तुळशीला स्पर्श करून गुपचूप बोला हा मंत्र; जे काही मागाल ते सर्व होईल पूर्ण.!

नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या पूजेचे विशेष महत्व सांगितले गेले आहे. कारण तुळशीच्या रोपाला माता लक्ष्मीचे प्रतिक मानले गेले आहे. असे म्हटले जाते, की ज्या घरामध्ये दररोज तुळशीची पुजा केली जाते त्या घरात कधीही दारिद्र्य व दुर्भाग्य येत नाही व त्या घरात सदैव माता लक्ष्मीचा निवास असतो. त्याचबरोबर तुळशीची पुजा केल्यामुळे मोक्षाची प्राप्ती होते व पापांचा नाश होतो.

असे म्हणतात, ज्या घरात तुळशीचे रोप असते किंवा झाड असते, तिथे देवी व देवता वास्तव्य म्हणजेच निवास करतात.त्याचबरोबर तुळशी त्या घरातील नकारात्मक ऊर्जा समाप्त करते व घरात केवळ सकारात्मक ऊर्जेचा संचय करते. पौराणिक मान्यतेनुसार रोज तुळशीची पुजा केल्यामुळे धनसंपदा, वैभव, सुख व समृद्धि याची प्राप्ती होते व माता लक्ष्मी नेहमीच प्रसन्न राहाते.

पद्मपुराणांबद्दल बोलायचे झाले, तर पद्मपुराणानुसार जिथे तुळशीचे रोप असते तिथे ब्रम्हा, विष्णु व शंकर म्हणजेच त्रिदेवांचे वास्तव्य असते. तुळशीची पुजा केल्यामुळे महापातक पण त्याचप्रकारे नष्ट होते जसे सूर्य उगविल्यानंतर अंध:कार नाहीसा होतो. तुमच्या घरात गृहक्लेश राहात असेल किंवा घरात नेहमीच गरीबी राहात असेल, किंवा पैसा येतो पण टिकत नाही किंवा जीवनात कोणत्या न कोणत्या प्रकारे समस्या येताच राहातात तर आज आम्ही तुम्हाला आज एका खास मंत्राबद्दल सांगणार आहोत.

जर या मंत्राचा जप तुम्ही तुळशीपूजा करताना केला, तर काही दिवसांमध्ये तुम्ही प्रत्येक समस्या दूर होईल व घरात माता लक्ष्मी स्थिरस्वरूपाने वास्तव्य करेल. त्याचबरोबर घरात खुशीचे वातावरण पण कायम राहील. घरात कधीही दू:ख, दारिद्र्य, यांचे वास्तव्य होणार नाही. चला तर मग जाणून घेऊया या खास मंत्राविषयी..

मंत्रजप करण्यासाठी रोजच्याप्रमाणे आपल्या इष्टदेवतेची पुजा जरूर करा. त्यानंतर तुळशीच्या जवळ जाऊन सगळ्यात प्रथम तुळशीला नमस्कार करा.त्यानंतर तुळशीला शुद्ध पाणी अर्पण करा. तुमची इछा असेल तर तुम्ही गंगाजल पण अर्पण करू शकता. त्यानंतर तुळशीला सिंदूर, हळद, कुमकुम वाहा. हा तुळशीचा शृंगार असतो. जो सगळ्यांनाच पसंत असतो.

त्यानंतर तुळशीच्या झाडाखाली तुपाचा दिवा प्रज्वलित करा. धूप व अगरबत्ती जरूर करा. तुळशीला सात फेरे जरूर करा.त्यानंतर तुळशीच्या समोर बसून कमीत कमी ११ वेळा तुळशीच्या माळेने एका खास मंत्राचा जप करा. मंत्र असा आहे – “महाप्रसाद जननी, सर्व सौभाग्यवर्धिनी, आधी व्याधी हरा नित्यम, तुळशीत्व्म नामोस्तुते”

या मंत्राचा जप तुम्ही अवश्य करा. मंत्र जप झाल्यानंतर आपल्या सगळ्या मनोकामना तुळशीला स्पर्श करून सांगा.असे केल्यामुळे तुमची मनोकामना सरळ देवापर्यन्त पोहोचेल.जसे की तुम्हाला माहीत आहे, की तुळशी भगवान विष्णुना खूपच प्रिय आहे. त्याशिवाय, भगवान विष्णुंची आराधना ब्रम्हा पण करतात.

त्याचबरोबर शिवही करतात. तर सांगायचा मुद्दा हा की त्रिदेवांची कृपा तुमच्यावर सदैव राहील. या मंत्राच्या प्रभावाने खुद्द देवाला तुमची इछा अवश्य पूर्ण करावी लागेल व त्यासाठी ते विवश होतील.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.