नवरात्री दोन हजार एकवीस सुरु होण्या अगोदर घरी आणा ही एक वस्तू साक्षात लक्ष्मी येईल घरी…

मित्रांनो काहीच दिवसांमध्ये शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. नवरात्रीमध्ये माता लक्ष्मी प्रत्येकाच्या घरामध्ये विराजमान होऊ शकते. परंतु यासाठी आपल्याला नवरात्रीमध्ये विधिनुसार माता लक्ष्मीची पुजा करायला पाहिजे. घरामध्ये साफसफाई करायला हवी आणि असे काही उपाय देखील करायला हवेत ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरात वास करेल.

मित्रांनो वास्तुशास्त्रामध्ये काही अशा वस्तु सांगितलेल्या आहेत ज्या आपण आपल्या घरामध्ये आणल्या तर यामुळे देवीमाता आपल्यावर प्रसन्न होते. आपल्या घरामध्ये वास करते, आपल्या घरावर, परिवारावर कृपा करते आणि त्यामुळेच ही नवरात्र सुरू होण्याआधी देवीमाता आपल्या घरात विराजमान होण्यासाठी नवरात्र सुरू होण्याआधी आपल्या घरामध्ये या काही वस्तु नक्की आणा.

मित्रांनो ही नवरात्र सुरू होण्याआधी आपल्या घरात ज्या वस्तु आणायच्या आहेत त्यातील सगळ्यात पहिली वस्तु म्हणजे कमळाच्या फुलाचे चित्र किंवा सोने आणि चांदीचा शिक्का. कमळाचे फुल हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. माता लक्ष्मी कमळाच्या फुलावर विराजमान आहेत असं कमळाचे चित्र आणून जर आपण आपल्या हॉलमध्ये जिथे सतत आपली नजर जाईल अशा ठिकाणी लावली तर यामुळे मातालक्ष्मी सुद्धा आपल्या घरामध्ये वास्तव्य करते.

आपल्या घरातील वातावरण प्रसन्न राहते आणि जिथले वातावरण प्रसन्न असते, आनंदी असते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन नक्की होते. त्याचप्रमाणे सोने किंवा चांदीचा शिक्का जर आपण नवरात्रीच्या आधी आपल्या घरात आणला जर या शिक्यावर माता लक्ष्मीचे चित्र असेल किंवा श्री गणेशांचे चित्र असेल तर अतिउत्तम. मित्रांनो असे सोन्याचा किंवा चांदीचा शिक्का जर आपल्या घरामध्ये आणला तर यामुळे सुद्धा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करते.

पुढची वस्तु आहे केळीचे रोप. केळीचे रोप जर आपण नवरात्रीच्या आधी आपल्या घरामध्ये आणलं, आपल्या अंगणामध्ये हे रोप लावलं तर यामुळे सुद्धा माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. मित्रांनो हे रोप लावल्यानंतर प्रत्येक गुरुवारी या रोपाची मनोभावे पुजा करायची आहे. यामुळे आपल्या घरामध्ये पैशाची कधीही कमतरता भासत नाही. पुढची वस्तु आहे धोतऱ्याच्या झाडाचे मुळ. मित्रांनो धोतऱ्याच्या झाडाचे मुळ जर ही नवरात्र सुरू होण्याआधी आपल्या घरामध्ये आणलं आणि ते जर आपल्या तिजोरीमध्ये ठेवले तर यामुळे आपल्या घरामध्ये कधीही पैशाची चणचण भासणार नाही.

कोणत्याही प्रकारची आर्थिक समस्या आपल्या जीवनात येणार नाही आणि नवरात्र सुरू झाल्यानंतर हे धोतराच्या झाडाचे मुळ आपल्या देवघरात ठेवून नऊ दिवस या मुळाची पुजा करायची आहे. यामुळे देवीमाता आपल्यावर प्रसन्न होते. पुढची वस्तु आहे वडाच्या झाडाचे पान. वडाच्या झाडाचे पान तुम्हाला कुठेही सहज मिळेल. असं वडाचे पान आपण नवरात्र सुरू होण्याच्या एक दिवस आधी आपल्या घरात आणून ठेवलं आणि नवरात्र सुरू होण्याच्या दिवशी जर या वडाच्या पानावर कुंकुवाच्या साहाय्याने स्वस्तिक काढून हे आपल्या मंदिरात स्थापित केलं तर यामुळे माता लक्ष्मी हमखास आपल्यावर प्रसन्न होते.

जेव्हा आपण नवरात्रीमध्ये माता लक्ष्मीची पुजा करणार आहोत तेव्हा हे वडाचे पान माता लक्ष्मीला अर्पण करावे. यामुळे सुद्धा माता लक्ष्मी आपल्याला आशीर्वाद देते. आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदते, आपल्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासत नाही. तर या वस्तूंपैकी कोणतीही एक वस्तु जरी तुम्ही नवरात्र सुरू होण्याआधी आपल्या घरात आणली तर यामुळे नक्कीच माता लक्ष्मीचं आगमन तुमच्या घरात होईल.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published.