पुजा करताना असे घडले तर समजा देव तुमच्यावर प्रसन्न आहे…!

हिंदू धर्मात देव पूजा करण्याचे फार महत्व आहे. असे म्हणतात की श्रद्धा भक्ती पूर्वक भगवंतांचे पूजन केले तर आपल्यावर भगवंतांची कृपा नक्कीच होते. पूजा करताना आपल्याला काही संकेत मिळतात. परंतु आपण त्या संकेतांकडे दुर्लक्ष करतो. आपण हे संकेत मानत नाही.

आपल्याला हे लक्षात येत नाही की हे संकेत आपल्याला भगवंतांनी दिलेले आहेत. आपल्यावर भगवंतांची कृपा आहे. आपली पूजा भगवंतांनी स्वीकारली आहे. आज त्याच संकेतांबद्दल जाणून घेणार आहोत.सर्वात प्रथम संकेत म्हणजे आपण देवपूजा करताना धूप किंवा अगरबत्ती लावतो.

देवपूजा दरम्यान धूप किंवा अगरबत्ती चा धूर संपूर्ण घरात पसरला आपल्याला अचानक सकारात्मक आणि प्रसन्न वाटू लागले तर समजावे साक्षात् भगवंत आपल्या घरात प्रकट झाले आहेत. लवकरच आपले भाग्य चमकणार आहे. ही सकारात्मक ऊर्जा आपल्या आजूबाजूला असण्याचे संकेत देते. अचानक घरातील वातावरण सुखद व प्रसन्न वाटू लागते.

दुसरा संकेत म्हणजे आपण देवपूजा करत असताना देवपूजा झाल्यानंतर जर आपल्या दारात भीक मागण्यासाठी एखादा भिकारी किंवा लहान बालक जर आले तर समजावे आपल्या दारात साक्षात् भगवंत आलेले आहेत. त्या भिकाऱ्याला परत जाऊ देवू नये. त्याला काही ना काही खायला द्यावे. दान केल्याने आपल्या धनात कधी कमी येत नाही तर नेहमी वाढच होते. पूजे दरम्यान भुकेलेल्या व्यक्तीला अन्न देणे भगवंतांना प्रसन्न करण्या चा खूप चांगला मार्ग आहे.

देव पूजा करत असताना प्रार्थना करत असताना अचानक दिव्याचा प्रकाश मोठा झाला तर समजावे जी प्रार्थना आपण भगवंतांना करत आहोत ती मानत केली आहे. व त्याचाच हा संकेत आहे. अशा वेळी आपण भगवंतासमोर आपल्या जीवनातील अडीअडचणी आपल्या ज्या काही इच्छा मनोकामना असतील त्या लगेचच भगवंतांना सांगून द्यायच्या आहेत.

म्हणजे आपल्या अडी अडचणी व इच्छा अपेक्षा प्रत्यक्ष भगवंतपर्यंत पोहोचतील. व त्या लगेचच पूर्ण ही होतील.पुढील संकेत म्हणजे आपण देवपूजा करताना धूप किंवा अगरबत्ती लावतो त्या धुरात भगवंतांची प्रतिमा किंवा शुभ चिन्ह जर आपल्याला दिसले तर समजावे की भगवंत आपल्या पुजेवर प्रसन्न झाले आहेत. लवकरच आपल्या जीवनातील अडी अडचणी व संकट दूर होणार आहेत.

हिंदू धर्मात अतिथिना देवाचे रूप मानले जाते. आपण देव पूजा करत आहोत आणि अशा वेळी मध्येच पाहुणे जर घरी आले तर समजावे भगवंतांनी आपल्या घरी प्रवेश केला आहे. तर हा भगवंतांना विशेष संकेत मानला जातो. परंतु आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा चुकूनही अपमान करू नये. त्यांचे मन दुखावू नये. आलेल्या पाहुण्यांचा योग्य प्रकारे आदरसत्कार करावा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.