स्वामी कृपेने चांगली नोकरी मिळाली स्वामींच्या आशीर्वादाने एका भक्ताच्या घराचे नाव रोशन झाले…

नाशिक मध्ये भिकाजी नावाचे सदाचारी स्वभावाचे पांडू रंगाचे अनन्य भक्त राहत होते त्यांना दोन मुले होती एकाचे नाव पिराजीराव तर दुसरे विठ्ठल राव तुम्ही सरळ स्वभावाचे बुद्धिमान होते एके दिवशी पिराजीराव स्वामींच्या दर्शनासाठी अक्कल कोटी आले त्यावेळी स्वामी महाराज पटवर्धनांच्या गणेश मंदिरात बसलेले होते जेव्हा पिराजीराव स्वामींच्या दर्शनासाठी तेव्हा स्वामीचे आजानुबाव तेजस्वी रूप बघून भारावून गेले आणि स्वामींच्या रुपात प्रत्यक्ष पांडुरंग बसलेला आहे असे त्यांना वाटू लागले

आणि आपण प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन घेतो आहे या भावनेने ते स्वामींच्या समोर नतमस्तक झाले तेव्हा स्वामिनी त्याच्याकडे बघितले स्मितहास्य करत सभोवताली जमलेल्या सर्व मंडळी कडे बघून म्हंटले अहो यांचा वंश विठ्ठल भक्त परायण आहे असे बोलून दुसऱ्या क्षणाला आपल्या गळ्यातील हार पिराजीरावांच्या गळ्यात टाकला प्रत्यक्ष पांडुरंगाने आपल्याला आशीर्वाद दिला हा अतूट अभिदय विश्वासाचा भाव त्यांच्यामध्ये जागृत झाला स्वामीभक्त हो त्यानंतर त्यांच्या घराण्याची प्रगती झाली

गुरुलीलामृत कार खूप छान वर्णन करून सांगतात की त्या दिवसापासून या घराण्याचे होत चाललेले कल्याण !! वृद्धिस पावले अनुदिन! स्वामीराज कृपेने!! पिराजी रावांचे धाकटे बंधू विठ्ठल राव इंग्रज राज कोटीत मामलेदार झाले त्यानंतर श्री मालोजीराजे यांचे पुत्र शहाजीराजे ज्यांना बाबासाहेब असे बोलवत यांनी विठ्ठल रावांची कारभारी म्हणून नियुक्ती केली पुढे त्यांच्याकडून अनेक जनहितार्थ कामे झाली स्वामींच्या आशीर्वादाने त्यांच्या घराण्याचा नावलौकिक वाढला.

आजच्या लिलेतून स्वामी आपल्याला खूप छान शिकवण देत आहेत जेव्हा पिराजीराव स्वामींकडे आले तेव्हा त्यांचा भाव शुद्ध होता त्यांना स्वामी मध्ये पांडुरंग दिसला आणि त्यांचा हा भाव स्वामींना समजला तेव्हा स्वामिनी जमलेल्या लोकांना यांचा वंश विठ्ठल भक्त परायण आहे असे गोरव उद्वार सांगून त्यांच्या भक्तीची स्तुती करत अनन्य भावनेचा स्वीकार केला आणि गळ्यात पुष्पमाला टाकून अनेक पिढ्यांना शिकवण दिली की कोणी कोणत्याही धर्माचा असू दे कोणतेही देवाची भक्ती करू दे सर्वांचा ईश्वर एकच आहे ईश्वराला मात्र शुद्ध भाव हवा आहे

असा शुद्ध भाव असलेल्या भक्ताच्या भक्तीचा ईश्वर नेहमी स्वीकार करतो ईश्वरच त्या भक्ताच्या भक्ती ची स्तुती करतो आणि त्याच्या पाठीशी उभे राहून त्याचे आणि त्याच्या कुटुंबाचे कल्याणच करत असतो विकासच करत असतो हा खूप छान समज स्वामी आपल्याला आजच्या पिढीसाठी देत आहेत स्वामीभक्तहो म्हणून आजच्या लिलेतून प्रेरणा घेत जे जे ईश्वराचे अनन्य भक्त झाले मग ते हिंदू असो व मुस्लीम असो ख्रिश्चन असू दे व पांडुरंगाचे असू दे किंवा अन्य कोणत्याही देवाचे असू दे त्यांच्यामध्ये असलेल्या भक्तीचा आदर्श आपल्याला घ्यायचा आहे

त्यांच्यामध्ये असलेला भक्तीचा भाव समर्पणाचा भाव आपल्याला समजावून घ्यायचा आहे आणि आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न देखील करायचा आहे चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करूया हे समर्था! तुम्हाला मात्र शुद्ध भाव आहे शुद्ध समर्पित भावनेने केलेले प्रामाणिक कर्म हवे आहे असे केल्याने आमचे कल्याण होते विकास होतो ही खूप छान समज आज आम्हा बालकांना दिली तुम्हाला धन्यवाद! तुम्हाला अनंत कोटी धन्यवाद स्वामी!! अनंत कोटी धन्यवाद!!

अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधीराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंद सद्गुरू अवधूतचिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय!!

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published.