गुरूपुष्यामृत योग 28 ऑक्टोबरच्या सकाळपासून अचानक चमकुन उठेल या पाच राशिंचे नशिब मिळेल मोठी खुशखबर…

गुरुपुष्य अमृतयोग दिनांक 28 ऑक्टोबरच्या सकाळपासून अचानक चमकून उठेल या पाच राशींचे नशीब, मिळेल मोठी खुशखबर. मित्रांनो हिंदुधर्म आणि ज्योतिष्य शास्त्रामध्ये गुरुपुष्य नक्षत्राला विशेष महत्व प्राप्त आहे. हे नक्षत्र अतिशय शुभ फलदायी मानले जाते अनेक लोक मोठ्या आतुरतेने या नक्षत्राची प्रतीक्षा करत असतात. दिनांक 28 ऑक्टोबर रोजी हा शुभसंयोग जमून येत असून गुरुवार रोजी पुष्य नक्षत्राचा शुभसंयोग बनत आहे.

गुरुवारच्या दिवशी पुष्य योग येत असल्यामुळे याला गुरुपुष्य अमृतयोग म्हटले जाते. गुरुला पुष्य नक्षत्राचा देवता मानले जाते. हे नक्षत्र अतिशय शुभ फलदायी मानले जात असून या दिवशी केलेले कोणतेही शुभकाम अतिशय लाभदायक मानले जात आहे. दीपावलीच्या ठीक आधी हा योग जमून येत असून मौल्यवान वस्तूंच्या खरेदीसाठी हा दिवस अतिशय उत्तम मानला जातो.

अश्विन कृष्ण पक्ष पुनर्वसु नक्षत्र दिनांक 28 ऑक्टोबर रोज गुरुवार सकाळी 9 वाजून 41 मिनिटांनी गुरुपुष्य अमृतयोगाला सुरुवात होणार असून दिनांक 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजून 40 मिनिटांनी गुरुपुष्य योग समाप्त होत आहे आणि विशेष म्हणजे याच दिवशी सर्वार्थ सिद्ध योग आणि रवी योग बनत आहेत. या संयोगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव या पाच राशींच्या जीवनावर पडणार असून यांच्या जीवनातील वाईट काळ आता समाप्त होणार आहे.

इथून पुढे यांच्या जीवनात शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात होणार असून यांच्या जीवनातील दुःखाचा काळ समाप्त होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून आपल्या जीवनात चालू असणारी अशुभ परिस्थिती आता बदलणार असून अतिशय सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत.

सुरुवात करूया मेष राशीपासून. गुरुपुष्य योगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव मेष राशीवर दिसून येईल. गुरुपुष्य या काळापासून आपल्या नशिबाला नवी कलाटणी प्राप्त होण्यास सुरुवात होणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहेत. हा दिवस आपल्या जीवनात अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे. धनलाभाचे योग बनत आहेत.

यानंतर आहे कर्क राशी. 28 ऑक्टोबर पासून पुढे येणारा काळ कर्क राशीसाठी विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. गुरू पुष्य नक्षत्राचा सकारात्मक प्रभाव आपल्या राशीवर पडणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा लाभकारी ठरणार आहे. कार्यक्षेत्रातून पैशांची आवक वाढणार आहे.

यानंतर आहे कन्या राशी. कन्या राशीच्या जीवनात अतिशय सकारात्मक कलाटणी प्राप्त होणार आहे. कन्या राशीच्या जीवनावर या संयोगाचा अतिशय शुभप्रभाव दिसून येईल. वैवाहिक जीवनात सुखशांती प्राप्त होणार आहे. या काळात उद्योग, व्यवसायात प्रगती घडून येणार असून आपल्या मनाला आनंदीत करणारी एखादी मोठी खुशखबर कानावर येऊ शकते.

यानंतर आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या जीवनात आता सुखाची बहार येण्याचे संकेत आहेत. गुरुपुष्य अमृत योगाचा अतिशय शुभ प्रभाव आपल्या राशीवर पडणार असून या दिवशी बनत असलेला महासंयोग आपल्या जीवनात अतिशय लाभकारी ठरणार आहे. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार असून हाती पैसा खेळता राहणार आहे. नोकरीच्या कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील.

यानंतर आहे कुंभ राशी. कुंभ राशीच्या जीवनात आता प्रगतीचे नवे संकेत प्राप्त होतील. आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ होईल. कौटुंबिक जीवनात सुखसमृद्धी आणि आनंदाची बहार येणार आहे. आपल्या जीवनात अतिशय सुंदर काळ येण्याचे संकेत आहेत. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होईल. या काळात एखादी मौल्यवान वस्तु खरेदी करू शकता. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. नोकरीच्या कामात यश प्राप्त होईल.

टीप :-मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.