फेसबुकवर अश्या पद्धतीने व्यक्तीला फसवले जाते व पुढे जे घडते ते पाहून धक्का बसेल!

आजचा हा लेख पुरुषांसाठी आहे. हल्ली एका फ्रॉड बद्दल खुप ऐकण्यात येत आहे. फेसबुकवर एक अज्ञात महिला तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवते. अर्थातच ती फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारता. काही मिनिटात ती महिला मॅसेज पाठवते आणि तुमच्यात संभाषण सुरू होते. त्यानंतर तुमच्यात मोबाईल नंबरची देवाणघेवाण होते.

महिला दिसायलाही खुप सुंदर असल्याने तीच्याशी चॅटिंग करण्याचा मोह तुम्हाला आवरता येत नाही आणि तुम्ही लगेच तिच्याशी व्हाट्सअपवर सुद्धा तिच्याशी बोलणं सुरू करता. ती देखील तुम्हाला चांगला प्रतिसाद देते. थोड्याच दिवसाने ती महिला तुम्हाला ऑनलाइन सेक्स करण्याबाबत ऑफर देते. यात ती तुम्हाला स्वतःचा न्यूड व्हिडिओ व्हाट्सअप व्हिडीओ कॉल वर दाखवते आणि तुम्हाला देखील न्यूड होण्यास सांगते.

ती तुम्हाला प्रायव्हेट पार्ट दाखवण्याबाबत हट्ट करते आणि तुम्ही तिच्या सांगण्यानुसार तसं करता देखील. तुम्हाला माहीतही नसते ती अज्ञात व्यक्ती तुमच्या व्हिडीओ कॉल ची स्क्रीन रेकॉर्डिंग करत असते आणि तुम्ही पुर्णपणे फसलेले असता. दुसऱ्या दिवशी तुमचा स्क्रीन रेकॉर्डिंग केलेला न्यूड व्हिडीओ तुम्हाला पाठवला जातो आणि नंतर सुरू होते तुम्हाला ब्लॅकमेल करण्याची प्रोसेस. ती अज्ञात व्यक्ती तुमच्याकडे पैशाची मागणी करते आणि पैसे नाही दिले म्हणून तुमचा न्यूड व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येईल अशी धमकी देते.

तुम्ही तुमच्या इज्जती खातर त्या अज्ञात व्यक्तीला पैसे सुद्धा देता. पण हे पैसे मागण्याचे सत्र एकदा मागून इथेच थांबत नाही तर पुढे सुरू राहते. या ही पुढे जाऊन तुमची चुक तुम्हाला काय काय दाखवणार असते ते बघा. नंतर तुम्हाला अनोळखी नंबर वरून एक कॉल येतो. ती तुम्हाला सांगते दिल्ली पोलीस येथून बोलत आहे. तुमचा व्हिडीओ युट्युबवर अपलोड करण्यात आला आहे आणि तुम्हाला तो व्हिडीओ काढायचा असेल तर 25 हजार रुपये द्यावे लागतील.

hतुम्ही घाबरून पैसे देता सुद्धा, आपली इज्जत जाईल म्हणून तुम्ही कोणाला सांगूही शकत नाही आणि पोलिसात तक्रार सुद्धा करत नाही. खरतर व्हिडीओ कॉल वर स्वतःचे न्यूड व्हिडीओ दाखवणारी ती फेसबुकवरची अज्ञात महिला म्हणजे फेक अकाउंट उघडून तुम्हाला फसवणारी व्यक्ती असते.

तो एक पुरुषच असतो आणि तुम्हाला कंप्युटर स्क्रीनवरचा खोटा व्हिडीओ तुम्हाला दाखवत असतो आणि तुम्हालाही ते खरे वाटते. ही लोक झारखंड, राजस्थान अशा लांबच्या ठिकाणावरून हे रॅकेट चालवत असतात आणि त्यांच्याकडे असणारे सिमकार्ड सुद्धा दुसऱ्याच्या नावावर रजिस्टर असते. त्यामुळे अशा गुन्ह्याचा तपास करणे खुप कठीण असते. शेवटी कायद्याला सुद्धा मर्यादा आहेत. तर मित्रांनो यातून आपल्याला कसं वाचता येईल हे पाहुया.

कुठल्याही अज्ञात अनोळखी स्त्रीला आपला नंबर देऊ नका. जर तुम्ही ही चुक केली असेल तर त्या अज्ञात व्यक्तीच्या धमक्यांना न घाबरता तुला काय करायचे ते कर मला फरक पडत नाही असे उत्तर द्या. लक्षात ठेवा, तुमचा व्हिडीओ व्हायरल करणे हा त्याचा उद्देश नसतो तर फक्त तुम्हाला ब्लॅकमेल करुन त्याला तुमच्याकडून पैसे काढायचे असतात. त्या अज्ञात व्यक्तीच्या नावाने येणारा प्रत्येक कॉल ब्लॉक करा. कारण त्याच्याकडे पाच ते दहाच डुप्लिकेट सिमकार्ड असतात.

हा सगळ्यात सोपा आणि रामबाण उपाय आहे. तुमची फेसबुक प्रोफाइल लॉक करून ठेवा. जेणेकरून त्याला तुमचे फ्रेंड दिसणार नाहीत. शिवाय त्या अज्ञात व्यक्तीला सुद्धा ब्लॉक करा. तुम्ही हे जर साधे नियम फॉलो केले तर ती व्यक्ती कंटाळून तुमचा नाद सोडून देईल आणि तुम्ही स्वतःचे आर्थिक आणि सामाजिक नुकसान व बदनामी होण्यापासून नक्कीच वाचाल. सावध राहा, सतर्क राहा.

Leave a Reply

Your email address will not be published.