’19 सप्टेंबर’ अनंत चतुर्दशी गुपचूप ठेवा इथे वाटीभर भात पैसा इतका येईल की…

19 सप्टेंबर 2021 रोजी रविवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे अनंत चतुर्दशी. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी स्थितीस आपण गणपती बाप्पांचे विसर्जन करतो आणि त्या दिवसास अनंत चतुर्दशी म्हटले जाते. प्रत्येक शुभ कार्याच्या प्रसंगी सर्वात आधी गणपती बाप्पांची पुजा केली जाते.

गणपती बाप्पा दहा दिवस आपल्यामध्ये राहिले आणि ते आता सोडून जात आहेत. गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यापूर्वी हा एक उपाय नक्की करून पाहा. आपल्या जीवनातील मोठ्यात मोठ्या समस्या, घरातील आजारपण, कामामध्ये येणाऱ्या अडचणी हे दूर होऊन घरामध्ये सुखसमृद्धी नांदू लागते. हा उपाय करण्यासाठी जी सामुग्री आवश्यक आहे त्यामध्ये एक चपाती किंवा भाकरी, थोडासा शिजवलेला भात आणि थोडीशी मिठाई जर मोदक असतील तर अतिउत्तम. केवळ या तीन सामुग्रीच्या साहाय्याने आपण गणपती बाप्पांची असीम कृपा या अनंत चतुर्दशीच्या दिवशी प्राप्त करू शकता. मित्रांनो 19 सप्टेंबर 2021 रोजी अनंत चतुर्दशी आहे या दिवशी आपण सकाळी लवकर उठावे.

स्वच्छ स्नान करावे, स्वच्छ वस्त्र परिधान करावी आणि त्यानंतर आपल्या घरात गणपती बाप्पांची स्थापना केलेली असेल तर गणपती बाप्पांसमोर हा उपाय करायचा आहे. जर गणपती बाप्पांचे आधीच विसर्जन केलेले असेल तर देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती आहे, त्या देवघरासमोर आपण हा उपाय करू शकता. घरामध्ये जी गृहिणी आहे त्या स्त्री ने पहिली भाकरी किंवा चपाती ही गोमातेसाठी बनवायची आहे आणि दुसरी ही आपण गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून बनवणार आहोत. ही बनवताना “ओम गण गणपतेय नमः” या महामंत्राचा सातत्याने जप करा.

मनातल्या मनात जप केला तरी चालेल. दुसरा जो पदार्थ गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून बनवणार आहे भात. थोडासा भात शिजवा, हा भात नैवेद्य म्हणून ठेवणार आहे. तिसरा पदार्थ आहे थोडीशी मिठाई. हे तिन्ही पदार्थ एकत्रित ठेवण्यासाठी एक लाल रंगाचा कपडा लागेल किंवा पिवळ्या रंगाचे कापड लागेल. ज्या ठिकाणी गणपती बाप्पा आहेत त्यांच्या मूर्तीसमोर हे कापड अंथरायचे आहे आणि त्यावरती भाकरी, चपाती, भात आणि मिठाई ठेवायची आहे. या वस्तु ठेवल्यानंतर आपण विधिवत गणपती बाप्पांची पुजा करायची आहे. नेहमी प्रमाणे तुपाचा अगर तेलाचा दिवा गणपती बाप्पांसमोर प्रज्वलित करायचा आहे.

कापराने गणपती बाप्पांची आरती ओवाळायची आहे. अगदी ज्याप्रमाणे आपण दुर्वा वगैरे अर्पण करतो त्यासुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत. हे सर्व करत असताना नैवेद्य दाखवणार आहे तर ही भाकरी चपाती, भात आणि मिठाई ही नैवेद्य म्हणून लाल किंवा पिवळ्या रंगाच्या कपड्यावरती ठेवायच्या आहेत. हे ठेवल्यानंतर ” ओम गण गणपतेय नमः”, “ओम गण गणपतेय नमः” याचा कमीत कमी 108 वेळा जप आपण करायचा आहे. संपूर्ण परिवार या मंत्राचा जप करणार असाल तर अतिउत्तम आहे. याचे फळ चांगले मिळते. घरातील रोग, बाधा, संकटे टळतात.

हा जप केल्यानंतर गणपती बाप्पांसमोर प्रार्थना करायची आहे की आपल्या जीवनात ज्या समस्या आहेत, कामामध्ये अडथळे येतात, कोणतीही तुमची समस्या असेल ती दूर होऊ देत किंवा तुमच्या मनामध्ये इच्छा आहे, मनोकामना आहे ती आपण गणपती बाप्पांसमोर बोलून दाखवायची. त्यानंतर संपूर्ण दिवसभर हा नैवेद्य त्याच ठिकाणी असेल. सायंकाळी म्हणजे दुपारी तीन चार नंतर आपण या नैवेद्याची पोटली बांधायची आहे आणि तुम्ही तुमच्या घरातील बाप्पांचे विसर्जन अद्याप केलेलं नसेल आणि अनंत चतुर्दशीस गणपती विसर्जन करणार असाल तर या विसर्जनासोबतच आपण या पोटलीचे विसर्जन हे वाहत्या पाण्यात किंवा नदी, विहिर, तलाव करायचे आहे.

जर गणपती बाप्पांचे अगोदरच विसर्जन केलेलं असेल तर केवळ ही पोटली घेऊन जायची आहे आणि कोणत्याही पाण्यात विसर्जन करायची आहे. वाहत्या पाण्याचा स्त्रोत नसेल तर कोणत्याही झाडाखाली आपण ही पोटली ठेऊन येऊ शकता. फक्त परत येताना पाठीमागे पाहू नका. फक्त झाड काटेरी नसावे आणि झाडाखाली अस्वच्छता नसावी याची काळजी घ्यावी. घरात आल्यानंतर देवघरातील गणपती बाप्पांपुढे तीच प्रार्थना करायची आहे. हा उपाय दिवसभरात कधीही करू शकता.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.