बुध ग्रहाचा तूळ राशीत प्रवेश, ‘6’ राशींच्या नशिबाचे घोडे वाऱ्याच्या वेगाने धावणार…

बुद्धीचा देव, बुध २२ सप्टेंबर २०२१ रोजी कन्या राशीतून बाहेर पडेल आणि शुक्राचे स्वामीत्व असलेल्या तूळ राशीत संक्रमण करेल. बुध हा व्यवसाय, करिअर, बौद्धीक क्षमता इत्यादी घटकाशी संबंधीत असल्याचे म्हटले जाते. अशा परिस्थितीत, आज पाहूया तूळ राशीमध्ये बुधचे संक्रमण कोणत्या राशीच्या व्यक्तींना कारकीर्द, व्यवसाय इत्यादीसाठी फायदेशीर ठरेल…

धनू

तुमच्या अकराव्या स्थानी म्हणजेच लाभ स्थानी बुध ग्रहाच्या संक्रमणामुळे, तुम्हाला या काळात अनेक क्षेत्रातून लाभ मिळू शकतात. जे आपला व्यवसाय करत आहेत त्यांना अचानक चांगला सौदा मिळू शकतो. त्याचबरोबर नोकरीत असलेल्या या राशीच्या लोकांना पदोन्नती किंवा उत्पन्नात वाढ होण्याची शक्यताही चांगली आहे.

कन्या

बुध तुमच्या स्वतःच्या राशीचा स्वामी आहे आणि सध्या तो तुमच्या दुसऱ्या स्थानी असेल. दुसरे स्थान भाषण, पैसा आणि कुटुंबाशी संबंधीत असल्याचे म्हटले जाते. या स्थानी बुध ग्रहाच्या संक्रमणामुळे तुम्हाला कौटुंबिक जीवनात चांगले परिणाम मिळतील. आपण कौटुंबिक व्यवसाय केल्यास नफा मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. त्याचबरोबर या राशीच्या लोकांना जे राजकारण आणि पत्रकारीता क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांनाही लाभ मिळेल.

तूळ

तुमच्या लग्न भावात बुधचे संक्रमण तुम्हाला तार्किक आणि अद्ययावत (काळानुसार चालण्यास समर्थ बनवेल) करेल. या दरम्यान, जर तुमचे कार्य क्षेत्रामध्ये काही रखडलेले कार्य असेल तर ते पूर्ण केले जाऊ शकते. त्याचबरोबर या राशीच्या व्यावसायीकांना देखील लाभ मिळेल. या काळात, तूळ राशीच्या लोकांना जे प्रेमात आहेत त्यांना त्यांच्या प्रियकराकडून एखादी चांगली बातमी मिळू शकते.

मिथुन

बुध ग्रह तुमच्या पाचव्या स्थानी राहील, बुध ग्रहाच्या तूळ राशीतील संक्रमणादरम्यान तुम्हाला त्या क्षेत्रांमध्ये लाभ होईल जिथे तुम्ही तुमचे शिक्षण घेतले आहे. या काळात, या राशीचे काही लोक स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार देखील करू शकतात आणि त्यात यशस्वी होऊ शकतात. जे लोक आता शिक्षण घेत आहेत त्यांनाही बुधच्या संक्रमणाचा फायदा होईल. या राशीचे नोकरदार लोक त्यांच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांकडून कौतूक मिळवू शकतात.

मेष

बुध ग्रह तुमच्या सातव्या स्थानी संक्रमण करेल, ज्याला भागीदारीचे स्थान म्हणतात. बुधच्या या संक्रमणाचा फायदा त्या लोकांना होईल जे त्यांच्या जोडीदारासोबत व्यवसाय करतात किंवा कोणत्याही प्रकारच्या भागीदारीमध्ये व्यवसाय करतात. त्याचबरोबर तांत्रिक क्षेत्रात काम करणाऱ्या या राशीच्या लोकांनाही त्यांच्या कारकिर्दीत यश मिळेल.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.