‘कर्जात बुडालेलो’ पण स्वामी मार्गात आलो आणि सगळे बदलले…पहा स्वामीचा एका भक्ताला आलेला अनुभव..नक्की वाचा…

हा अनुभव सौ.उमा आणि श्रीनिवास गरगटे यांचा आहे. त्यांनी लिहलय आमचा राजगिरा लाडू तयार करण्याचा व्यवसाय आहे. 2004 पर्यंत रोज सुमारे 150 ते 200 किलोचे उत्पादन आमचे इथे होत असे. त्यातील सर्वच माल एकच दुकानदार घेत असे. त्याची मोठी ऑर्डर असल्याने त्याच्या शब्दावर विश्वास ठेवून आम्ही दुसऱ्या दारापर्यंत आलेल्या ऑर्डर सोडल्या. याचे कारण असे होते की आता आहे ती ऑर्डर पुर्ण करता करता नाकीनव येत आहेत.

तर नवीन ऑर्डर घेऊन ना घर का ना घाट का अशी परिस्थिती होईल. अशा सर्व परिस्थितीमध्ये त्या व्यावसायिकाकडे आमची 70 ते 80 हजारांची थकबाकी होती. एवढी उधारी ठेवून उद्योग चालू ठेवणे हा वेडेपणा होता. पण त्याच्या विश्वासावर आम्ही त्याला माल देत होतो. त्याजोरावर आम्ही स्वतःची जागा घेऊन कामासाठी आणि स्वतःला राहण्यासाठी बँकेचे कर्ज काढून घर बांधले. नंतर त्या माणसाने स्वतःचे उत्पादन सुरू केले व आमची ऑर्डर बंद झाली. ऑर्डर बंद झाल्यामुळे रोजची कमाई बंद झाली.

हे सर्व सोडून कोठेतरी निघून जावे असे वाटत होते. असेच चाललो असताना वाटेत माझा जुना मित्र बऱ्याच वर्षांनी भेटला. थोडी विचारपूस झाल्यावर त्याला कल्पना आली. त्याने घरी बोलावले. दोन तीन दिवसांनी आम्ही त्याच्या घरी गेलो. तेथे त्याच्या घरात स्वामींच्या पादुका होत्या आणि तेथेच मला तपस्वी काका यांचे नाव कळले. त्यांना भेटायला आम्ही गेलो तेथेच स्वामींचा आम्हाला वर्दहस्त मिळाला. तपस्वी काकांनी आम्हाला जप व मंत्र चे पालन करायला सांगितले.

त्यानंतर एक महिन्याच्या आतच आमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी चांगली माणसे भेटली. तसेच बँकेची रखडलेली कामे मार्गी लागली. तपस्वी काकांनी दाखवलेला मार्ग आणि स्वामींवरील आमची श्रद्धा यांनीच आम्हाला खडतर परिस्थितीतून बाहेर काढले आहे. त्यानंतर आम्हाला श्री भाटे काका भेटले व त्यांच्याकडून एक वर्षांपूर्वी आम्हाला पाडव्याच्या शुभदिनी स्वामींची मुर्ती मिळाली. स्वामींच्या आशीर्वादामुळेच त्या व्यवसायाशी मशिनरी घेण्याचा आमचा विचार आहे.

अशी श्री स्वामींची कृपा आमच्यावर राहो ही स्वामींचरणी प्रार्थना. तर अशा प्रकारे स्वामी मार्गात आल्यामुळे त्यांची कशी प्रगती झाली याबद्दल गोड अनुभव त्यांनी दिलेला आहे. त्याचप्रकारे अजून एक अनुभव एका ताईंनी दिलेला आहे. श्री स्वामी समर्थ महाराज यांचा माझ्यावर वर्धहस्त असल्याचा मला माझ्या नोकरीवर असल्याच्या काळात वारंवार येत होता. प्रत्येक वेळी ते माझ्या पाठीशी उभे होते म्हणून माझी जीवनातील वाटचाल इथपर्यंत आली.

प्रत्येक प्रसंगात कोणत्या ना कोणत्या कारणाने उभे राहतात. आताच्या ताज्या अनुभवाची आठवण जरी झाली तरी अंगावर काटा उभा राहतो. गुरुवारचा दिवस होता, सकाळी दहा वाजता माझ्या मनात आले की किचनच्या ओटाच्या सिंक खाली ब्लिचिंग पावडर टाकून स्वच्छ करावी. म्हणून तेथील वस्तु बाहेर काढल्या. त्यात एक दगडी पाटा आणि वरवंठा होता. पाटा दरवाजाच्या मागे भिंतीला टेकून उभा केला.

साफ सफाई झाल्यावर दरवाजा बंद करण्यासाठी हाताने पुढे ढकलला व मागे उभ्या असलेल्या पाटाचे भानही राहिले नाही व दगडी पाटा डाव्या पायाच्या बोटाच्या बाजूवर पडला. पाटाची टोकदार बाजू मधल्या बोटावर जोरदार आदळल्यामुळे जखम त्या बोटाला झाली. माझा जीव घाबराघुबरा झाला. क्षणभर वाटले की मला चक्कर येईल. परंतु स्वामींच्या कृपेने बाहेर गेलेले माझे यजमान तेवढ्यात परत आल्यामुळे इलाज सुरू झाला.

नंतर वैद्यकीय उपायाने महिन्याभरात जखम बरी झाली. पाटा पाय व सर्व बोटांवर पडला असता तर अशा विचार केला तरी अंगावर शहारे येतात. श्री स्वामी समर्थांच्या प्रेरणेमुळे त्यांच्या चांगली कामे होतात व त्यांचे फळही त्यांना मिळते. याचा अनुभव त्यांनी घेतला आहे.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा, जेणेकरून दुसऱ्यांना पण याचा लाभ होईल . अशाच आध्यात्मिक पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे Marathi jokes हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका धन्यवाद …

Leave a Reply

Your email address will not be published.