स्वामी समर्थांना आवडतात या 5 गोष्टी जो भक्त पाळतो ह्या गोष्टी त्याला स्वामी भेट होते लवकर…

मित्रांनो स्वामी समर्थ महाराजांना या पाच गोष्टी अगदी मनापासून आवडतात आणि जो भक्त या गोष्टी पाळतो, आचरणात आणतो तर त्याला स्वामी लवकर भेट देतात. त्याच्या सगळ्या इच्छा पुर्ण करतात. तर या गोष्टी तुम्ही आचरणात आणा. स्वामींशी भेट होईल, लवकरात लवकर तुमच्या सगळ्या इच्छा पुर्ण होतील.

पहिली गोष्ट म्हणजे स्वामींची सगुण उपासना. मनापासून मनोभावे पुर्ण श्रद्धेने स्वामींची उपासना करणे ही एक गोष्ट स्वामींना अत्यंत प्रिय आहे. अशा सगुण उपासनेला आणि या सेवेला स्वामी नक्कीच प्रसन्न होऊन भक्ताची सगळी इच्छा पुर्ण करतात. तर मित्रांनो तुम्ही स्वामींची मनापासून मनोभावे सगुण उपासना करा. त्यांची मनापासून सेवा करा. स्वामी नक्कीच तुम्हाला दर्शन देतील.

दुसरी गोष्ट म्हणजे अन्नदान. अन्नदान करणे म्हणजे सगळ्यात मोठे पुण्याचे काम आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. लोक अन्नदान करतात परंतु ते कोणत्यातरी खास दिवशी, सणासुदीला अन्नदान करतात की त्यांचे त्यांना फळ मिळावे. पण हे अत्यंत चुकीचे आहे. अन्नदान गरीब व्यक्तीला रोज करायला हवे. निदान एक चपाती, एक भाकरी जे असेल ते आपण एका गरिबाला देऊच शकतो. मागणारा जर कोणी गरीब आला त्याला नक्कीच अन्नदान करा ही गोष्ट स्वामींना अत्यंत प्रिय आहे.

तिसरी गोष्ट म्हणजे स्वामींचे नामस्मरण. सगळ्यांना माहीत आहे श्री स्वामी समर्थ या नामात, या मंत्रात किती चमत्कारी शक्ती आहे. या नावाचे मनोभावे नामस्मरण केले तर स्वामी प्रसन्न होऊन आपल्या भक्तांचे सगळे संकट हरतात आणि सगळ्या इच्छा पुर्ण करतात.

चौथी गोष्ट म्हणजे माणूस जोडण्याची हौस असणे म्हणजेच जनप्रियता. प्रत्येक माणसासोबत प्रेमाने बोलणे, मोठ्यांचा आदर करणे, सगळ्यांना प्रेम करणे, कोणाचाही तिरस्कार न करणे या गोष्टी जो पण पाळतो स्वामी त्यांच्यावर नक्कीच प्रसन्न होतात.

पाचवी गोष्ट ती म्हणजे आपली जी ही परिस्थिती असेल त्यात समाधान मानायचे. म्हणजे आपल्याला जे मिळाले आहे त्यात आनंदात राहायचे. जास्त मागायचे नाही, जे आहे त्यावर रडायचे नाही. जे दिले आहे ते देवाने दिले आहे आणि आपण त्यातच आनंदात राहून आपले जीवन जगायचे.

मित्रांनो या पाच गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवायच्या आणि आपल्या आचरणात आणायच्या. या गोष्टी आचरणात आल्या की स्वामी समर्थ महाराज प्रसन्न होतातच आणि आपल्या सगळ्या इच्छा पुर्ण करतात. मग आपल्याला सगळे काही मिळते. हवे ते स्वामी आपल्याला देतात. तर या अगदी सोप्या गोष्टी आहेत आणि स्वामींना प्रिय आहेत. म्हणून आपण या गोष्टी पाळायला हव्या.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.