वास्तुशास्त्र- ज्या घरात असतात या ५ वस्तु त्या घरात गरीबी कधीही येत नाही…

नमस्कार मित्रांनो. तुमचे आमच्या “लाइफ ओके” चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आमच्या या माहितीद्वारे आम्ही अशा ५ वस्तूंबद्दल सांगणार आहोत,ज्या घरात ठेवल्यामुळे घरात जर गरीबी असेल, तर ती घरातून निघून जाते. म्हणून मित्रांनो, ही माहिती तुम्ही शेवटपर्यंत जरूर वाचा म्हणजे याचा तुम्हाला लाभ मिळेल व माहितीचा अनादर होणार नाही.

मित्रांनो, ज्योतिषशास्त्रामध्ये वास्तुदोषाला महत्वाचे स्थान दिले गेले आहे. ज्या घरात वास्तुदोष खराब असतो, त्या घरामध्ये खूप जास्त प्रमाणात समस्या आढळतात. जिथे वास्तुदोष असतो तिथे अनेक प्रकारच्या समस्या येऊ लागतात. यामध्ये वास्तुदोषामुळे गरीबी येणे, पैशांचे लवकर लवकर खर्च होणे, ही एक साधारण व मोठी समस्या आहे. ही समस्या दूर करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही अशा गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्यांचा उल्लेख वास्तुशास्त्रामध्ये केला गेला आहे.

ह्या वस्तु घरात ठेवल्यामुळे तुम्हाला कधीही आर्थिक समस्येचा सामना करावा लागत नाही. ह्या वस्तु घरात ठेवल्यामुळे नेहमीच घरात सुख, समृद्धि व माता लक्ष्मीचा निवास कायम राहातो. मित्रांनो, गरीबी व निर्धनता, हे जीवन जगण्याची साधने व धनाच्या
अभावाची स्थिति उत्पन्न होते. प्रत्येक व्यक्तीची हीच इच्छा असते, की तो दुनियेतील सगळ्यात श्रीमंत व्यक्ति व्हावा व जो आधीच श्रीमंत आहे, तो अशी कामना करतो, की तो कधीच गरीब होऊ नये.

गरीबीचे तोंड कोणाही व्यक्तिला बघायला आवडत नाही. पण नशिबाच्या पुढे कोणाचे काही चालू शकत नाही. पण
मित्रांनो, तुम्हाला जर गरीबीपासून वाचायचे असेल, तर घरात या ५ वस्तु अवश्य ठेवा, ज्यामुळे तुमच्या घरात कधीही दारिद्र्य व गरीबी येणार नाही. चला तर मग जाणून घेऊया त्या ५ वस्तु कोणत्या आहेत. माहिती आवडली तर लाइक करा व कमेन्ट बॉक्स मध्ये “जय श्रीराम” नक्की लिहा.

पहिली वस्तु आहे गणेशाची मूर्ति- मित्रांनो, गणपतीला विघ्नहर्ता म्हटले जाते. घरात जेव्हा कोणतेही नवीन कार्य आरंभ केले जाते, तेव्हा प्रथम गणपतीची पुजा केली जाते. गणपतीला सगळी विघ्ने हरण करणारा देव मानला जातो. गणपति हे प्रथम पूजनीय अशी देवता आहे. असे म्हटले जाते की सर्व प्रथम गणेशवंदना केल्यामुळे कोणतेही काम कधीच बिघडत नाही व त्यामध्ये फायदाच
फायदा होतो. म्हणून आपल्या सगळ्यांनी घरात कमीत कमी एक गणपतीची मूर्ति ठेवली पाहिजे.

या मूर्तीला घरात स्थापन करताना या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे की गणपति अशा ठिकाणी ठेवा, जिथून त्यांची दृष्टी घरच्या मुख्य
दरवाजावर सतत राहील. असे केल्यामुळे घरात लक्ष्मी लवकर येते. घरात कधीही धनाची कमतरता पडत नाही. घरातून दारिद्र्य व गरीबी दूर राहातो. गणपतीला रिद्धि सिद्धीचा दाता मानला गेला आहे. ज्या घरात गणपति खुश राहातात, तिथे कधीही कोणत्याही वस्तूंची कमतरता पडत नाही. नेहमी अन्न, व धान्यांचे भांडार भरलेले राहाते.

दुसरी वस्तु आहे बासरी- मित्रांनो, बासरी घरात ठेवणे शुभ आहे. वास्तुशास्त्रानुसार, घरात बासुरी ठेवल्यामुळे सगळ्या प्रकारचे वास्तुदोष दूर होतात. मित्रांनो, बासरी ही भगवान श्रीहरी कृष्ण यांची सगळ्यात प्रिय वस्तु आहे. जेव्हा श्रीकृष्ण खुश असत, तेव्हा ते बासरी वाजवित असत. म्हणून बासरी वास्तुशास्त्रामध्ये शुभ मानली गेली आहे. घरात चांदीची बासरी ठेवल्यामुळे घरात धनाची कधीही कमतरता पडत नाही. असे म्हटले जाते, की माता लक्ष्मीला चांदीची बासरी खूप प्रिय आहे. म्हणून ज्या घरात चांदीची बासरी असते तिथे माता लक्ष्मी निवास करते. छोटी बासरी पण चालू शकते.

तिसरी वस्तु आहे शंख (दक्षिणावर्ती)- प्रत्येक घरातील देवघरात एक शंख असणे जरूरी आहे. हा शंख घरातील वास्तुदोष दूर करतो. हा शंख सकाळी व संध्याकाळी वाजविल्यामुळे घरातील वातावरण शुद्ध व सकारात्मक बनते. शंखाच्या ध्वनिमुळे घरातील सगळी नकारात्मक ऊर्जा निघून जाते. घरासाठी शंख घेताना एक गोष्ट खास लक्षात ठेवा, की शंख दक्षिणावर्ती असावा, याचे कारण
हे आहे की दक्षिणावर्ती शंख लक्ष्मी मातेला प्रिय असतो. ज्या घरात हा शंख वाजविला जातो, तिथे माता लक्ष्मी निवास करते. शंख नेहमी देवघरात लाल कपड्यात गुंडाळून ठेवावा म्हणजे त्याचा जास्त फायदा मिळतो. नियमित त्याची पुजा करावी.

चौथी वस्तु आहे लक्ष्मी व कुबेराची प्रतिमा- मित्रांनो, प्रत्येक घरात लक्ष्मी मातेची मूर्ति किंवा प्रतिमा असतेच. पण खास गोष्ट ही आहे, की अनेक घरात लक्ष्मी मातेबरोबर कुबेराची प्रतिमा नसते. तुमच्या घरात एक फोटो असा असला पाहिजे की ज्यामध्ये माता लक्ष्मी व कुबेर एकमेकांबरोबर विराजमान आहेत. कुबेर महाराज हे उत्तर दिशेचे स्वामी आहेत. यांना उत्तर दिशेकडे ठेवले पाहिजे. कुबेर देवाला धन देणारी देवता मानले जाते.

पाचवी वस्तु आहे मासा- घरात मासा ठेवल्यामुळे कितीतरी प्रकारचे वास्तुदोष नाहीसे होतात. असे म्हटले जाते, घर किंवा ऑफिसमध्ये मासा ठेवल्यामुळे सकारात्मक ऊर्जा घरात येते व कधीही आर्थिक समस्या येत नाही. मित्रांनो, माश्याला पाण्याच्या टॅंक मध्ये किंवा हल्ली बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे फिशटॅंक मिळतात त्यात मासे ठेवा. ९ मासे त्यात असणे खूप जरूरी आहे.
घरातील फक्त एका व्यक्तीने यांना खाणे दिले पाहिजे. ही माहिती आवडली असेल तर जरूर लाइक व शेअर करा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.