उसने किंवा उधार दिलेले पैसे परत मिळण्यासाठी करा हे 2 उपाय..त्वरित तो व्यक्ती पैसे परत करायला येईल…

मित्रांनो आपण बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीला उसने पैसे देतो, उधार पैसे देतो. मात्र कित्येक महिने उलटून सुद्धा, कित्येक वर्ष उलटून सुद्धा ती समोरची व्यक्ती आपले घेतलेले पैसे परत करत नाही. उधार पैसे परत करण्यास टाळाटाळ करते. अशावेळी आपण काय करावे? अनेकजण शत्रुत्व पत्करतात, समोरच्या व्यक्तीला धमक्या देतात आणि विनाकारण आपण आपले शत्रु वाढवतो. अशावेळी आपण प्रभावी ज्योतिष उपाय वापरून आपला पैसा परत मिळवू शकतो.

आज आपण तंत्रमंत्र शास्त्रातील एक असा उपाय पाहणार आहोत की ज्यामुळे आपण ज्या व्यक्तीला पैसे उधार दिले आहेत ती व्यक्ती स्वतःहून हे पैसे तुम्हाला परत करेल किंवा तुमचे पैसे परत येण्याची अशी परिस्थिती निर्माण होईल की तुमचे उधार पैसे तुम्हाला नक्की मिळतील. तंत्रमंत्र शास्त्रातील दोन उपाय आपण पाहत आहे.

पहिला उपाय हा तुमचे पैसे एखाद्या व्यक्तीने घेतलेले आहेत काही दिवस, काही महिने उलटलेले आहेत मात्र पैसे मिळत नाहीत अशा लोकांसाठी आहे. दुसरा उपाय हा त्यापेक्षाही प्रभावी आहे आणि तो कधी वापरायचा ते लवकरच समजेल. पहिला उपाय, मित्रांनो हा उपाय आपण गुरुवार किंवा रविवार या दोन दिवसांपैकी कोणत्याही एका दिवशी करू शकता.

या दिवशी सूर्योदयापूर्वी उठावे, स्वच्छ स्नान करावे आणि एक आसन अंथरून त्यावरती आपण बसावे. पूर्वेकडे तोंड करावे आणि या मंत्राचा 108 वेळा जप करावा. मंत्र आहे “ओम आदित्याय नमः”, “ओम आदित्याय नमः”. 108 वेळा या मंत्राचा जप करायचा आहे. हा मंत्र सूर्योदयापूर्वी म्हणायचा आहे आणि जेव्हा सूर्य उगवू लागेल तेव्हा आपण तांबे या धातूपासून बनलेल्या तांब्यात स्वच्छ जल घ्यायचे आहे आणि त्यामध्ये लाल मिरचीचे अकरा दाणे टाकायचे आहेत.

उगवत्या सुर्याला हे जल अर्घ्य म्हणून अर्पण करायचे आहे. हे अर्घ्य अर्पण करताना सुद्धा “ओम आदित्याय नमः” या मंत्राचा जप आपण चालू ठेवायचा आहे. त्यानंतर आपण सुर्यदेवाला हात जोडून आपण उधार दिलेले पैसे परत मिळण्याची प्रार्थना करायची आहे. हा उपाय दर गुरुवारी किंवा रविवारी पुनरावृत्त करावा जोपर्यंत तुमचे पैसे परत मिळत नाही. काही दिवसातच तुमचे उधार पैसे परत मिळतील.

दुसरा उपाय त्या लोकांसाठी आहे खुप सारा कालावधी उलटलेला आहे, अगदी वर्ष उलटुन गेलंय मात्र पैसा काही मिळालेला नाही. यासाठी आपल्याला रविवारचा दिवस निवडायचा आहे. रविवारच्या दिवशी आपल्याला तांब्याचे एक पात्र घ्यायचे आहे. ताट असेल, ताटली असेल, प्लेट असेल, वाटी असेल असे एक पात्र घ्यायचं आहे. त्या पात्रामध्ये आपण एक कपुरी पान ज्याला आपण विड्याचे पान म्हणतो, काहीजण नागिणीचे पान म्हणतो. तर असे पान देठासह ठेवायचे आहे आणि त्यावरती देशी कापुर ठेवायचा आहे आणि हा कापुर जाळायचा आहे.

हा कापुर जाळल्यानंतर आपण एक स्वच्छ भुर्जपत्र घ्यायचं आहे. ज्याला हिंदीमध्ये भोजपत्र म्हणतात. कोणत्याही पूजेच्या दुकानात मिळून जाईल. जर नसेल तर साधा कागद घेतला तरी चालेल. मात्र या कागदावरती कोणत्याही प्रकारच्या रेषा नसाव्यात, कागद स्वच्छ असावा. असा कागद घ्यायचा आहे आणि त्यावरती या देशी कापुराच्या काजळाने ज्या व्यक्तीने आपले पैसे घेतलेले आहेत त्या व्यक्तीचे नाव लिहायचे आहे आणि त्यानंतर आपल्या उजव्या हाताने या भोजपत्रावर किंवा या कागदावरती आपण सात वेळा थपकी मारायची आहे, थाप मारायची आहे.

प्रत्येक वेळी थाप मारताना त्या व्यक्तीचे नाव घेऊन आपले उधार पैसे लवकरात लवकर परत करण्यास त्या व्यक्तीला सांगायचे आहे. त्यानंतर हा कागद किंवा भोजपत्र तिजोरीत किंवा जिथे तुम्ही मौल्यवान वस्तु ठेवता, पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवायचे आहे. ठेवताना ते नाव वरच्या बाजूला आले पाहिजे. त्यानंतर या कागदावर लाल रंगाचा दगड ठेवायचा आहे. यासाठी कोणताही दगड घ्यावा आणि या दगडाला स्वच्छ करून आपण कुंकुवाच्या पाण्याने म्हणजे पाण्यात कुंकू टाकून लावायचे आहे.

म्हणजे दगडाचा रंग लाल करायचा आहे. असा हा लाल रंगाचा दगड या कागदावर ठेवायचा आहे. हा उपाय ज्या व्यक्तीने पैसे घेतलेल्या आहेत त्या व्यक्तीला कोणतेही नुकसान पोहोचवत नाही. फक्त त्या व्यक्तीला आपले पैसे परत देण्यास हा उपाय उद्युक्त करतो.

तुम्हाला यासारखे अजूनही अनेक उपाय सापडतील मात्र काही काही उपाय हे आपण जाणीवपूर्वक टाळायला हवेत, कारण ते उपाय समोरच्या व्यक्तीला इजा पोहचवू शकतात आणि म्हणून तुमच्या जवळची व्यक्ती असेल तर हे उपाय अवश्य करा समोरच्या व्यक्तीला कोणतेही नुकसान पोहचणार नाही. पैसा जितका चांगला आहे तितका वाईटही आहे, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा.

Leave a Reply

Your email address will not be published.