नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी मूठभर तांदूळ गुपचूप टाका इथे गरिबी निघून जाईल…

सात ऑक्टोबर ते चौदा ऑक्टोबर पर्यंत 2021 सालातील शारदीय नवरात्र आहेत. या शारदीय नवरात्रातील कोणत्याही दिवशी हा एक टोटका नक्की करून पाहा. घरातून गरिबी निघून जाईल. तुम्ही जितकी मेहनत करताय तितका पैसा नक्की येऊ लागेल. यासाठी आपल्याला साधारणतः पाव ते अर्धा किलो अक्षत म्हणजे न तुटलेले, फुटलेले तांदुळ लागणार आहे. हे तांदुळ घेतल्यानंतर ते कुंकुवाच्या साहाय्याने आपण रंगवायचे आहेत, त्याला लाल रंग प्रदान करायचा आहे आणि ते सावलीमध्ये किंवा उन्हामध्ये सुखवायचे आहेत.

हे लाल रंगाचे अक्षत म्हणजे तांदुळ याचाच उपयोग करून हा टोटका करणार आहोत. टोटका करण्यासाठी आपल्या घरातली उत्तर दिशेकडची भिंत आहे त्या भिंतीजवळाची जागा स्वच्छ करून घ्या. एक सुंदर आसन त्या ठिकाणी स्वतःसाठी अंथरा आणि स्वतः उत्तरेकडे मुख करून बसा.

आपलं तोंड उत्तरेकडे येईल असे बसा. त्यानंतर कुंकुवाने जमिनिवरती एक स्वस्तिक आपण रेखाटायचे आहे. स्वस्तिकच्या दोन्ही बाजूला दोन उभ्या रेषा द्यायला विसरू नका. या स्वस्तिकवर आपण जे लाल रंगाचे अक्षत रंगवलेले आहेत त्या अक्षताची ढिग करायचा आहे. त्यानंतर त्या तांदळाच्या ढिगावर एक श्री यंत्र आपण ठेवायचे आहे. हे श्री यंत्र कोणत्याही पूजेच्या दुकानात, मंदिराशेजारी किंवा भांड्याच्या दुकानात सहज उपलब्ध होईल.

हे श्री यंत्र पितळी किंवा तांब्याचे असावे. अनेकजण श्री यंत्र नाही म्हणून उपाय करणार नाहीत. मित्रांनो काहीतर प्राप्त करायचे असेल, काहीतर मिळवायचे असेल तर थोडेसे हातपाय हलवायच लागतील. थोडीशी आजूबाजूला चौकशी करा श्री यंत्र आपल्याला सहज मिळून जाते. तर हे श्री यंत्र त्या तांदळाच्या ढिगावर ठेवायचे आहे आणि नऊ दिवे, हे नऊ दिवे मातीचे असावेत किंवा कणकीचे म्हणजे पिठाचे असावेत.

कणकीचे किंवा मातीचे नऊ दिवे आपण घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये तेल वापरणार आहोत ते तिळाचे असेल किंवा शेंगदाणा तेल किंवा तुप. या तीन पैकी कोणतीही वस्तु चालते आणि हे नऊ दिवे त्या तांदळाच्या ढिगाभोवती सर्व बाजूंनी हे नऊ दिवे प्रज्वलित करायचे आहेत आणि त्या ठिकाणी बसून जय माता दी, जय माता दी, जय माता दी या मंत्राचा 108 वेळा जप करा किंवा आपण दुर्गाचालीसाचा पाठ पाच वेळा केला तरीही चालेल किंवा दुर्गा सप्तशती म्हणलात तरी चालेल.

त्यानंतर आपण मातेची कापुराने आरती ओवाळायची आहे आणि त्याच ठिकाणी आपण पाच ते दहा मिनिटे आपण बसायचे आहे, देवीचे नामस्मरण करायचे आहे आणि सर्वात शेवटी आपली समस्या आहे, मनोकामना आहे, इच्छा आहे ती आपण बोलून दाखवायची.

नतमस्तक व्हा, आपला डोके खाली टेकवा आणि मातेकडे या नवरात्रीच्या निमित्ताने तुमची इच्छा बोलून दाखवा आणि त्यानंतर जे श्री यंत्र आहे हे श्री यंत्र लगेच नाही, त्या ठिकाणी ते दिवसभर असूदे आणि मग संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी हे श्री यंत्र आपण आपल्या देवघरामध्ये स्थापित करा. जे तांदूळ आहे ते दुसऱ्या दिवशी आपण झाडाखाली पक्षांसाठी टाकू शकता. कणिकेचे दिवे तुम्ही गाईला खाऊ घातले किंवा पशुपक्षांना टाकले तरीही चालेल.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.