ये वाढ होईल. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार असल्यामुळे आपल्या जीवनातील पैशांची तंगी आता दूर होण्याचे संकेत आहेत. आता अचानक धनलाभाचे योग जमून येऊ शकतात.

यानंतर आहे कुंभ राशी. गुरुपुष्य अमृतयोगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव कुंभ राशीच्या जीवनावर दिसून येईल. यश प्राप्तीच्या नव्या संधी चालून आपल्याकडे येतील. आर्थिक प्राप्तीचे नवे मार्ग आपल्यासाठी उपलब्ध होणार आहेत. नवीन उद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाची बहार येणार असून सांसारिक सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे.

टीप :-मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.